जॅक मा (Jack Ma)
भारत- चीन चकमकीमध्ये भारताने चीनवर मात दिल्यानंतर नुकतीच आलेली ताजी बातमी म्हणजे “जॅक मा (Jack Ma)” यांची जागा मुकेश अंबानींनी घेतली आहे. होय! आशियामधील सर्वात श्रीमंत आणि जगामध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या १० व्यक्तींमध्ये असणाऱ्या जॅक मा यांना मागे टाकून मुकेश अंबानी आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या असून जगामधील श्रीमंतांच्या यादीमध्ये ते आता ९ व्या क्रमांकावर आहेत. कोण आहेत हे जॅक मा? चला तर मग या लेखामध्ये त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. जॅक मा यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की ‘बस नाम ही काफी है|’
Jack Ma: बालपण
- जगातील ऑनलाईन घाऊक व्यापार करणारी सर्वांत मोठी कम्पनी ‘अलीबाबा.कॉम’ चे सर्वेसर्वा जॅक मा यांचा जन्म चीनमध्ये १० सप्टेंबर १९६४ साली एका खेडेगावात झाला.
- लहानपणापासूनच जॅकला इंग्रजी शिकण्यात फारच रस होता. इंग्रजी शिकण्यासाठी तो रोज पहाटे ५ वाजता घरापासून सायकलवर २७ किमी असलेल्या एका आंतरराष्ट्रीय हॉटेलच्या बाहेर जाऊन उभा रहात असे आणि तिथे येणाऱ्या प्रवाशांना त्याच गाव दाखवण्याचं काम करत असे त्या बदल्यात त्यांनी त्याला इंग्रजी शिकवावे ही त्याची विनंती असे.
- असे करत असताना एक दिवस त्याची एका ऑस्ट्रेलियाच्या कुटुंबाशी चांगली गट्टी जमली.
- त्यांना त्याचे चिनी नाव ‘मा यून‘, नीट उच्चारता येत नव्हते म्हणून त्यांनीच त्याला ‘जॅक‘ हे नाव दिले आणि त्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाला बोलावले. तेव्हा जॅकने खऱ्या उच्चस्तरीय राहणीमानाचा अनुभव घेतला जे चीनच्या तुलनेत खूपच वरच्या दर्जाचे होते.
राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…
Jack Ma: शैक्षणिक जीवन
- पुढे शिक्षण घेताना चीनमध्यें पदवीला प्रवेश मिळण्यासाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते जी वर्षातून एकदाच असते आणि ती १२० मार्कांची असते. त्या परीक्षेत पहिल्या वर्षी जॅकला फक्त १ गुण मिळाला.
- दुसऱ्या वर्षी त्याने कशीतरी १९ गुणांपर्यंत मजल मारली आणि शेवटी तिसऱ्या वर्षी एकदाचा पास झाला आणि मग एका टीचर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बॅचलर ऑफ आर्टस् ही पदवी १९८८ मध्ये मिळवली.
- ग्रॅज्युएशननंतर त्यांनी इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नोकरी केली.
- हार्वर्ड बिझनेस स्कुल मध्ये प्रवेश मिळण्यासाठी देखील जॅक यांनी १० वेळा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकवेळी अपयशच पदरी आलं.
- नोकरी मिळवण्यासाठी जॅक यांनी ३० वेळा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी तो प्रयत्न फसला.
- जेव्हा त्यांच्या गावात नुकतंच केएफसी (KFC) आलं होत तेव्हा तिथे देखील नोकरीसाठी जॅक यांनी प्रयत्न केले, तिथे एकूण २४ जणांनी नोकरीसाठी अर्ज केला होता, त्यातल्या २३ ज्यांना नोकरी मिळाली, पण जॅकच्या पदरी पुन्हा अपयशच.
- अर्थात अशा अपयशांनी जॅक खचणारा नव्हता कारण त्याची स्वप्नेही खूप मोठी होती.
- एका मुलाखतीमध्ये जेव्हा जॅक यांना या अपयशांबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, “आपण या गोष्टींची सवय करून घेतली पाहिजे. आपण इतके ‘चांगले‘ नाही आहोत.”
इन्फोसिसची यशोगाथा – कोण बनला करोडपती…?…
Jack Ma: अपयशाकडून यशाकडे प्रवास
- अशी अनेक अपयशे पचवत असतानाच एका महामार्ग बनवण्याच्या कामानिमित्त जॅक मा १९९५ मध्ये अमेरिकेला गेले आणि तिथेच त्यांची ‘कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट‘ जगताशी ओळख झाली.
- त्यावेळी चीनमध्ये कॉम्प्युटर्स खूपच कमी वापरले जात आणि इंटरनेट किंवा इ–मेल्स तर अस्तित्वातही नव्हत्या.
- जॅक यांनी इंटरनेट वर सर्वात पहिला शब्द शोधला “beer म्हणजे अस्वल” आणि चीन सोडून इतर सर्व देशांतून त्यांना बरेच रिझल्ट्स आले. मग ‘चीन‘ शोधले असता मात्र एकही रिझल्ट आला नाही.
- त्याच वेळी जॅक ने ठरवलं की आता चीनला आणि तिथल्या लोकांना इंटरनेट ची ओळख करून देण्याची वेळ आली आहे.
क्रमश: मा यून ते जॅक मा (Jack Ma) यशाचा प्रवास – भाग २
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Jack Ma info in Marathi, Success story of Jack Ma in Marathi, who is Jack Ma in Marathi