Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?

Reading Time: 3 minutes

Definition of Rich

श्रीमंतीची व्याख्या (Definition of Rich) ही संकल्पना संभ्रमात पडणारी आहे. याचसंदर्भात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका पोस्टचा अनुवाद. मूळ इंग्रजीत असलेल्या या पोस्टचा मला उमजलेला आशय आहे अनुवाद नाही त्यामुळे तो तसाच्यातसा नाही. यात काही त्रुटी राहिली असल्यास यात माझी आकलनशक्ती कमी आहे.

‘माझी मुलगी गरीब मुलाशी कधीच लग्न करणार नाही’- एलन मस्क

 • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नावाने हा संदेश गेले अनेक दिवस समाज माध्यमातून फिरत आहे. याची सत्यासत्यता माहिती नाही किंवा ही पोस्ट ज्याने लिहिली त्याच्या नावाशिवाय पुनः पुन्हा मला कोणाकडून तरी येत आहे. आपणही ती कदाचित नक्कीच वाचली असेल.
 • सर्वसाधारणपणे असे दळण टाकल्या सारख्या आणि निनावी येणाऱ्या पोस्ट मी न वाचताच डिलीट करतो. परंतू याच्या – “Elon Musk explains why his daughter can’t marry a poor man”  या भल्यामोठ्या आकर्षक शिर्षकाने माझे लक्ष वेधून घेतले.
 • याची सत्यासत्यता तपासल्यावर मस्क यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही याशिवाय त्यांनी जी काही लग्ने केली त्यातून त्यांना असलेल्या संततीत मुलगी नाही. तरीही असे विधान हुबेहूब त्यांनीच केले वाटावे असे भासवणाऱ्या त्या अज्ञात पोस्टकर्त्याला सलाम.
 • मागे रतन टाटा यांच्या नावानेही अशीच एक पोस्ट अतिशय प्रसिद्ध झाली होती. त्यात व्यक्त केलेली विधाने आपण केली नसल्याचा खुलासा टाटांनी केला होता. तेव्हा खोटी खोटी का असेल पण त्यात व्यक्त केलेला आशय फार महत्वाचा वाटत असल्याने आविष्कार स्वातंत्र्य घेऊन तो मुद्दाम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.

श्रीमंतीची व्याख्या (Definition of Rich):

 • काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका वित्त आणि गुंतवणूक कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून एलन मस्क यांचा सहभाग होता. 
 • या कार्यशाळेत सहभागी एका सदस्याने प्रश्नोत्तराच्या तासात त्यांना, तुम्ही जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असाल, तर तुमच्या मुलीने सर्वसामान्य अथवा गरीब मुलाशी विवाह केल्यास ते तुम्ही मान्य कराल का? असा प्रश्न विचारला. साहजिकच यावर हास्याचा स्फोट उडणे स्वाभाविक होते.
 • या प्रश्नाचे त्यांनी दिलेले उत्तर हे विचारांना चालना देणारे आणि चिंतन करण्यासारखे आहे. 
 • या प्रश्नामुळे सभागृहात उडालेला हास्यस्फोट थांबल्यावर मस्क म्हणाले, “श्रीमंती ही तुमच्या बँक खात्यात किती भरभक्कम रक्कम शिल्लक आहे यावर नसून श्रीमंती म्हणजे संपत्ती निर्माण करू शकण्याची क्षमता आहे. 
 • लॉटरीचे बक्षीस जिंकलेली, जुगारात जॅकपॉट म्हणून १०० कोटी रुपये जिंकणारी व्यक्ती म्हणजे श्रीमंत व्यक्ती नसून त्याला फारतर खूप पैसे असलेला गरीब माणूस असे म्हणता येईल, म्हणूनच या किंवा अशा कारणाने अशा प्रकारे अचानक धनलाभ झालेल्या ९०% व्यक्ती ५ वर्षांनंतर पुन्हा पूर्वपदावर येतात. 
 • याउलट आजिबात पैसे नसलेल्या श्रीमंत व्यक्ती आहेत असे अनेक उद्योजक ज्यांच्याकडे पैशांची कमतरता असूनही संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असल्याने ते श्रीमंतीकडे वाटचाल करीत आहेत.

हे नक्की वाचा: Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास 

गरीब आणि श्रीमंत व्यक्तींत मुलभूत फरक 

 • गरीब आणि श्रीमंत व्यक्तींत मुलभूत फरक म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होऊन मरतात तर गरीब हा श्रीमंत होण्यासाठी मरतो. 
 • एखादा तरुण शिकून, सातत्याने नवनवीन प्रशिक्षण घेऊन स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करीत असतो त्याला श्रीमंत म्हणायला हवं. याऊलट दुसरा एकदा तरुण, प्रत्येक समस्यांचे मूळ श्रीमंती आहे असे समजून करून घेऊन, श्रीमंत गैरव्यवहार करतात अशी सातत्याने कुरकुर करीत असेल तर त्याला गरीब म्हणायला हवं. 
 • प्रत्येक श्रीमंत व्यक्तीस माहिती आहे की त्याला भरारी घेण्यासाठी ज्ञान आणि प्रशिक्षण यांची आवश्यकता आहे, तर अनेक गरिबांना भरारी घेण्यासाठी श्रीमंतांनी त्यांना आर्थिक मदत करायला हवी असे वाटते. म्हणूनच मी असे म्हणतो की- माझी मुलगी गरीब मुलाशी कधीही लग्न करणार नाही, तेव्हा मी त्याच्याकडे असलेल्या पैशांबद्दल बोलत नसून त्याच्या संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलतोय. 
 • मी अस बोलतोय याबद्दल माफ करा, पण जगातील अनेक गुन्हेगार पहा. यातील बहुसंख्य लोक गरीब आहेत. त्यांना पैशाच्या राशी पाहिल्यावर मोह झाला, त्याची सारासार विचारशक्ती नाहीशी झाली. क्षणिक सुखासाठी त्यांनी लूटमार केली, चोरी केली कारण त्यांचा त्याच्या पैसे मिळवण्याच्या क्षमतेवर विश्वास नव्हता.
 • माझ्या माहितीतील एका बँक सुरक्षा रक्षकास बॅग मिळाली जी पैशांनी खचाखच भरली होती. त्यांनी ती बँक मॅनेजरकडे जमा केली. सर्व लोक त्याचे नातेवाईक त्याला काय बेअक्कल माणूस आहे असे समजू लागले. माझ्या दृष्टीने तो पैसे नसलेला श्रीमंत माणूस आहे. 
 • एक वर्षांनी बँकेने त्याची स्वागत कक्षात नियुक्ती केली. तीन वर्षांनी तो ग्राहक सेवा कक्षात व्यवस्थापक झाला दहा वर्षांनी तो विभागीय व्यवस्थापक बनला. शेकडो लोक त्याच्या हाताखाली काम करत होते. त्याला मिळणारा वार्षिक बोनस हा त्या बॅगेतील रकमेच्या कितीतरी पट आहे.

हे ही वाचा: श्रीमंतीची ‘वही’वाट 

तेव्हा श्रीमंती ही पैशांची नसून सर्वप्रथम स्वतःच्या मनाची अवस्था आहे हे नीट लक्षात घ्या आणि आता सांगा की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत?

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Elon musk Marathi mahiti, Definition of Rich in Marathi, Definition of Rich Marathi, Definition of Rich Marathi Mahiti, Elon musk’s Definition of Rich Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.