portfolio management
Reading Time: 3 minutes

Portfolio Management

आर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

सामान्यपणे प्रत्येक मालमत्ता वर्गातील तसेच वैयक्तिक जोखमीचा विचार करून वित्तीय सल्लागारामार्फत  गुंतवणूक सल्ला केल्या दिला जातो. ग्राहकाच्या रिस्क प्रोफाइलवर आधारीत, वित्तीय सल्लागार असेट अलोकेशन स्ट्रॅटजीची निश्चित करतात. जेणेकरून संबंधित रिस्क प्रोफाइलनुसार जास्त परतावे मिळू शकतात. बहुतांश बाजाराची संधी साधण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुढील ५ घटकांवर भर दिला पाहिजे 

हे नक्की वाचा: PMS – पोर्टफोलिओ मॅनेजमेंट योजना म्हणजे काय?

Portfolio Management: ५ महत्वाचे घटक 

१. देशांतर्गत शेअर्समध्ये गुंतवणूक: 

 • स्टॉक मार्केट निर्देशांक ही एक आर्थिक मालमत्ता असून यासाठी वेगळी ओळख देण्याची गरज नाही. कारण यावर लिस्टेड कंपन्यांना त्यांचा बिझनेस व वित्तीय बातम्या दररोज प्रकाशित कराव्या लागतात. 
 • ट्रेडिंग काळात गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष शेअर्स खरेदी अथवा विक्री करता येते. 
 • एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा, विशिष्ट संख्येत, ते गुंतवू शकतील एवढ्या पैशांमध्ये व्यापार करू शकतात. त्याचप्रमाणे, गुंतवणूक ही म्युच्युअल फंडांद्वारेही करता येईल. 
 • स्टॉक्सच्या प्रकारानुसार अल्पकालीन/ दीर्घकालीन परतावे मिळतात. 
 • थेट इक्विटीशी तुलना करता, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा सामान्यपणे सुरक्षित मार्ग समजला जातो. 
 • २५-५० स्टॉक्सच्या विविध फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते आणि अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यवसायिक फंड मॅनेजरकडून ते व्यवस्थापित करता येतात.

२. कमी जोखीमीचे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज: 

 • कमी जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदाराकडे निश्चित उत्पन्न हा व्यवहार्य पर्याय आहे. 
 • सेवानिवृत्तीसाठी आदर्श आणि अधांतरी साधनांमध्ये अडकून न राहता निश्चित व्याजदराची हमी यात मिळत असल्याने इक्विटीच्या तुलनेत अपेक्षित परतावे मिळतात. 
 • निश्चित उत्पन्न गुंतवणुकदारांकडे सरकारी व कॉर्पोरेट बाँड्स, फिक्स डिपॉझिट्स, फिक्स इन्कम म्युच्युअल फंड्स इत्यादीसारखे अनेक विस्तृत पर्याय असतात. 
 • कॉर्पोरेट बाँड्समध्ये सुरक्षित बाँड होल्डर्सना कंपनी दिवाळखोरीत निघाली तरीही इतर शेअरहोल्डर्सच्या आधी परतावे मिळतात. 
 • सरकारी बाँड्सच्या माध्यमातून केलेली वैविध्यतेतील गुंतवणूक अधिक फायदेशीर व विश्वसवीय असते. कारण त्यात सार्वभौम हमी असते आणि डिफॉल्टचा धोकाच अंशत: नगण्य असतो. 

