आयुष्यमान भारत योजनेची शतकपूर्ती

Reading Time: 2 minutesआयुष्यमान भारत योजना भारतातील आरोग्यक्षेत्रात माईलस्टोन ठरली आहे. आरोग्यक्षेत्रात ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली भारत सरकारची ही एक प्रमुख योजना आहे.

संपूर्ण भारतीय आणि व्यवहार्य मॉडेल – सर्व ज्येष्ठांसाठी ‘यूबीआय’ योजना

Reading Time: 4 minutesभारतीय नागरिकांच्या मनात सध्या असुरक्षिततेने घर केले असून पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, हे त्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा जाहीर करून त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता विशिष्ट मानधन देणे ही ‘गरजू नागरिकांना किमान पैसे देण्याची आदर्श (Universal Basic Income – UBI) योजना’ ठरू शकते. अर्थक्रांतीचा या प्रस्तावाची अमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे. कारण, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना समृद्ध आयुष्य जगण्याचा हक्क मिळणार आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutesराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (NSDL) यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन.पी.एस चे रेकॉर्ड किपर NSDL CRA च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutesसुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

आयुष्यमान भारत योजना

Reading Time: 3 minutesआयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून, त्यामधून १०.३६ कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.

सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

Reading Time: 2 minutesएखाद्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडायचे असेल तर नैसर्गिक (जैविक) पालक किंवा कायदेशीर पालक यांच्याकडून उघडले जाऊ शकते. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पीईफ सुविधा पुरवणाऱ्या बँकेत अथवा काही सरकारी बँकेत उघडता येते. संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये हे खाते उघडता येते का? याची एकदा खात्री करा. (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीएच, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आंध्रा बँक, यूको बँक, इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक इ. बँकांच्या शाखामध्ये ही सुविधा आहे). तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आयसीआयसीआय बँक व ऍक्सिस बँक या खाजगी बँकांमध्येही हे खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutesघरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

Reading Time: 3 minutesसन २०१५ मध्ये  ‘इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने’ प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण इतर विकसनशील  देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर  स्थान मिळविले होते.  सन २०११ मध्ये  लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.  सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२%  भारतीय  आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची  गरज होती आणि “आयुष्मान भारत” योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.