आत्मविश्वास हरवतोय? -आत्मविश्वासाला तडा देणाऱ्या गोष्टी आणि त्यावर मात करायचे पर्याय

Reading Time: 2 minutes

आत्मविश्वास हरवतोय?

‘आत्मविश्वास’ हा प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. काही लोकांमध्ये इतका दृढ आत्मविश्वास असतो की ते त्यांच्या कामाने, बोलण्याने इतरांचाही आत्मविश्वास वाढवतात. परंतु काही जणांच्या बाबतीत मात्र हे एकदम विरुद्ध असते. म्हणजे त्यांचे काम चांगले असेल तरी ते सतत स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल सतत शंका घेत राहतात. त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या प्रगतीतील फार मोठा अडथळा ठरू शकतो. म्हणजे एखादे काम करण्याची क्षमता असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे ते कितीतरी चांगल्या संधी गमावण्याची शक्यता असते. तर, आज आपण असेच काही घटक पाहणार आहोत ज्यांच्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होत असतो.

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १

आत्मविश्वासाला  तडा देणाऱ्या गोष्टी

१. कामामध्ये मन न लागणे: 

 • कामामध्ये मन लागत नसल्यामुळे केलेल्या कामाबद्दल आत्मविश्वास वाटत नाही. 
 • तुमच्या कुवतीचा, कौशल्यांचा वापर तुमच्या कामामध्ये पूर्णपणे होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर आत्मविश्वास कमी होतो. 
 • याशिवाय कामामध्ये, रोजच्या दिनचर्येमध्ये जर एकसुरीपणा आला, तरीही कामामध्ये रस वाटत नाही. यामुळेही आत्मविश्वास कमी होतो. 
 • अशावेळी तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा तुमच्या वरिष्ठांशी याबद्दल बोलल्यावर यावर काही तोडगा निघू शकतो. अथवा या समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला, थोडा सकारात्मक बनवला, काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला, तर याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग -भाग २

२. परिपूर्णतेचा आग्रह: 

 • ऑफिसमध्ये चांगल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचा प्रत्येक वेळी प्रत्येक कामामध्ये ‘मी सर्वोत्तमच असायला पाहिजे’ असा आग्रह असतो. पण प्रत्येकवेळी ते तसे होईलच असे नाही आणि त्यावेळी त्यांना नैराश्य येते. 
 • ‘आपण कुठेतरी कमी पडत आहोत का?’ अशी शंका ते स्वतःच स्वतःबद्दल घेऊ लागतात. 
 • हे अन्यायकारक आहे. अशा वेळी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ‘आपण माणूस आहोत, मशीन नाही’ आणि त्यामुळे ‘प्रत्येक गोष्टींमध्ये आपण सर्वोत्तमच असायला हवे’ हा आग्रह योग्य नाही. 

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

३. सहकार्य न करणारे कर्मचारी: 

 • ज्यांच्यासोबत तुम्ही काम करत आहात ते कर्मचारी जर उर्मट, कोत्या मनाचे किंवा ‘मी’ पणा असलेले असतील, तरीदेखील चांगल्या कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास ढळू लागतो. 
 • त्यातही ते लोक जर विशेषतः कोणा एका कर्मचाऱ्याच्या बाबतीतच जर असे वागत असतील, तर त्यांच्या अशा वागण्याचा त्या कर्मचाऱ्याला नक्कीच जास्त त्रास होत असतो. 
 • अशावेळी त्या लोकांकडे फार लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे जास्त सोयीचे होते अथवा सरळ तुमचे सहकारी बदलून घेणे आणि ज्यांच्यासोबत काम करणे सोईचे असते त्यांच्यासोबत काम करावे. 

४. छोट्या छोट्या गोष्टींवर बॉसचे नियंत्रण व सूचना: 

 • तुम्हाला कामाच्या बाबतीत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा जर बॉस सूचना देत असेल, त्यावर त्यांचे नियंत्रण असेल तरीदेखील असा विचार मनात येत राहतो की ‘माझ्यामध्ये काही कमी आहे का?” वगैरे. 
 • अशावेळी त्या गोष्टीकडे फार लक्ष न देता आपण आपले काम चोख आणि वेळेवर पूर्ण करत आहोत ना याकडे लक्ष द्यावे.

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

५. हरण्याची भीती: 

 • कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना भीती वाटणे साहजिक असते परंतु त्यामुळे जर तुम्ही ती गोष्ट करण्याचे धाडस केले नाही, तर तुमची प्रगती कशी होणार? 
 • उदाहरणच पाहायचे झाले तर अनेकजण मिटिंग मध्ये बोलायला, एखादे प्रेझेंटेशन द्यायला, ग्राहकांना भेटायला त्यांच्याशी अगदी फोनवर बोलायलाही घाबरतात. 
 • त्यांना असे वाटते की आपण काही चूक केली तर? आपले बोलणे नाही आवडले तर? या भीतीपोटी त्यांनी नीट तयारी केलेली असूनही ते पुढाकार घ्यायला कचरतात. परंतु यामुळे ते स्वतःच्याच प्रगतीमध्ये खूप मोठा अडथळा निर्माण करत असतात. 
 • अशा वेळी थोडे धाडस करून पुढाकार घेतल्यास आत्मविश्वास नक्कीच वाढतो.

‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

नोकरी असो व व्यवसाय असो, वर दिलेल्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठे लागू पडणारच. यापैकी तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अनुभव आला आहे किंवा येत आहे आणि त्यावर तुम्ही काय उपाय योजना करू शकता हे आज तुमच्या लक्षात आले असेलच!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 4 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *