अर्थसाक्षर HDFC आदित्य पुरी
https://bit.ly/2Q5FBKd
Reading Time: 2 minutes

आदित्य पुरी

१९९४ पासून म्हणजे मागील २६ वर्षांपासून श्री. आदित्य पुरी हे HDFC बँकेचे सीईओ (CEO) म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यकालावर मर्यादा आणल्या आहेत. यानुसार श्री. आदित्य पुरी यांचा HDFC बँकेमधील कार्यकाल यावर्षाच्याअखेरपर्यंत संपुष्टात येतो आहे. त्यांनतर त्यांची जागा श्री. शशिधर जगदीशन हे घेतील. आजच्या या लेखातून श्री. आदित्य पुरी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य 

आदित्य पुरी –

 • २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे रु. १८.९ कोटी वार्षिक उत्पन्न असणारे सीईओ म्हणून श्री. पुरी प्रकाशझोतात आले आहेत. 
 • खाजगी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ICICI बँकेने, २०१९ या आर्थिक वर्षात त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ४.९ कोटी रुपये इतकी रक्कम वार्षिक वेतन म्हणून दिली होती. इतर आर्थिक संस्था आणि त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या वेतनाशी तुलना करता ही रक्कम बरीच मोठी आहे.  
 • यामध्ये जर सरकारी बँकांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचे याच वर्षातील वार्षिक वेतन विचारात घ्यायचे म्हटले, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्याधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन त्या तुलनेत अगदीच तुटपुंजे म्हणजे केवळ रु.२९.५३ लाख इतके होते. 
 • भारतातील सर्वांत मोठ्या बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दृष्टीने ही रक्कम कितपत न्याय्य आहे? यावर खूप मोठ्या प्रमाणावर खल सुरु आहे.
 • अनेक वर्षे एकाच संस्थेसाठी काम करणे, मोठी रक्कम वेतन म्हणून घेणे यामागचे रहस्य काय आहे? या यशाच्या शिखरापर्यंतचा प्रवास कसा होता? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 

राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

आदित्य पुरी यांच्या यशाचा प्रवास –

 • ७० वर्षीय श्री. आदित्य पुरी, यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. 
 • १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला श्री. आदित्य पूरी यांनी सिटीबँक, मलेशिया येथील चांगली नोकरी सोडून HDFC समूहातील नव्याने स्थापन होऊ घातलेल्या बँकेच्या उभारणीसाठी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
 • त्यानंतर पुढील अडीच दशकात त्यांनी बँकेचा चेहरामोहराच बदलवून टाकला आणि आज HDFC ही बुडीत कर्जाचे प्रमाण सर्वांत कमी असणारी असणारी बँक आहे. 
 • HDFC बँकेचे शेअर मार्केट व्हॅल्युएशन रु. 5.76 लाख कोटी इतके आहे. तर  होल्डिंग कंपनी असलेल्या HDFC Ltd चे व्हॅल्युएशन यापेक्षाही कमी म्हणजे मात्र रु. 3.08 लाख  कोटी  इतके आहे
 • आदित्य पूरी त्यांच्या खास पद्धतीने काम करण्यासाठी ओळखले जातात. याला अधोरेखित करणारी एक आठवण आवर्जून सांगितली जाते. 
 • आदित्य  पुरी सिटीबँकेच्या दिल्ली विभागात काम करत असताना, श्री. नानू पमनानी हे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
 • पमनानी हे कायम कामात व्यस्त असणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उद्दिष्टे  देऊन काम करून घेण्याच्या कार्यपद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्यासाठी ते सतत पाठपुरावा करत असत.. 
 • यावर एकदा पूरी त्यांना म्हणाले की, “तुम्हाला किती नफ्याची अपेक्षा आहे?” आणि पमनानींच्या उत्तराची वाटही न पाहता ते स्वतःहून म्हणाले की, “५० टक्क्यांहूनही जास्त नफा झाला तर?” पमनानी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. 
 • त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यावर पुरी यांनी अशी अट घातली की सतत त्यांना त्यांच्या कामाचा रोजचा लेखाजोखा मागायचा नाही. अश्या प्रकारे  काही काळातच त्यांनी बँकेला अपेक्षित उद्द्दीष्ट्ये प्राप्त करून दिली. यावरून आदित्य पुरी यांच्या काम करायच्या स्वतःच्या निराळ्या कार्यशैलीचे दर्शन होते 
 • परिणामस्वरूप आज HDFC बँकेचा समावेश जगातील सर्वांत मोठ्या १००ब्रँड्स मध्ये झालेला आहे. 

इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

आदित्य पूरी यांनी अनेक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यातील HDFC बँकेचे शेअर्स त्यांनी कर्मचारी स्टॉक ऑपशन्स मधून मिळाले आहेत आणि आज त्यांचे मूल्य पाहता ते तब्बल रु. 800 करोड इतके आहे. त्यांची एकूण संपत्ती एका छोट्या बँकेच्या एकूण आर्थिक उलाढालीपेक्षाही जास्त आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Aaditya Puri Marathi Mahiti, Aditya Puri of HDFC Bank in Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.