Akasa Airline
शेअर मार्केटवर आपली एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर राकेश झुनझुनवाला हे सर्वात अवघड असलेल्या ‘विमान सेवा’ (Akasa Airline) पुरवण्यात आपलं व्यवसाय कौशल्य वापरणार आहेत. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भारताचं लक्ष लागून राहिलेलं असतं.
हे नक्की वाचा: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह
‘आकासा एअरलाईन्स (Akasa Airline)-
- ‘आकासा एअरलाईन्स’ या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या कंपनीत येत्या चार वर्षात ७० विमानांचा ताफा असेल, अशी घोषणा राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच केली आहे.
- १८० प्रवासी एका वेळेस विमानाने कमीतकमी दराने प्रवास करू शकतील असे छोटे विमान लोकांसाठी उपलब्ध करून देणे हा राकेश झुनझुनवाला यांचा या प्रकल्पाकडून उद्देश आहे.
- ‘आकासा एअरलाईन्स’ची तांत्रिक बाजू भक्कम करण्यासाठी ‘डेल्टा एअरलाईन्स’चे वरिष्ठ अधिकारी राकेश झुनझुनवाला यांच्यासोबत काम करणार आहेत.
- ३५० कोटी यूएस डॉलर्स (२६० कोटी रुपये) इतकी गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या व्यवसायात राकेश झुनझुनवाला हे ४०% मालक असणार आहेत.
- ‘फोर्ब्स’ मासिकात उल्लेख केलेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांची सध्याची वैयक्तिक संपत्ती ही ४.६ बिलियन यूएस डॉलर्स म्हणजेच ३४ हजार कोटी रुपये इतकी आहे.
- भारतीय हवाई खात्याकडून ‘आकासा एअरलाईन्स’ या प्रकल्पाला संबंधित ‘ना हरकत परवानगी’ ही लवकरच मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
- ‘जेट एअरवेज’, ‘किंगफिशर एअरलाईन्स’ सारखे प्रस्थापित विमानसेवा पुरवणाऱ्या संस्था आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना ‘आकासा एअरलाईन्स’चा या व्यवसायाचा प्रवास कसा असेल, हे बघणं उद्योग जगतासाठी महत्वाचं असणार आहे.
महत्वाचा लेख: जगातील शीर्ष १०० धनकुबेरांमध्ये डिमार्टच्या राधाकिशन दमानींचा समावेश !.
राकेश झुनझुनवाला आणि विमान व्यवसाय
- राकेश झुनझुनवाला यांचे स्पाईस जेट आणि ‘जेट एअरवेज’मध्ये ‘१.०५%’ या प्रमाणात शेअर्स आहेत.
- राकेश झुनझुनवाला यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्टपणे संगीतलं आहे की, “भारतीय हवाई संरक्षक दलाच्या नियम व अटींवर मी खूप नाराज आहे.
- जागतिक पातळीवर सध्या विमान वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. या परिस्थितीत काही नियमांमध्ये बदल होणं नक्कीच गरजेचं आहे.”
- विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा आणि खर्च कमी ठेवण्याकडे असलेला दबाव हे आव्हान स्वीकारून राकेश झुनझुनवाला यांनी सध्याच्या परिस्थितीत ‘आकासा एअरलाईन्स’ बद्दल घेतलेला हा निर्णय त्यामुळे महत्वाचा मानला जात आहे.
- कोरोना नंतरचा काळ सर्व क्षेत्रांसाठी जपून निर्णय घेण्याचा आहे असं सर्व तज्ज्ञांचं मत आहे. विशेषतः विमान सेवा क्षेत्रातील मोठं नाव असलेलं ‘विस्तारा’ हे जेव्हा आपल्या सहकारी बोईंग कंपनी ‘एअरबस एसई’ला पैसे परत देण्यासाठी मुदतवाढ मागते त्यावरून परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकतं.
- ‘इंडिगो’ या भारताच्या सर्वात मोठ्या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कंपनीचा दाखवलेला आर्थिक तोटा हा या परिस्थितीला दुजोरा देणारा आहे.
- राकेश झुनझुनवाला मात्र कोरोना नंतर परिस्थिती बदलेल यासाठी प्रचंड आशावादी आहेत.
- “भारतीय मार्केट हे ज्या पद्धतीने वाढत आहे त्यानुसार जलद, स्वस्त विमानसेवा ही येणाऱ्या काळाची गरज असणार आहे” असा ‘बिग बुल’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचा अभ्यास सांगतो.
महत्वाचा लेख: भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!
राकेश झुनझुनवाला यांची ‘आकासा एअरलाईन्स’ ही कंपनी भारतीय विमानसेवा व्यवसायातील अनिश्चीततेचं असलेलं सावट दूर करेल अशी आशा करूयात.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Akasa Airline in Marathi, Akasa Airline Marathi Mahiti, Akasa Airline Marathi