अर्थसाक्षर क्रेडिट कार्ड वापरताना काळजी
https://bit.ly/39QJgVn
Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्याल?  

क्रेडिट कार्डमुळे आज आपले जीवन खूपच सोपे आणि सोयीस्कर झाले आहे, पण क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण मनस्ताप सहन करावा लागेल. 

क्रेडिट कार्डमुळे आपल्या स्वप्नातले आरामदायी जीवन जगणे आता बऱ्याच प्रमाणात शक्य झाले आहे. एखादी वस्तू घ्यायची तुमची इच्छा झाली आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ते घेण्यासाठीचे पैसे नसतील तरीही त्या वस्तूच्या किमतीएवढी रक्कम तुमच्याकडे येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा तुम्ही क्रेडिट कार्डच्या आधारावर इएमआय वर म्हणजे ठराविक मासिक हप्त्यावर ती वाटू खरेदी करू शकता.

क्रेडिट कार्ड वापरताना काही धोके सुद्धा आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना ओटीपी लागतोच असे नाही. त्यामुळे बऱ्याच वेळी ते दुहेरी संरक्षण उरत नाही. याशिवाय इतरही अनेक कारणांमुळे या प्रकारच्या व्यवहारांवर बंधने येतात. आता या क्रेडिट कार्ड्स देणाऱ्या कंपन्याही कार्ड्सवर बऱ्याच प्रकारचे सुरक्षिततेचे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. 

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्याल?  

. कार्ड वापराच्या मर्यादा निश्चित करणे: 

  • आता अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना मोबाईल किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देतात ज्यामुळे त्यांच्या कार्डचा गैरवापर टाळता येऊ शकेल
  • कार्ड वापरून रोज किती रुपयांचे व्यवहार केले जाऊ शकतील ही मर्यादा कार्डधारक ठरवू शकतात, म्हणजे उदा. तुम्ही तुमच्या नोकराला काही घरगुती सामान आणण्यासाठी तुमचे कार्ड दिले, तर त्याने किती रुपयांची खरेदी त्या कार्डवर करायची ही मर्यादा तुम्ही ठरवून दिली की त्यापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार तो त्या कार्डवर करूच शकणार नाही
  • यासोबतच दिवसातून किती वेळा कार्डचा वापर केला जावा याच्याही मर्यादा तुम्ही ठरवू शकता म्हणजे तो नोकर ते कार्ड एकदाच वापरू शकेल
  • याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कार्ड वापरासाठीच्या भौगोलिक मर्यादाही ठरवू शकता म्हणजे ते कार्ड किमी १० किंवा २५ किमी अशा किती रेडिअसमध्ये वापरलं जावं यावर तुम्ही बंधन घालू शकता. तेवढ्या रेडिअसच्या बाहेर जर कोणी त्या कार्डचा वापर करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही
  • याचबरोबर कार्ड कोणत्या प्रकाराने वापरायचे म्हणजे स्वाईप करायचे, टी एम मध्ये वापरायचे वगैरे पद्धती किंवा कोणत्या प्रकारच्या खर्चांसाठी वापरायचे यावरही तुम्ही बंधने घालू शकता. म्हणजे समजा तुमच्या मुलाला तुम्ही त्याची ट्युशन फी भरण्यासाठी कार्ड दिले असेल, तर अशा वेळी तुम्ही कार्डचीमर्चंटया कॅटेगरीवर इनॅक्टिव्ह केल्यास तो त्याच्या कॉलेज मध्ये कार्ड वापरू शकतो, परंतु त्या कार्डचा वापर तो शॉपिंग, हॉटेलिंग अशा वायफळ खर्चांसाठी करू शकणार नाही

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल? 

