मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

Reading Time: 2 minutes

आज कॅशलेसच्या काळामध्ये कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड वापरताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन फसवणूक देखील होऊ शकते. तर काही वेळेस बँकांच्या चुकांमुळे देखील आपल्याला दंड भरावा लागू शकतो. अनेकवेळा आपल्याला  क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेतो. मात्र,

तुम्हाला कधी मागणी न करताच क्रेडिट कार्ड मिळाले आहे का?

तुम्ही त्या कार्डचे काय केले? वापरले की तुकडे करून टाकून दिले?  

 • काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.
 • जर तुमच्या बाबतीत देखील अशी घटना घडली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही मागणी न करता अथवा तुमची लिखित परवानगी न घेता क्रेडिट कार्ड आले व त्या कार्डचा गैरवापर झाला असेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.
 • यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाच्या विरोधात तुम्ही न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. तसेच केस लढण्यासाठी आलेल्या खर्चाची देखील मागणी करू शकता.

आर के धिंगरा केस

 • अशीच घटना, २०१० साली दिल्ली येथे राहणाऱ्या आर के धिंगरा यांच्या बाबतीत घडली. धिंगरा यांनी क्रेडिट कार्डची ३०,०००/- रुपयांची  थकबाकी असल्याचे सांगत दिल्ली येथील कॅनरा बँकेने दिवाणी केस (Civil Case) दाखल केली.
 • बँकेने दाखल केलेल्या याचिकेनुसार धिंगरा यांनी १२ मार्च २००६ ते २१ मार्च २००७ दरम्यान क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. धिंगरा यांनी मात्र कार्डचा वापर केल्याचे नाकारले. तसेच, बँकेच्या नोटिसचे उत्तर देण्यास देखील नकार दिला.
 • बँकेने त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. मात्र कोर्टाने याचिका नाकारली. या विरोधात बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने देखील कोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळली.
 • कोर्टानुसार बँकेला तसेच धिंगरा यांनी कार्डसाठी केलेली लिखित मागणी व धिंगरा यांना कार्ड देण्यात आल्याचा योग्य पुरावा सादर करता आला नाही.

आरबीआयच्या परिपत्रकानुसार –

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जर ग्राहकाने मागणी केली नसेल तर क्रेडिट कार्ड दिले जाऊ नये. जर ग्राहकाने मागणी न करता देखील कार्ड दिले गेले व त्या कार्डचा गैरवापर झाला आणि त्यास बिल पाठवले गेले तर अशावेळेस बँकेने ते शुल्क मागे घ्यावे. तसेच कार्ड प्राप्तकर्त्याला आधी लावण्यात आलेल्या दंडाच्या दुप्पट रक्कम परत द्यावी.
 • अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे की, मागणी न करताच आलेल्या क्रेडिट कार्डचा आधीच गैरवापर करण्यात आलेला असतो. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, अशा कार्डमुळे नुकसान झाल्यास, त्यास  सर्वोतोपरी बँक व क्रेडिट कार्ड देणाऱ्या फायनान्स कंपन्या जबाबदार असतील. ज्या व्यक्तीच्या नावे कार्ड जारी करण्यात आले आहे त्या व्यक्तीस त्यासाठी जबाबदार धरले जाणार नाही.
 • कार्ड व त्याच्या बरोबर देण्यात येणाऱ्या वस्तूंचा उल्लेख हा स्पष्टपणे असणे गरजेचे आहे. तसेच क्रेडिट कार्ड देण्यापुर्वी अर्जदाराची लिखित परवानगी देखील आवश्यक आहे. लिखित परवानगी नसेल तर कार्ड देऊ नये.

मागणी न करता क्रेडिट कार्ड आले तर काय कराल ?

 • मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर सर्वात प्रथम ज्या बँकेकडून आले आहे त्या बँकेच्या आधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
 • त्यांच्याकडे क्रेडिट कार्डची मागणी केल्याचा लिखित पुरावा आहे का ते विचारा. त्यानंतर देखील प्रकरण थांबले नाही तर तुम्ही न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकता.

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…,  सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *