Reading Time: 3 minutes

काही ब्रँड खास असतात. त्या ब्रँडची वस्तू वापरणे म्हणजे ‘स्टेट्स सिम्बॉल’ असं अनेकांना वाटतं.

स्मार्टफोनने आयुष्यात अनेक बदल घडवले. आजपर्यंत अनेक कंपन्या ‘मोस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या स्पर्धेत आल्या आणि गेल्या. पण या साऱ्या गदारोळात एक कंपनी आपले अव्वल स्थान टिकवून आहे. ती कुठली हे तुम्ही ओळखलंच असेल. बरोबर! ती कंपनी आहे “ॲपल आयफोन(Apple iPhone )”!

भारतीय शेअर बाजारात नोंदल्या गेलेल्या सर्व कंपन्यांचे मिळून जे काही “मार्केट कॅपिटल” असेल त्याच्या जवळपास निम्मं व्हॅल्यूएशन म्हणजे तब्बल ७२ लाख कोटी रुपये म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर्स इतके एकट्या ॲपलचे आहे.

 सध्या चर्चा आहे ती ॲपल कंपनीने नव्याने लॉंच केलेल्या आयफोन ११ सीरिजची. सदर सिरीजचे तीन फोन लाँच करण्यात आले आहेत – ॲपल आयफोन ११ (iPhone 11), आयफोन ११ प्रो (iPhone 11 Pro) आणि आयफोन ११ प्रो मॅक्स (iPhone 11 Pro Max). कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ही  मॉडेल लॉंच करण्यात आली.

आयफोन ११ सिरीजमध्ये एवढं काय खास आहे?

आयफोन म्हणजे प्रचंड महाग हा सर्वसामान्यांचा समज आहे आणि तो बरोबरही आहे. पण हे फोन एवढे महाग का आहेत? याचं उत्तर आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान.

या लेखात आपण आयफोन ११  सिरीजची वैशिष्ट्ये (Specifications ) जाणून घेऊया.

  • प्रोसेसर: या तिन्ही मॉडेल्समध्ये  A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर आतापर्यंतच्या स्मार्टफोनमधील सर्वात वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • बॅटरी: या नव्या फोनमध्ये ‘बॅटरी लाईफ’ही चांगले आहे. आयफोन ११ व आयफोन ११ प्रो मध्ये आयफोन ११XS च्या तुलनेत ४ तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. आयफोन ११ प्रो मॅक्स मध्ये आयफोन XS Max च्या तुलनेत पाच तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. 
  • मेमरी: आयफोनची खासियत म्हणजे भरभरून मिळणारी मेमरी. ‘इनसफिशिएन्ट स्टोरेज स्पेस’चं दुःख आयफोन वापरणाऱ्यांच्या वाट्याला कधीच येत नाही. 
    • आयफोन ११ (iPhone 11) ६४ जीबी
    • आयफोन ११ प्रो (iPhone 11 Pro) – १२८ जीबी
    • आयफोन ११ प्रो मॅक्स (iPhone 11 Pro Max) – २५६ जीबी मेमरी
  • डिस्प्ले: यापूर्वी लाँच करण्यात आलेला आयफोन एक्सआर (iPhone XR) अनेकांना माहिती असेल,आयफोन ११ हा फोन त्याप्रमाणेच आहे. पण याला देण्यात आलेला डिस्प्ले मात्र वेगळा आहे. 
    • आयफोन ११: ६.१ इंचाचा एलसीडी (LCD) रेटिना डिस्प्ले. 
    • आयफोन ११ प्रो: ५.८ इंचाचा ओएलइडी (OLED) डिस्प्ले 
    • आयफोन ११ प्रो मॅक्स: ६.५ इंचाचा ओएलइडी (OLED) डिस्प्ले 
  • कॅमेरा: अनेकांचे हे सर्वात आवडते फिचर.  स्मार्टफोन खरेदी करताना काहीजण तर, सर्वात आधी हे फिचर बघतात.
    • आयफोन ११ (iphone 11): यामध्ये १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे असून, मुख्य कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर, दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. तसेच, यामध्ये नाईट मोड फीचर देण्यात आले आहे. याशिवाय, ६४fps ने याद्वारे ४K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार आहे.
    • आयफोन ११ प्रो (iPhone 11 Pro) आणि आयफोन ११ प्रो मॅक्स (iPhone 11 Pro max): या दोन्ही मॉडेल्समधली विशेष गोष्ट म्हणजे  त्यामध्ये देण्यात येणारे ट्रिपल कॅमेरा सेटअप! आयफोन ११ प्रो मध्ये ६०fps ने ४K व्हिडीओ शूटिंग करू शकतो. यामध्ये १२ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा F 1.8 लेन्ससह देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा F2.4 लेन्सह अल्ट्रा वाईड आणि तिसरा कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा F 2.0 लेन्ससह झूम लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन ११ प्रो मध्ये 4x ऑप्टिकल झूमदेखील देण्यात आले आहे. तसेच, अजून महत्वाचे फिचर म्हणजे, डीप फ्युजन कॅमेरा फीचर! याचा वापर लो लाईट फोटोग्राफीसाठी करता येणार आहे. हे फिचर ‘नाईट साईट फीचर’ प्रमाणेच काम करेल. एकाचवेळी ९ फोटो क्लिक करून मर्ज करण्याचे काम या फीचरद्वारे करण्यात येते.
  • रंग: 
    • आयफोन ११: यामध्ये  ब्लॅक, व्हाईट, ग्रीन, पर्पल, येलो आणि रेड असे रंग  उपलब्ध असतील.
    • आयफोन ११ प्रो व आयफोन ११ प्रो मॅक्स: हे दोन्ही फोन स्पेस ग्रे, सिल्व्हर/ व्हाईट,गोल्ड आणि मिडनाईट ग्रीन अशा रांगांमध्ये उपलब्ध असतील.
  • किंमत: 
    • आयफोन ११: ६९९ डॉलर्स. भारतामध्ये रु. ६४,९००/-
    • आयफोन ११ प्रो: ९९९ डॉलर्स. भारतामध्ये रु. ९९,९००/-
    • आयफोन ११ प्रो मॅक्स: १०९९ डॉलर्स. भारतामध्ये रु. १,०९,९००/-

आयफोनची ही नवी सिरीज भारतामध्ये या महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबर अखेरपर्यंत लाँच करण्यात येईल (अपेक्षित तारीख २७ सप्टेंबर). 

आयफोन म्हणजे स्टेट्स सिम्बॉल, आयफोन म्हणजे शान, आयफोन हा खरा फोन असं म्हणताना त्यामध्ये असलेली फीचर्स आपल्याला खरंच हवी आहेत का? याचा विचार हजारो, लाखो रुपये खर्चून आयफोन खरेदी करण्यापूर्वी नक्की करा. 

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २

बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.