जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य

Reading Time: 2 minutes

जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य

कॉम्पुटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केल्यावर हुशार जेफ बेझोस याला इंटेल आणि बेल लॅब्स यासारख्या उच्च कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळाल्या होत्या पण त्या न स्वीकारता जेफने फिटेल या नुकत्याच स्थापना झालेल्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ती कंपनी सोडून बँकर्स ट्रस्ट मध्ये नोकरी करू लागला. 

राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…

 • वयाच्या ३० व्या वर्षी जेफ ६ आकडी पगार घेऊ लागला होता, अनेकांच्या दृष्टीने हा जीवनातील एक अत्यंत यशस्वी टप्पा होता.  
 • एकदा इंटरनेटवर काहीतरी पहात असताना त्याला अशी माहिती मिळाली की इंटरनेटचा वापर २३०० टक्क्यांच्या गतीने वाढतो आहे आणि त्या क्षणी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय जेफ बेझोस यांनी घेतला. 
 • त्यांनी त्यांची अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी ‘डी इ शॉ आणि कंपनी’ येथील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 
 • त्यांच्या बॉसेससोबत त्यांनी एक अशी कंपनी सुरु करण्याबद्दल चर्चा केली होती की जिथे लोक इंटरनेटवरून वस्तू विकत घेता येऊ शकतील, ही कल्पना त्यांनाही आवडली होती. 
 • तरीही, ‘इतकी चांगली नोकरी सोडून अशी कोणतीही कंपनी सुरु करण्याच्या भानगडीत ‘तू’ पडू नकोस, ज्याच्याकडे इतकी चांगली नोकरी नाहीये त्याला करुदे’ असे त्यांचे मत झाले आणि म्हणून जेफ यांनी ती नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी…

अमेझॉनची सुरुवात: 

 • सुरुवातीला जेफ बेझोस आपल्या कंपनीला “कॅडब्रा” असे नाव देणार होते पण नंतर ‘अमेझॉन’ हे नाव ठरलं. 
 • जेव्हा सगळं जग ‘इंटरनेट कसे वापरायचे?’ हे शिकण्यात गर्क होते तेव्हा जेफ इंटरनेट वर किरकोळ व्यापार सुरु करण्यावर काम करत होते. 
 • याच उद्देशाने जेफ सिऍटल ला जाऊन तिथे त्यांनी त्यांच्या पत्नी आणि २ प्रोग्रॅमर्स सोबत त्यांच्या गॅरेजमध्येच काम सुरु केले. त्यांची पहिली विक्री म्हणजे पुस्तके, जी आधी त्यांच्या ग्राहकांनी खरेदी केली आणि मग त्या पैशांनी त्यांनी खरेदी करून ग्राहकांना पोहोचवली. 
 • अमेझॉनला स्पर्धा करण्यात काहीही रस नव्हता, तर त्यांचे लक्ष्य त्याच्या ग्राहकांना सर्व सुविधा वेळेत पोहोचवणे आणि या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे प्राधान्याचे होते. 
 • सुरुवातीची काही वर्ष त्यांचे स्पर्धक त्यांना सतत धमक्या देत असत आणि कंपनीही तोट्यात सुरु होती, आलेल्या ऑर्डर्स जेफ स्वतः नीट पॅक करायचे काम करीत. 
 • पहिली ३ वर्षे तर लोक अमेझॉन खात्रीने बंद पडणार असे म्हणून अमेझॉन.बॉम्ब”, “अमेझॉन.टोस्ट”, “अमेझॉन.कॉन ” अशा नावांनी चिडवीत असत. 
 • त्यानंतर गुगल चे संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गेय ब्रिन यांनी अमेझॉन मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जेफ यांना नफा होऊ लागला. 

जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”…

अमेझॉनच्या यशाची रहस्ये:

१. चांगली टीम निर्माण करणे: 

अमेझॉनमध्ये नोकरी मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेमधून जावे लागते आणि तिथे नोकरी करण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांना प्रश्नांची अशा प्रकारे उत्तरे देणे अपेक्षित असते की ज्यामधून उत्तर चुकीचे असले तरी त्यातून त्यांची चतुरता दिसेल.

२. गरजेप्रमाणेच खर्च करा: 

आजच्या व्यवसायांच्या नियमांच्या अगदी विरुद्ध नियम म्हणता येईल हा. जे खर्च आवश्यक आहेत ते केलेच पाहिजेत पण विनाकारण असणारे खर्च टाळले पाहिजेत. तात्पुरत्या सोयींसाठी केलेले खर्च हे नंतर महागात पडू शकतात.

३. केलेल्या चुकांमधून शिका: 

अमेझॉनमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात त्यातले काही यशस्वी होतात, तर अनेक प्रयोग चुकतात देखील. जेफ यांच्या मतानुसार प्रयोगांशिवाय कधीही प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करत राहायचे पण झालेल्या चुकांमधून नेहमी काहीतरी शिकायचं आणि पुढे जायचं.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा…

४. खंबीर रहा: 

जीवनात ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची यादी करून ती सहज तुमच्यासमोर राहील अशी ठेवा आणि हे कायम लक्षात ठेवा की जीवनात या गोष्टींशिवाय इतर कोणत्याही बाबतीत बदल होऊ शकतात. या गोष्टींच्या बाबतीत नेहमी खंबीर रहा.

५. नेहमी मोठा विचार करा: 

अमेझॉनला कधीही फक्त पुस्तक विक्रीमध्येच काम करायचं नव्हतं किंवा फक्त एक ऑनलाईन विक्री करणारे दुकान अशीही ओळख नको होती. अमेझॉन ही तर फक्त सुरुवात होती. २००० साली, जेफ बेझोस यांनी ब्लू ओरिजिन नावाची अंतरीक्षामध्ये संशोधन करणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली, हे या तत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)…

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *