आयकर विभागातर्फे दरवर्षी संबंधित आय.टी.आर. फॉर्म दिले जातात केले जातात. आयकर परतावा दाखल करण्यासाठी या फॉर्मचा वापर करावा लागतो. आयकर विभागाने जारी केलले एकूण सात आयटीआर फॉर्म आहेत.
- ITR 1 (आयटीआर १ सहज)
- ITR 2 (आयटीआर २)
- ITR 3 (आयटीआर ३)
- ITR 4 (आयटीआर ४ सुगम)
- ITR 5 (आयटीआर ५)
- ITR 6 (आयटीआर ६)
- ITR 7 (आयटीआर ७)
फॉर्म भरण्याचे निकष :-
हे सातही फॉर्म भरणे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक नाही. तर हे फॉर्म भरण्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. त्या निकषांत बसणाऱ्या व्यक्तीला तो फॉर्म भरणे आवश्यक असते. प्रत्येक फॉर्मसाठी असणारे वेगवेगळे निकष खालीलप्रमाणे-
-
ITR 1 –
- वेतन, एक घर आणि व्याज इ. सारख्या स्त्रोतांतुन एकूण ५० लाखापर्यंत उत्पन्न मिळवणारी भारतीय सामान्य रहिवासी नागरिक व्यक्ती.
-
ITR 2-
-
अनिवासी आणि आरएनओआर (RNOR) व्यक्ती
-
व्यवसाय आणि व्यापारातून नफा आणि लाभ न मिळणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब(HUF)
-
ITR 3-
-
व्यवसाय आणि व्यापारातून नफा आणि लाभ मिळणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब(HUF)
-
आयटीआर १ आणि आयटीआर २ मध्ये वर्गीकृत न होणारे करदाते.
-
ITR 4-
-
व्यवसाय आणि व्यापारातून मिळणारे अनुमानित उत्पन्नासाठी.
-
ITR 5-
-
व्यक्तीविशिष्ट, हिंदू अविभक्त कुटुंब , व्यापारीमंडळ (कंपनी) आणि आयटीआर ७ फॉर्म भरणारी व्यक्ती वगळता इतर सर्व व्यक्ती.
-
ITR 6 –
-
सेक्शन ११ अन्वये करात सूट प्राप्त करणारे व्यापारीमंडळ वगळता इतर सर्व व्यापारीमंडळ.
-
ITR 7 –
-
सेक्शन १३९ (४अ) किंवा १३९ (४ब) किंवा १३९ (४क) किंवा १३९ (४इ) किंवा १३९ (४फ) अन्वये परतावा सादर कराव्या लागणाऱ्या व्यक्ती आणि व्यापारमंडळ.
निर्धारण वर्ष २०१८-१९ आयटीआर फॉर्ममध्ये झालेले बदल :-
-
ITR 1-
-
नवीन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहितीत ‘लिंग’ हा मुद्दा वगळण्यात आलेला आहे.
-
नवीन फॉर्ममध्ये, ‘वेतन अथवा निवृत्तीवेतनातून मिळणारे उत्पन्न (Income from Salary or Pension)’ आणि ‘स्थावर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न (Income from One house property)’ या पहिल्या दोन रकान्यांमध्ये अधिक उप रकाने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या स्त्रोतातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची अधिक विस्तृत माहिती देणे आवश्यक आहे.
-
जुन्या फॉर्ममधील नोटबंदीच्या काळात जमा केलेल्या रोख रकमेचा तपशील देण्यासाठी असलेला रकाना नवीन फॉर्ममध्ये वगळण्यात आलेला आहे.
-
जुना फॉर्म हा निवासी, अनिवासी आणि आरएनओआर (RNOR) सर्वांना लागू होता. नवीन फॉर्म फक्त निवासी भारतीय नागरिकासाठी वैध आहे.
-
नवीन फॉर्ममध्ये टॅक्स प्रिपेअरची वैयक्तिक माहिती देण्यसाठी रकाना देण्यात आलेला आहे.
