कच्च्या तेलाचे  ट्रेडिंग
https://bit.ly/3iv69RK
Reading Time: 3 minutes

कच्च्या तेलाचे  ट्रेडिंग 

व्यापारात वैविध्यता आणण्याचा पर्याय म्हणून गुंतवणुकदार कच्च्या तेलाचे ट्रेडिंग करण्याचा विचार करू शकतात. ही एक फायदेशीर वस्तू असून जागतिक बाजारपेठ असल्याने तिला आकर्षक मूल्यही आहे. आयातीवर अवलंबून असलेली वस्तू असल्याने तिचा दररोज व्यापार केला जातो. बाजारातील सर्व स्थितीत ही वस्तू चांगली कामगिरी करते, असे बाजारासंबंधी निरीक्षकांचे मत आहे.

तुमच्या बाजूने योग्य अशा, दैनंदिन बाजारातील उत्साही आणि उच्च घनतेच्या व्यापारामुळे कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत चांगला व्यापार करत उत्तम नफा कमावून देते. वस्तूंच्या किंमतीतील वैविध्य आणि प्रवाह कळल्यानंतर, कच्च्या तेलाचे शेअर्स हे महत्त्वपूर्ण आरओआय (ROI) कमावून देतात. मग ते शॉर्ट टर्म ट्रेड असो वा लाँग टर्मची धोरणे असोत, गुंतवणुकदारांना कोणताही पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

कच्च्या तेलाचे  ट्रेडिंग सुरु करण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी समजून घ्या:

  • जेव्हा तेलाचे उत्पादन आणि पुरवठा आव्हानात्मक स्थितीत असतो, तेव्हा अनेकदा किंमतीतील चढ-उतार दिसून येतात. त्यामुळे जगाच्या विविध भागात वेगवेगळे अनिश्चित परिणाम दिसून येतात.
  • देश त्यांची कर आकारणी आणि इंधन धोरणे त्यांच्या क्रूड आयात बिलानुसार, कॅलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतात. 
  • कच्च्या तेलावर आधारीत कंपन्यांसाठी, ज्यांच्या सेवा आणि उत्पादनाच्या किंमती तेलावरच आधारीत असतात, त्यांच्यावर याचा परिणाम होतो.
  • वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट (WTI) क्रूड आणि ब्रेंट क्रूड ही कमोडिटीजची दोन मानके आहेत, जे वजन, सल्फर कंपोझिशन, एक्स्ट्रॅक्शनचे ठिकाण आणि इतर घटकांवर आधारीत असतात.
  • भारतीय बाजाराच्या संदर्भात पाहता, ब्रेंट क्रूड ही कमोडिटीजचा व्यापार सामान्यपणे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MCX) किंवा नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्स एक्सचेंज (NCDEX) वर केला जातो. 
  • रिटेल गुंतवणुकदारांसाठी कमोडिटी ऑइल फ्यूचर्स ही संकल्पना कच्च्या तेलाचे शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते. 
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओएनजीसी इत्यादी तेल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यापार केला जातो. 
  • जागतिक ऊर्जा वापरामुळे कच्च्या तेलाची बाजारपेठ ही गतिमान असते. त्यामुळे दररोज होणाऱ्या व्यवहाराचे ज्ञान गुंतवणूकदारांनी घेतले पाहिजे.

कच्च्या तेलाचे  ट्रेडिंग – मागणी, पुरवठा आणि किंमतीवरील परिणामकारक घटक:

  • क्रूड तेल एमसीएक्सवर दररोज सामान्यपणे १०० बॅरल्स किंवा १० बॅरल्सच्या तुकड्यांमध्ये ३००० कोटी रुपयांवर व्यापार करते. 
  • आशादायी परताव्यासाठी यात लहान गुंतवणुकीची गरज असते, तरीही या व्यापारात खूप अनिश्चितता असते व तज्ज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
  • क्रूड ही भविष्यातील ट्रेड कमोडिटी असल्याने, गुंतवणुकदारांना दरमहा कराराची मुदत संपण्यासंबंधी माहिती असणे आवश्यक असते. 
  • विशेषत: दर महिन्यातील १९ आणि २० तारखेला सतर्क रहावे लागते. अंतिम तारखेपूर्वी त्यांच्या पोर्टफोलिओची स्थिती आखणे आवश्यक बनते.
  • नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्यविषयक संकटामुळे तेल क्षेत्र आणि उत्पादन युनिट बंद पडण्यामुळे तेलाचा तुटवडा भासतो किंवा अतिरिक्त पुरवठा होतो. 
  • सध्याच्या कोव्हिड-१९ च्या साथीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मागणी खुंटली होती, त्यामुळे तेलाच्या किंमती दीर्घकाळासाठी घसरल्या. 
  • जगभरात विमान वाहतूक नसल्याने आणि प्रमुख आयात देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने इंधन वापराची सर्वाधिक निचांकी पातळी गाठली गेली. 
  • उदा. विक्री कमी आणि पुरवठा अति झाला त्यामुळे खरेदी न झाल्यामुळे बाजारावर संकट आले. परिणामी, २० एप्रिल २०२० पर्यंत डब्ल्यूटीआय क्रूडचे दर सर्वाधिक खाली घसरून -४० डॉलर प्रति बॅरल झाले. 
  • हे मागणी व पुरवठ्याचे परिणाम आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतरच्या सुधारणेसंबंधीच्या परिणामांमध्ये वाढ झाली.
  • योग्य मार्गाने गुंतवणूक केल्यास, रिटेल गुंतवणुकदारदेखील २०० टक्क्यांचा नफा कमावू शकतो. फक्त त्यासाठी मागणी आणि पुरवठ्यातील खेळ सतर्कतेने समजून घेतला पाहिजे. 
  • तसेच, मध्य पूर्व संघर्ष असल्यास म्हणजेच सौदी अरबच्या तेल क्षेत्रावर इराणने कथित ड्रोल हल्ला केल्याच्या संदर्भात किंवा अमेरिका-चीन व्यापारातील तणावामुळे तेलाच्या किंमतींवर परिणाम होतो आणि जोखीमही वाढते. 
  • अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे चीन अमेरिकेकडून क्रूड खरेदी करत असेल, शांततेसंबंधी तडजोडीची शक्यता वाढली, तर कच्च्या तेलाच्या किंमतींवर पुन्हा परिणाम होईल. त्यामुळे भारतीय गुंतवणुकादारांनी जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे, विशेषत: कच्च्या तेलाच्या चढ-उतार करणा-या वस्तूत गुंतवणूक करताना ब्रोकरेज फर्ममधील तज्ज्ञांच्या मदतीने ध्येय धोरणे आखणे हेच सूज्ञपणाचे लक्षण आहे. 

तेल कंपन्यांचे हेजिंग धोरण आणि भारतातील वास्तव: 

  • कच्च्या तेलाचा व्यापार हा जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा व्यापाराचा जणू आरसा आहे. विमान कंपन्या, तेल कंपन्या, रिफायनरीज इत्यादी अनेकदा जगभरातील घटना, देशांतर्गत पातळीवरील साठवण क्षमता आणि क्रूड साठ्यातील कमी किंमतीचा फायदा यानुसार, जोखीम पत्करतात.
  • क्रूडच्या किंमतीत वाढ होऊ शकते, असा विश्वास असल्यास, ते हेजिंग स्ट्रॅटजी म्हणून बाजारात खरेदी करतात. कालमर्यादा व जागेनुसार ते असमर्थ असतील तर तेलाचे वायदे विकत घेतल्याने मदत होते. किंमत वाढते, तेव्हा अतिरिक्त संसाधने खर्च करण्याची गरज नसते, त्याद्वारे जोखीम कमी करता येते.
  • इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया इत्यादी विमान कंपन्या आवश्यक एव्हिएशन टर्बाइन इंधनात कच्च्या तेलाचा थेट वापर करतात. त्यांचे जोखीम कमी करण्याचे धोरण वैयक्तिक गुंतवणुकदारांसाठी उपयुक्त आहे. कारण ते तेल कंपन्या व विमान कंपन्यांवरील पिग्गीबॅकिंग आणि वस्तू्ंच्या स्थितीचा मागोवा घेतात.
  • सोने आणि चांदीच्या तुलनेत बाजारपेठाच्या आकाराच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठी वस्तू असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीतील बदल नोंद केला जातो. 
  • भारत, चीन आणि इतर अनेक आशियातील देश निव्वळ आयातकर्ता असल्याने ते तेलाचे वायदे ठेवत असतात. यात सतत चढ-उतार असल्याने नफ्याची अधिक संधी असते. तसेच, मध्य-पूर्वेतील अनेक देशांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणून तसेच जगभरात कच्च्या तेलाच्या व्यापारात अनेकांचे स्वारस्य असल्याने हा व्यापपार कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे.

जोपर्यंत कच्च्या तेलाची आयात करण्याची आवश्यकता असणारे देश आहेत, तोपर्यंत किंमती आणि कमोडिटीजमध्ये चढ-उतार असतो. हे अर्थव्यवस्थेसाठी पोषक वातावरण असते. भारतातील ८० टक्के वापर आयात केलेल्या क्रूडवर अवलंबून असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

श्री. अनुज गुप्ता.  

डीव्हीपी- कमोडिटीज अँड करन्सीज रिसर्च, 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…