. ब्लॉक आणि अनब्लॉक: 

  • अनेकदा कार्ड हरवल्याचे लक्षात आल्यानंतर ते कार्ड ब्लॉक करण्यासाठी जेव्हा ग्राहक कॉल करतात तेव्हा त्यांच्याकडे कार्डचा नंबर, किंवा अकाउंट नंबर ही सर्व माहिती हाताशी उपलब्ध असेलच असं नाही आणि मग या सर्व गोष्टी शोधून कार्ड ब्लॉक करेपर्यंत ते कार्ड चोरणाऱ्याने त्याचा पुरेपूर गैरवापर केलेला असतो
  • या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना नेट बँकिंग अथवा मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की ते त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांचे कार्ड स्वतःच ब्लॉक आणि अनब्लॉक करू शकतात. म्हणजे समजा तुम्ही खूप शोधूनही तुम्हांला तुमचे कार्ड सापडत नसेल अशा वेळी सावधानतेच्या दृष्टीने तुम्ही ते ब्लॉक करू शकता आणि समजा ते तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवर मध्ये किंवा गाडीमध्ये सापडले की ते पुन्हा अनब्लॉक देखील करू शकता
  • याचा सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला तुमच्या कार्डचा गैरवापर होण्यापासून थांबवण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही आणि चुकून समजा कार्ड ब्लॉक केलेच, तर ते तुम्ही स्वतःच अनब्लॉक देखील करू शकता

क्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे

. आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर बंधने: 

  • आधी सांगितल्याप्रमाणे या व्यवहारांमध्ये ओटीपी वर अवलंबून राहता येत नसल्याने अशा प्रकारच्या गैरवापराचा फायदा उचलता येऊ शकतो. यातील धोका लक्षात घेऊनच बँकांनी आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर मर्यादा घालण्याची सुविधा ग्राहकांसाठी देऊ केली आहे.
  • तुमचा स्वतःचा काही परदेश दौरा नसेल किंवा काहीही कारणासाठी परदेशात तुमची कार्ड वापरायची सध्या काही शक्यता नसेल, तर तुमची कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी उपलब्ध ठेवणेच योग्य आहे.
  • बँकांनी वेळोवेळी कार्डसंदर्भात पाठवलेले मेसेजेस वाचावेत. तुमच्या कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी बँका अनेक प्रकारे तुम्हाला सहकार्य करत असतात. त्यामुळे तुमच्या कार्डसंदर्भात बँकेकडून आलेल्या कोणत्याही मेसेजकडे दुर्लक्ष करणे तोट्याचे ठरू शकते
  • शिवाय दर महिन्याला बँकेकडून कार्डचे स्टेटमेंट पाठवले जाते, ते स्टेटमेंट नीट वाचून समजून घेतलं पाहिजे आणि समजा तुम्ही कार्डवर केलेल्या व्यवहारांमध्ये आणि बँकेने पाठवलेल्या स्टेटमेंटमध्ये काही तफावत आढळल्यास तसे बँकेला त्वरित कळवले पाहिजे. 

. खात्री नसलेल्या लिंक्स वर क्लिक करू नका

  • अनेकदा बँकेच्या साधारण मिळत्या-जुळत्या नावाने तुम्हाला मेसेज किंवा इ-मेल येऊ शकतो ज्यामध्ये तुमची काही खाजगी डिटेल्स व्हेरिफिकेशनच्या कारणाने तुमच्याकडे मागितली जातात.
  • अशा कोणत्याही लिंक्स क्लिक करून तुमची गोपनीय माहिती देऊ नका याचा वापर करूनही तुमच्या अकाउंटवरील पैशांची अफरातफर केली जाऊ शकते.

क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

. कार्ड गहाळ झाल्यास: 

  • कोणत्याही कारणानेतुमचे कार्ड गहाळ झाले आहे अशी शंका आल्यास त्वरित बँकेला संपर्क साधून बँकेला याबद्दल सांगावे आपले कार्ड ब्लॉक करावे.
  • यामुळे इतर कोणी तुमचे क्रेडिट कार्ड मिळवून त्याचा दुरुपयोग करणार नाही. 

क्रेडिट कार्डची सुविधा आपल्या सोयीसाठी आहे. त्याचा वापर जपून केला नाही, तर सोय नाही, पण गैरसोय मात्र नक्की होईल. 

 For suggestions and queries – Contact us at [email protected] 

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Credit card use & precautions Marathi Mahiti, Credit card in Marathi, Credit Card Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.