सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया
Reading Time: < 1 minuteसिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि कंपनीच्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते. सिबिलकडे आपला आर्थिक लेखाजोखा असतो. आपले क्रेडिट कार्ड्स, कर्ज, कर्जाची वारंवारता, त्यांचे हप्ते, त्यांची झालेली परतफेड, परतफेड करण्याच्या वेळा, पद्धती, थकबाकी, इत्यादी सगळी माहिती जपली जाते. ही सगळी माहिती नोंदणीकृत बँका व इतर आर्थिक संस्था सिबिलकडे नियमितपणे (साधारणतः मासिक पद्धतीने) पोहोचवत असतात.