Reading Time: 4 minutes

एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे.

हे अँप म्हणजे गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अशा अर्थाने ‘मितवा’ आहे असे मी म्हणतो. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.

अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात याा अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

  • ज्यांच्याकडे हे अँप पूर्वीपासून आहे किंवा ज्यांच्या मोबाइल मध्ये आधीपासूनच (Inbuilt) आहे. त्यांना त्याचे रूप बदलले आहे हे लक्षात आले असेलच. ज्यांच्याकडे ते नाही त्यांनी प्ले स्टोरवरून इंस्टोल करून घ्यावे.
  • ते सुरू झाल्यावर होमपेज दिसेल.

  • पेजच्या वरील डाव्या बाजूस Home तर उजव्या बाजूस ऍपच्या शेजारी दुर्बिणीचे व त्याच्या बाजूस एका गोलात व्यक्तीचे चित्र आहे. त्याखाली एक व्यावसायिक जाहिरात, त्याखाली शेअरचे भाव दाखवणारी धावती पट्टी त्याखाली Top news आणि Indises यामध्ये momeycontrol pro ची जाहिरात दिसेल. तर एकदम तळात डावीकडून उजवीकडे Home, Market, Portfolio, News आणि Menu यांचे आयकॉन दिसतील. आपण आत्ता Home वर आहोत. हे त्याखाली असलेल्या निळ्या रेषेवरून समजेल.
  • येथील Home आणि Menu सोडून आयकॉन हे वेगवेगळ्या विभागाचे शॉर्टकट्स आहेत. तेव्हा आपण Home पेजवरील उजव्या बाजूस तळाला असलेल्या Menu ला क्लिक करू.
  • Menu ला क्लिक केले की अलिबाबाच्या गुहेसारखा ‘खुल जा सिमसीम’ म्हणून सर्व खजिनाच उघडेल.

