Credit Card and CIBIL
Reading Time: 3 minutes

Credit Card and CIBIL

आपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

क्रेडिट कार्ड (Credit Card)

  • आजकाल प्रत्येक ठिकाणी  पैसे रोख रकमेच्या स्वरूपात जवळ ठेवणे तितकंसं सोपे राहिलेले नाही. म्हणून जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट हा  पर्याय निवडतात. त्यातील एक सर्वांना माहित असणारा पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड!
  • कॅशलेस इंडिया सारख्या काही सरकारी योजनांमुळे क्रेडिट कार्डचा वापर अजूनच वाढला आहे.
  • खरंतर क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्डचीच सुधारित आवृत्ती आहे, असं म्हटलं तरी चालेल. पण प्रत्येक गोष्टीच्या वापरावर काही नियम व अटी असतात.
  • क्रेडिट कार्डच्या वापराचे फायदे नक्कीच आहेत, परंतु ते वापरताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये काय फरक आहे ?

Credit Card and CIBIL:  सिबिल स्कोअरवर होणारा परिणाम 

  • क्रेडिट कार्डच्या उशीरा केलेल्या पेमेंटवरील व्याज दररोज वाढते. थकीत रक्कमेवर मासिक व्याज दरमहा ३-४℅ एवढं असू शकते. म्हणून आपण एकच दिवस किंवा एकच आठवडा उशीर केला हा कालावधी जरी आपल्याला कमी वाटत असला, तरी त्यावरील व्याजासहित होणारी रक्कम अपेक्षेपेक्षा मोठी असू शकते. 
  • थकीत देयकाची किमान रक्कम किंवा काही महिने पैसे न भरल्यास रक्कम नक्कीच जास्त असेल, शिवाय व्याजाचा भुर्दंड ही बसणारच. 
  • उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड च्या ६ महिन्याच्या पेमेंट सायकलचा विचार करू. समजा तुम्ही १ मे रोजी, क्रेडिट कार्डद्वारे १०००/- ची खरेदी केली , ज्याचं दरमहा व्याज ३℅ आहे. त्यानंतर पुढील ६ महिन्यांमध्ये थकीत रकमेच्या ५℅ किमान भाग पेमेंट भरण्याचे निवडल्यास त्या क्रेडिट कार्डवर ६ महिन्यासाठी तरी इतर खर्च करू नका. ६ महिन्यानंतर जेव्हा क्रेडिट कार्डचं पेमेंट करायचे असेल तेव्हा मूळ रकमेपेक्षा ५६℅ अधिक म्हणजे १६४०/- भरावे लागतील . 
  • कार्डवर आणखी कोणती खरेदी केली नाही, तरी थकीत रक्कम फेडण्यासाठी कमीतकमी हप्त्यांची निवड केली, तर परतफेडीसाठी जवळपास  ९ वर्षांचा काळ लागू शकतो. 
  • आपण किमान रक्कम न भरल्यास आपल्याला दोषी ठरविण्यात येतं व याचा प्रत्यक्ष परिणाम सिबिल स्कोअरवर होतो. म्हणून क्रेडिट कार्डच्या बिलाचे पैसे वेळेवर भरणे अधिक महत्त्वाचे आहे. 
  • क्रेडिट कार्ड वापरातील शेवटच्या २४ महिन्यांवरून आपला सिबिल स्कोअर ठरवण्यात येतो. 

Credit Card and CIBIL: सिबिल स्कोअर वर परिणाम करणारे प्रमुख घटक-  

क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत केलं नाही, तर याचा परिणाम थेट सिबिल स्कोअरवर होतो व तो आपल्या क्रेडिट कार्डच्या इतिहासाचा भाग होऊन खूप काळ तसाच राहतो. ज्यामुळे आपला सिबिल स्कोअर कमी होतोच पण याचा संबंध प्रतिष्ठेशी जोडला जातो. प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी संयमाने झटत असतो मात्र अशा काही गोष्टींमुळे ती  कमी होते. 

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?

आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तयार करणे- 

क्रेडिट स्कोअर पुन्हा तयार करण्यासाठी काही मार्ग आहेत ते खालीलप्रमाणे –

  1. क्रेडिट कार्डवरील थकबाकी पूर्णपणे भरली आहे याची खात्री करून घ्या. तुमची थकीत रक्कम जास्त असेल, तर याचा नकारात्मक परिणाम सिबिल स्कोअरवर तर होईलच, पण कर्जाच्या सापळ्यातही तुम्ही अडकले जाल. तसेच, अति उशीरा केलेल्या पेमेंटमुळे पेमेंटची नोंद ” सेटल्ड्” किंवा “रिटन ऑफ” अहवालात केली गेली, तर भविष्यात आपल्या संपूर्ण क्रेडिट कार्डच्या वापरावर परिणाम होऊ शकतो. 
  2. जर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डवर प्रलंबित थकबाकी असेल, तर एकत्रित व्याजदर टाळण्यासाठी तुम्ही कमी व्याजदराने वैयक्तिक कर्ज घेऊ शकता किंवा सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. तुमच्या मालमत्तेच्या रकमेच्या ५०-८० ℅ भागावर कर्ज मिळू शकते, तसेच म्युच्युअल फंड, एलआयसी मधील गुंतवणुकीवर कर्ज घेऊन सुद्धा क्रेडिट कार्ड व्याजाच्या जाळ्यात न अडकता त्याचं पेमेंट भरू शकता. 
  3. चुकवलेले पेमेंट किंवा थकबाकी व्यवस्थित भरण्यासाठी आर्थिक शिस्त असायला हवी. त्यासाठी काही सकारात्मक उपाय- 
    • प्रत्येक वेळी आपण क्रेडिट कार्डचं  पेमेंट वेळेवर केलं आहे का, याची खात्री करून घ्या.
    • अवाजवी कर्ज घेऊ नका, गरज आहे तेवढंच कर्ज घ्या.

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

Credit Card and CIBIL: सिबिल स्कोअरचे महत्त्व –

  • वैयक्तिक गरजा, स्टार्टअप, घराची खरेदी, नवीन कार घेणे अशा काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता असते. 
  • सर्रास सर्व स्तरातील लोक कर्ज घेतात. विविध बँकेकडून ऑफर्स दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात आपला सिबिल स्कोअर लक्षात घेऊनच या चांगल्या ऑफरचा लाभ देण्यात येतो. 
  • सावकारी कर्ज असो किंवा उसणे घेतलेले पैसे प्रत्येक व्यवहार आपली आर्थिक शिस्त आणि पत पाहूनच केला जातो. कुठलीही वेळ सांगून येत नसते असं म्हणतात, मग अशा संकटकाळात आर्थिक गरज असल्यास आपला सिबिल स्कोअर चांगला असेल, तर त्वरित कर्जाची सोय होऊ शकते. 
  • क्रेडिट कार्डच्या चुकवलेल्या बिलामुळे आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतात, तर नियमित पैसे भरले तर सिबिल स्कोअर चांगला राहतो. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Credit Card and CIBIL Score Marathi Mahit, CIBIL Score and Credit Card in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…