cash back offers
SSUCv3H4sIAAAAAAAACpyRz27DIAzG75P2DhHnRsq/rUlfpdrBATdBpVAB2TRVffcZCBXn3fDP9md/5vH+VlVsBic5O1WPEFEsldqct+Cl0YTbw84taoGWSJMJCumNlaBKOIPnq4YbEtSbUgE/Y5I5D35z6MKwHXHwuJBGgi+JtNE5xVVOxCR1UIqxQ8HcNkeWURL/V2d6fGU3sKDmv3HhwohFhZCMnFMpu/54tLfSGmxCmsLVt+GgQkFfKN2t5FIvRZvxa7xybuNm096GFV6bM2XMHWYVTnwhTcx8BeeoXGReDOL0p+ZWzNHGRwO7KhP0EyFs+66dpnYYu6Hvh6kZx70g/d4qSSeuk4Uo5lcpSusybMD6YyP42EP92SGvSW2qR+yaer40Awz8iPjB6fDPPwAAAP//AwBwUbluhwIAAA==
Reading Time: 3 minutes

Cash Back Offers

अमुक खरेदीवर तमुक कॅश बॅक मिळवा अशा ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्स मनाला खरंच भुरळ पाडत असतात. खरेदी केलेल्या त्या वस्तूबद्दल वाटावा त्यापेक्षा किंबहुना जास्त आनंद त्या वस्तूच्या खरेदीवर मिळणाऱ्या कॅश बॅकमूळे होतो. सध्या कॅश बॅक वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून वीज बिल, डीटीएच रिचार्ज, फ्लाइट तिकीट बुकिंग, रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन पोर्टल्समार्फत विकल्या जाणार्‍या जवळपास सर्व उत्पादनांवर उपलब्ध आहेत. या सवलती तुम्हाला मिळणाऱ्या नेहमीच्या सवलतींपेक्षा थोड्या जास्त असतात त्यामुळे ग्राहकांचा कल कॅश बॅक मिळणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्याकडे जास्त वाढला आहे. असे असले तरीही यात काही जोखीमाही आहेत. कॅश बॅक आणि त्यामागे असलेले हेतू अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊ. 

हेही वाचा – Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?…

कॅश बॅक म्हणजे काय?

  • कॅश बॅक ऑफर म्हणजे ई-वॉलेट, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँकांद्वारे खरेदीदारांना दिलेल्या सवलती असतात. 
  • ई-वॉलेट्स आणि क्रेडिट कार्ड कंपन्या वेगवेगळ्या किरकोळ विक्रेत्यांसह भागीदारी करतात (किरकोळ स्टोअर किंवा ऑनलाइन स्टोअर) आणि अंशतः त्यांचे कमिशन त्यांच्या ग्राहकांना कॅश बॅकच्या रूपात देतात. त्यांचा हा हेतू  प्रामुख्याने तुम्हाला तुम्ही खरेदीसाठी त्यांचे प्लॅटफॉर्म वापरावेत आणि अधिकाधिक खरेदी करावी हा असतो.

हे मार्केटिंगचे मोहजाल आहे का?

  • कॅशबॅक हा डिजिटल युगात ग्राहकांना आकर्षित करण्याचा नवीन मार्ग आहे असे म्हणता येईल. विकत घेतलेल्या वस्तूवर रोख सवलत देऊन पूर्वी स्थानिक स्टोअर ग्राहकांना जसे आकर्षित करायचे तीच ही मार्केटिंगची पद्धत आहे जी आज कॅश बॅक म्हणून काम करत आहे. 
  • यात वस्तू कमी किमतीत मिळाल्यामुळे खरेदीदारांना फायदा होतो. नियमितपणे अशी अनेक घरगुती वस्तूंवरील लहान बचत कालांतराने मोठ्या रकमेत रुपांतरीत होते, त्यामुळे कॅश बॅक ऑफर मिळणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह टाळता येत नाही आणि वारंवार नकळत अशा गरज असलेल्या आणि नसलेल्याही वस्तू खरेदी केल्या जातात. 

तुमचा खरेदीचा निर्णय कॅश बॅक मिळतेय म्हणून घेऊ नका 

  • समजा तुम्हाला एक फ्रीज घ्यायचा आहे आणि तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक फ्रीज आहे ज्याची कंपनी जूनी आणि प्रसिद्ध आहे आणि दुसऱ्या फ्रीजची कंपनी तुलनेत नवीन आहे पण बऱ्यापैकी कॅश बॅक ऑफर करत आहे. 
  • अशावेळी तुम्ही कॅश बॅकच्या मोहजालात न अडकता थोडा विचार करणे अपेक्षित आहे. नवीन कंपनीचा फ्रीज कंपनी नवीन असल्यामुळे गुणवत्तेची खात्री देईलच असे नाही, न जाणो पुढे जाऊन तुम्हाला काही दिवसातच त्याच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल.
  • म्हणून, उत्पादनांवर सखोल संशोधन करा आणि त्यानंतरच कॅश बॅक ऑफरचा पर्याय निवडायचा की  नाही ते ठरवा. 

