Infosys: इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

Reading Time: 3 minutes

Infosys

इन्फोसिस (Infosys) कंपनीबद्दल माहिती नाही असं कवचितच कोणी असेल.  इन्फोसिस  ही शेअर बाजारातील एक प्रमुख कंपनी आहे. आज आपण या कंपनीच्या प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत.

दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सात कोटी रूपयांचा परतावा मिळाल्याचं जर तुम्हाला कोण सांगितलं, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? पण हे सत्य आहे! शेअर बाजारातील गुंतवणुकीतून हे शक्य आहे. आपण बोलत आहोत इन्फोसिस (Infosys) या दिग्गज आयटी कपंनीबद्दल! या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना २५ वर्षांत करोडपती बनवलं आहे. काही मित्रांनी एका फ्लॅटमध्ये सुरू केलेली ही कंपनी. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांच्याबद्दल आपण सर्वजण जाणतोच. 

इन्फोसिस (Infosys) कंपनीची शेअर बाजारातील सुरवात 

 • १९९३ साली १४ जूनला एका सामान्य आयटी कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) आला. तो ९५ रुपयांच्या इश्यू प्राईसवर गुंतवणूकदारांना देण्यात आला होता. त्याची शेअर बाजारात लिस्टिंग झाली १४५ या रेटवर. म्हणजे लिस्टिंग होतानाच जवळपास ५० रूपयांचा नफा त्यामध्ये मिळाला. 
 • त्यानंतर कंपनीत अनेक स्थित्यंतरं येत गेली. एका सामान्य सॉफ्टवेअर कंपनीची देशातील दिग्गज आयटी कंपनीकडे वाटचाल सुरू झाली होती. संपन्नतेकडे होणारी ही वाटचाल केवळ कंपनीपुरता मर्यादित न राहता या कंपनीशी निगडीत सर्वांचं त्या वाटेवर मार्गक्रमण सुरू झालं. कंपनीचे कर्मचारी आणि गुंतवणूकदारही!!!
 • १९९३ साली ज्याने इन्फोसिसमध्ये १०० शेअर्स घेऊन ९६०० गुंतवले असतील त्याची आजची किंमत काढताना दरम्यानच्या काळात किती बोनस, स्प्लिट आणि लाभांश (Bonus, Split and Dividend) दिले हे बघूयात आणि त्यानुसार आजचं मूल्यांकन (valuation) काढूयात…
 • 14 June 1993 (IPO Listing):  Issue Price – 95 : Listed – 145

1993 – 100 shares at price 95=  9500 Investment Value

खाली दिलेल्या इमेजमध्ये इन्फोसिसने आजपर्यंत दिलेल्या  बोनस, स्प्लिट आणि लाभांशची माहिती मिळेल.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”

या २५ वर्षांत इन्फोसिसने ८ वेळा बोनस दिला आणि एकदा शेअर स्प्लिट झाला. या कॉर्पोरेट ऍक्शनमुळे शेअर्सच्या संख्येमध्ये आपोआप वाढ होत गेली. एका बाजूला शेअर्सच्या संख्येत वाढ होत गेली आणि सातत्याने चांगली ग्रोथ केल्याने कंपनीच्या शेअर्सचे भावही वाढत राहिले. या काळात इन्फोसिसने भागधारकांना चांगला लाभांश सुद्धा दिला आहे. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)

 • १९९३ साली ज्याने इन्फोसिसचे १०० शेअर्स घेतले होते, त्यांचे आज म्हणजे २०१९ साली १०२४०० इतके शेअर्स झाले आहेत. आज इन्फोसिसच्या शेअरचे मूल्य (share price) आहे ७५०, म्हणजे त्याचं आजचं मूल्यमापन आहे जवळपास ७.६ कोटी. यामध्ये अजून लाभांशची रक्कम धरलेली नाही. ती साधारणपणे १०७५२०० इतकी आहे.
 • याचा अर्थ असा की तेव्हा जर इन्फोसिसचे शेअर्स घेऊन तसेच्या तसे ठेवले असते, तरी आज गुंतवणूकदारांना ७ कोटी इतकी रक्कम मिळाली असती.
 • ही काही काल्पनिक कथा किंवा हवेतील गोष्टी नाहीत. याची संपूर्ण माहिती तुम्हाला विविध अधिकृत संकेतस्थळांवर मिळेल. 
 • शेअर बाजारात मिळणारा परतावा इतर अनेक क्षेत्रातील परताव्यांपेक्षा खूप मोठा ठरू शकतो, पण त्यासाठी या क्षेत्राचा अभ्यास आणि संयमअसायला हवा.
 • पंचवीस वर्षांपूर्वी कम्प्युटर क्षेत्र किती महत्वपूर्ण ठरणार आहे हे ज्याला समजलं असेल त्यांनीच इन्फोसिसमध्ये गुंतवणूक केली असती.
 • याचा अर्थ सरळ आहे, भविष्य कुठे आहे त्या क्षेत्रात, त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर अचंबित करणारा परतावा मिळू शकतो.
 • लॉटरी वगैरे या नशिबाच्या गोष्टी असतात. पण करोडपती बनण्याचा “संयम” हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. करोडपती कोणीही बनू शकतं!!!

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)

– अभिषेक बुचके  

9422611264 

buchkeabhishek@gmail.com

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची उपलब्ध माहितीप्रमाणे कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Infosys  in Marathi, Infosys Marathi Mahiti, Infosys  Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.