महत्वाचा लेख: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनाच्या ५ स्टेप्स

३. अनिश्चितेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक: 

 • गुंतवणुकीचा उतकृष्ट पर्याय म्हणून सोन्याने नेहमीच भारतीय गुंतवणुकदारांना आकर्षित केले आहे. 
 • सोने खरेदी करण्याची हजारो वर्षांची परंपरा आजही सुरूच आहे. कारण सुरक्षेचे साधन म्हणून गुंतवणूकदार याकडे पाहतात. तर काही कुटुंबांमध्ये सोन्याची मालमत्ता पिढ्यान् पिढ्या जपली जाते. 
 • विशेष म्हणजे, या मौल्यवान धातूत गुंतवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
 • आता आपल्याकडे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात म्हणजेच गोल्ड बाँड्स, गोल्ड ईटीएफ, गोल्ड कॉइन्स, बार्स इत्यादींमध्ये उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफ हे आता डिजिटल पेमेंट पर्यायाद्वारेही खरेदी-विक्री केले जातात. 
 • सोन्यातील शुद्ध स्वरुपानुसारच त्यांच्या शुद्धतेचे मूल्य असते. तसेच सुरुवातीला अगदी एक ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणातही त्याचा व्यापार करता येतो. 
 • खरेदीचे अनेक पर्याय सोन्यात असतातच, पण सोने हे आर्थिक संकट किंवा सध्याच्या कोव्हिड-१९ सारख्या महागाईच्या काळात उतारा म्हणून मदत करते. 
 • यादृष्टीने मागील दशकभरातील सोन्याच्या किंमतीवर लक्ष घातले असता, ही किंमत मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे महत्त्वाचे मानले जाते. 

४. आंतरराष्ट्रीय इक्विटीमध्ये गुंतवणूक: 

 • भारतीय इक्विटीतून गुंतवणुकीद्वारे जसे परतावे मिळतात, त्याचप्रमाणे नॅसडॅक१००, एनवायएसई, डाऊ जोन्स इंडस्ट्रीअल व्हरेज इत्यादीसारख्या अमेरिकी निर्देशांकातील गुंतवणूकीद्वारे वैविध्यीकरणातून चांगली संधी मिळू शकते, हे सर्वांनाच माहिती आहे. 
 • उदा. २०१० ते २०२० या १० वर्षांच्या कालावधीत डाऊ जोन्स आणि बीएसई सेन्सेक्सची तुलना केली असता डाऊ जोन्सने १९६% तर बीएसई सेन्सेक्सने १५०% परतावा दिला. तरीही अनेक शीर्ष स्टॉक्स भारतीय गुंतवणूकदारांपासून दूरच राहतात, ही समस्या असते. 
 • अशा स्थितीत फ्रॅक्शनल ट्रेडिंग हा पर्याय रिटेल गुंतवणूकदारांसाठीही उपलब्ध आहे. गुंतवणूकदार एका शेअरमध्ये १ डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवून शेअरचा एक भाग खरेदी करू शकतो. 
 • आरबीआयने यासाठी २५०,००० डॉलर्सची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.

५. विम्यात गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करणे: 

 • वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा विम्यात गुंतवणूक करणे, हा सुरक्षित मार्ग समजला जातो. 
 • कोणतीही अनुचित घटना किंवा जीवघेणा आरोग्यदायी आजार सुरक्षितरित्या हाताळला जातो. कारण विम्याद्वारे लोकांचे भरमसाठ वैद्यकीय खर्चापासून संरक्षण होते. अगदी करांच्या बाबतीतही विम्यातील गुंतवणूक वरदान ठरू शकते. कारण त्यातून मिळणाऱ्या लाभांवर कर लावला जात नाही. 
 • टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स वैयक्तिक व कुटुंबासाठी दीर्घकाळाकरिता लाभदायक ठरते. तसेच, विविध विमा सेवा प्रदात्यांकडून अनेक प्लॅन्स दिले जातात. नोकरदारांना मासिक प्रीमियम भरणे किफायतशीर ठरू शकते.

श्री. ज्योती रॉय

इक्विटी स्ट्रॅटजिस्ट

 एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Portfolio Management in Marathi, Portfolio Management Marathi Mahiti, Portfolio Management Marathi, Portfolio Management in Marathi kashi karaychi, Portfolio Management mhanaje kay

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…