राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा

Reading Time: 4 minutesमोठा भ्रष्टाचार हा प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरून सुरू होतो आणि तळागाळात झिरपत जातो. या घोटाळ्यात राष्ट्रीय शेअरबाजारातील वरिष्ठ लोक, भांडवल बाजार नियंत्रण सेबीने आधी केलेले दुर्लक्ष, त्यामुळे चौकशीस झालेला उशीर, नंतर उचललेली पाऊले, त्यातही कदाचित दुर्लक्ष केलेल्या गोष्टी ज्यामुळे संबंधितांना सिक्युरिटी अपिलेट ट्रिब्युनलकडून लगेचच मिळणारा दिलासा, यामुळेच हा घोटाळा जितका दिसतोय त्यापेक्षा बराच मोठा असण्याची शक्यता जास्त आहे.

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

Reading Time: 3 minutesआयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) नवे बदल

Reading Time: 3 minutesराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. १ एप्रिल २००४ नंतर सरकारी नोकरी  स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने लागू करण्यात आली आहे. अन्य पेन्शन योजनांच्या तुलनेत या योजनेत काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या असून काही नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे.

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

शेअर बाजारातील प्राणी

Reading Time: 3 minutesव्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत. अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.

Moneycontrol – नव्या रूपातील गुंतवणूकदारांचा मितवा

Reading Time: 4 minutesएक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. हे अँप म्हणजे गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अशा अर्थाने ‘मितवा’ आहे असे मी म्हणतो. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesभांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

शेअर्स खरेदीचं सूत्र

Reading Time: 4 minutesगुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लॉन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते. आपल्या  जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार  गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात.

निवडणूक रोखे (Electoral Bonds) म्हणजे काय ?

Reading Time: 3 minutesविविध राजकीय पक्ष पैसा जमा करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून देणग्या मिळवत असतात. या देणग्या सर्वसामान्य लोक, व्यापारी , कंपन्या, मोठे उद्योगपती यांच्याकडून रोखीने घेतल्या जात असल्याने आणि त्याचा तपशील ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने काळ्या पैशांची निर्मिती होत होती. हे व्यवहार पारदर्शी व्हावेत या हेतूने २०१७/१८ च्या अर्थसंकल्पात राजकिय पक्षांना मदत करण्याचा हेतूने निवडणूक रोख्यांची निर्मिती केली आहे.

शेअर्सची ओपन-क्लोज पोझिशन आणि अल्गोरिदमीक ट्रेडिंग

Reading Time: 2 minutesभांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफएनओ, करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे?  ते जाणून घेऊयात.