  • अगदी वरती एका गोलात व्यक्तीचे चित्र त्याशेजारी आपला ई मेल त्याखाली आपली प्रोफाइलची खात्री करून घेतली असेल/नसेल तर verified / not verified असे येईल. त्याशेजारील उजव्या बाजूस चौकोनी दाते असलेले चक्र दिसेल, त्यावर क्लिक केले असता आपण पुन्हा होम पेजवर जाऊ शकतो. याखाली Moneycontrol pro कडे जाण्याचा मार्ग आणि त्याखाली विविध विभाग उप विभाग दिसतील. ते क्रमानुसार असे —
    • Home: येथूनही होम पेजवर जाता येईल. येथे Menu मधील ६०% हून अधिक गोष्टींचे शॉर्टकट आहेत.
    • News: याचे Top news, My news, Markets, Stocks, Opinion, Podcast, Business, Moneycontrol research, Mutual funds, Commodities, Economy, Politics, International आणि Start ups हे उपविभाग दिसतील. सर्व प्रकारच्या बातम्या येथे मिळतील.
    • Stock Premier League: हा एक शेअर मार्केट वरील क्रिकेटसारखा खेळ आहे ज्यात कोणीही भाग घेऊ शकतो तो कसा खेळायचा याची माहितीही आहे. याचे दैनिक, साप्ताहिक व मासिक विजेते जाहीर केले जातात.
    • Media: हा या खालील विभाग असून त्यात CNBC चे TV18, AWAAZ, BAJAR हे चॅनल लाईव्ह पाहता येतील. तर या चॅनेलवरील काही निवडक भागांचे व्हिडीओज Videos on demand मध्ये उपलब्ध आहेत.
    • Forum: याचे My Forum, Explore, Search Messages असे उपविभाग आहेत. यातून आपल्या गुंतवणुकीच्या संबधी इतरांची मते समजतात तसेच आपण आपले मतही तेथे व्यक्त करू शकतो.
    • Specials: या विभागात गुंतवणूक संबंधित चालू विषयावरील लेख / पीपीटीज आहेत त्यातील ५/६ निवडक लेखांचे शिर्षक दिले असून त्यावर क्लिक केले तर तो लेख / पीपीटी पहाता येईल.
    • My Portfolio: यात आपल्या शेअर, म्युच्युअल फंड युनिट, एसआयपी, सोने, पीपीएफ, एफडी , रिअल इस्टेट, युलीप अशा सर्व प्रकारच्या बचत आणि गुंतवणुकीची नोंद ठेवता येऊन  त्याचे गुंतवणुकीप्रमाणे तसेच एकत्रित मूल्य पाहता येईल तसेच असलेल्या कर्जाची नोंद ठेवून त्याचा आढावा घेता येईल.
    • My Watch list: या विभागात आपण लक्ष ठेवीत असणाऱ्या Stocks, Mutual Funds, Commodities, Futures, Currencies याची सर्व माहिती मिळेल. ही यादी हवी तेव्हा अद्ययावत करता येऊन यासंबंधीची अधिक महत्वाची बातमी My Alerts या उपविभागातून मिळेल.
    • Personal Finance: या विभागातून आपल्या गुंतवणुकीच्या संदर्भातील विविध विषयांवरील लेख वाचयाला मिळतील.
    • या खालील विभाग चालू घडामोडीवर असून सध्या निवडणुका चालू असल्याने यासंबंधीत लेख तेथे आहेत.
    • Markets: या विभागात Indian Indices, Global Indices, Market Movers, Earnings, F&O Action, IPO, FII, DII & MF Activity, Broker Research असे उपविभाग आहेत. यात विविध निर्देशांक, त्यातील शेअर्स, त्याचे दिवसातील, ५ दिवसातील, १,३,६ महिन्यातील व एक वर्षातील सर्वात कमी/जास्त भाव, उलाढाल, सर्वाधिक मागणी असलेले/ नसलेले शेअर्स, त्याचे दर्शनी मूल्य, बाजारभाव, विशेष माहिती, ऑप्शन फ्युचर्स चा लॉट , कंपनीच्या विषयीची सर्व माहिती, लोकांच्या प्रतिक्रिया, ब्रोकरेज हाऊसचे मत, ओपन इंटरेस्ट अशी सर्व आवश्यक माहिती मिळेल.
    • Commodities: Top Commodities आणि Commodities Movers वस्तुबाजारातील विविध वस्तूंचे दर, त्यांच्या मागणी पुरवठ्यातील फरक आणि भविष्यातील दर समजू शकतील.
    • Currencies: Top Currencies, Currency Movers आणि Exchange Rate असे उपविभाग असून त्यामधून चलनांसंबंधी सर्व माहिती मिळून विविध चलनांचा विनिमय दर समजेल.
    • Mutual Funds: Top Ranked Schemes आणि Top Performed Schemes असे उपविभाग आहेत यात योजनेविषयी सर्व माहीती- त्याचा प्रकार, गुणवत्ता आणि १ महिना ते ५ वर्षात मिळालेला परतावा समजू शकेल, ज्यामुळे म्युच्युअल फंड योजनेची निवड करता येईल. 
    • Tools: यात नेहमीच्या उपयोगाची सूत्रे आहेत. ज्यायोगे झटपट निष्कर्ष काढता येईल.
    • Supports: यात आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतो.
    • Saved Articles: यात आपण आपणास सवडीने वाचावा वाटेल असा लेख घेऊन तो ऑफ लाईन वाचू शकतो.
    • App Info: यात Privacy Policy, Share this App, Rate this App आणि More Apps हे विभाग असून यात अँप विषयीची माहिती, ते मित्रांना पाठवायची विनंती, त्याचे आपण केलेले मूल्यांकन नोंदवायची सोय आहे तसेच या प्रकाराची अन्य अँप्स  कोणती आहेत ती डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध आहे. यातील प्रत्येक विभाग, उपविभाग परिपूर्ण असून जेवढे खोलवर जाऊ तेवढी अधिक माहिती मिळेल. यातील प्रत्येक विभागावर स्वतंत्र लेख होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे उपविभागात क्लिक करून थेट जाता येते. सर्वात शेवटी तज्ञ व्यक्तींचे सल्ले आहेत. जे थोड्या प्रमाणात मोफत तर अधिक प्रमाणात फी आकारून दिले जातील.
  • जे लोक पुर्वी हे अँप वापरीत होते त्यापेक्षा अधिक माहिती या अँपमध्ये असल्याने ते सर्वांना उपयुक्त ठरेल. हे फ्री अँप असल्याने यात काही व्यावसायिक जाहिराती आहेत पण त्या व्यत्ययकारक नाहीत. जाहिराती नसलेले पेड व्हर्जन हवे असल्यास आहे आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.

– उदय पिंगळे

BSE चे ऍप – शेअर मार्केट मोबाईलवर,

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?,

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…