हेही वाचा –  Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !...

विनाकारण जास्त खर्च करू नका

  • क्रेडिट कार्ड कंपन्यांना आपण अधिकाधिक खर्च करावा असे वाटते जेणेकरून त्यांना त्यांचे कमिशन मिळत राहावे.
  • तुम्ही या ऑफरला बळी पडणार नाही याची खात्री करा आणि तुमचे बजेट ध्यानात ठेवा.
  • कॅश बॅक म्हणून मिळालेल्या मोठ्या रकमेसंदर्भात लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे वैयक्तिक वापरासाठी वस्तू किंवा सेवांच्या खरेदीदरम्यान मिळालेल्या कॅश बॅकला आयकर कायद्याच्या कलम 56 अंतर्गत, इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न असे मानले जाऊ शकते. 

सुरक्षितता आणि विश्वासार्हता

  • केवळ नामांकित ई-कॉमर्स पोर्टलवर व्यवहार करा आणि त्यांची उत्पादने इतर ग्राहकांनी दिलेली रेटिंग तपासल्यानंतरच खरेदी करा.
  • तुम्ही ई-वॉलेटसाठी साइन अप करण्याचा विचार करत असल्यास, आधी त्याचे ऑनलाइन रिव्ह्यूज चेक करा. ग्राहक म्हणून तुम्हाला तांत्रिक किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये काही अडचणी आल्यास त्या कशा प्रकारे त्यांच्या सिस्टीम द्वारे निवारण केल्या जातात याचा आधी अंदाज घ्या.
  • कॅश बॅकच्या स्कीम मध्ये तुम्हाला कदाचित चांगली डील मिळाली तरी, तुम्‍ही विकत घेतलेली वस्तू अल्प कालावधीत खराब होऊन ती बदलण्याची आवश्यकता आल्यास तुम्ही खर्च केलेल्या आणि वाचवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे तुम्हाला दुरुस्तीत किंवा नवीन वस्तू घेण्यात खर्च होऊ शकतात. 
  • कधी कधी फसव्या साइटद्वारे व्यवहार केल्याने तुमच्या बँकचे अकाउंट आणि वैयक्तिक डिटेल्स हॅक देखील होऊ शकतात. ऑनलाईन पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत नेहमी वेबसाइटची URL तपासा. ही  HTTPS ने सुरू होतेय याची आधी खात्री करा. HTTPS मध्ये असलेला ‘S’ चा अर्थ ही  URL ‘सुरक्षित’ आहे आणि अशा वेबसाइट्सद्वारे केलेली पेमेंट सुरक्षित असते. 
  • आकर्षक कॅश बॅक ऑफर करणाऱ्या इ-मेल, SMS, फोनपासून सावध रहा. अपरिचित लिंकवर क्लिक केल्याने तुमच्याशी फसवणुकीचा व्यवहार केला जाण्याची भीती निर्माण होऊ शकते. 

वेळेचं महत्व लक्षात असू द्या 

  • वेळ म्हणजे पैसा! जर तुम्ही केवळ एखाद्या शूजवर सर्वोत्तम ऑफर शोधण्यासाठी चार तास इंटनेटवर संशोधन करत असाल, तर कदाचित तुम्ही तुमचा वेळ (आणि पैसा) वाया घालवत आहात.
  • संशोधन करणे चुकीचे नाही, त्यासाठी एक किंवा दोन ई-वॉलेट आणि क्रेडिट/डेबिट कार्ड्स शॉर्टलिस्ट करा, एवढं करणं पुरेसं आहे. फक्त काही रुपयांची कॅश बॅक ऑफर मिळवण्यासाठी सर्व ई-वॉलेटसाठी साइन इन करत राहू नका.
  • बर्‍याचदा, लोकांकडे अनेक ई-वॉलेट असतात ज्यात काही पैसे असतात. ई-वॉलेटमधून बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी अंदाजे 3%-4% इतका मोठा खर्च येतो. म्हणून, सर्व ई-वॉलेट शिल्लक ताबडतोब वापरा.

हेही वाचा – आधार कार्ड, जनधन आणि मोबाईल – ऐका पुढील हाका !…

सारांश 

थोडक्यात, कॅश बॅकचा फायदा घ्या पण केवळ कॅश बॅक मिळेल म्हणून तुमचे खरेदीचे निर्णय घेऊ नका. वस्तू हुशारीने निवडा आणि कधीही गुणवत्तेपेक्षा ऑफरला प्राधान्य देऊ नका.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.