-
जुन्या फॉर्ममधील वैवाहिक जोडीदाराच्या नावे असलेल्या रकमेची माहितीचा रकाना नवीन फॉर्ममध्ये वगळण्यात आलेला आहे.
-
नवीन फॉर्ममध्ये 243F च्या अनुवये उशिरा परतावा दाखल करणाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या दंड रकमेची माहिती प्रविष्ट करण्यासाठी एक नवीन रकाना सामाविष्ट करण्यात आलेला आहे.
-
फॉर्म 26QC अन्वये घर भाड्यावर आकारला जाणाऱ्या TDSची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यात भाडेकरूचा पॅन कार्ड क्रमांक देखील देता येऊ शकतो.
-
ITR 2-
-
जुना आयटीआर – २ अ फॉर्म रद्द करून त्याऐवजी सध्याचा आयटीआर २ हा नवीन फॉर्म जारी करण्यात आलेला आहे.
-
भेट म्हणून मिळालेल्या करपात्र रकमेची नोंद करणे आवश्यक.
-
नवीन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहितीत ‘लिंग’ हा मुद्दा वगळण्यात आलेला आहे.
-
अनिवासी रहिवाश्यांच्या परदेशी बँक खात्याची माहिती देणे आवश्यक.
-
जुन्या फॉर्ममध्ये असणारा Part B- TI मधील Profits and Gains from Business or Profession हा रकाना वगळण्यात आलेला आहे.
-
Schedule – IF (Income from Firm) and Schedule – BP हे रकानेदेखील वगळण्यात आलेले आहेत.
-
भागीदारीतील उत्पनासंबंधी असलेल्या Schedule AL मधील ‘ Interest held in the assets of a firm or association of persons (AOP) as a partner or member thereof’ हा रकानादेखील काढून टाकण्यात आलेला आहे.
-
फॉर्म 26QC अन्वये घर भाड्यावर आकारला जाणाऱ्या TDSची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..
-
ITR 3-
-
जुना आयटीआर – ४ फॉर्म रद्द करून त्याऐवजी सध्याचा आयटीआर ३ हा नवीन फॉर्म जारी करण्यात आलेला आहे.
-
भारतीय निवासी झाल्यानंतर देखील सेक्शन १५ ह शी संबंधित विशिष्ट लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक नवीन रकाना सामाविष्ट करण्यात आलेला आहे.
-
जीएसटी (GST) ची माहिती द्यावी लागेल.
-
नवीन फॉर्ममध्ये सुधारित अवमूल्यन परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार अवमूल्यन संबंधित सेक्शनमधील अवमूल्यन अधिकतम अवमूल्यन मर्यादा हि एकूण अवमुल्यनाच्या ४० % करण्यात आलेली आहे.
-
ITR 4-
-
जुना आयटीआर- ४ स फॉर्म रद्द करून त्याऐवजी सध्याचा आयटीआर ४ हा नवीन फॉर्म जारी करण्यात आलेला आहे.
-
यात GSTR क्रमांक प्रविष्ट करणे आता अनिवार्य आहे.
-
त्याचबरोबर Financial particulars या भागात भागीदार/सदस्य भांडवल (Patners/members capital), तारण कर्ज (Secured Loan), विना तारण कर्ज (Unsecured Loan), Advances, स्थावर मालमत्ता (Fixed Assets) असे नवीन उप रकाने समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
-
ITR 5-
-
आयटीआर १, २, ३, ४ मधील बदल या फॉर्ममध्ये देखील लागू करण्यात आलेले आहेत.
-
ITR 6-
-
जीएसटी अंतर्गत सर्व नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत पुरवठादारांशी होणाऱ्या व्यापारी व्यवहारांचा तपशील देण्यासाठी नवीन परिशिष्ट सामाविष्ट करण्यात आलेले आहे.
-
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी CSR अन्वये केल्या गेलेल्या विनिमयाची नोंद करणे आवश्यक.
-
विदेशी चलनात केले गेलेल्या वेतनाचा विस्तृत तपशील देणे आवश्यक.
-
अवर्गीकृत व्यापारीमंडळाची मालकी हक्क माहिती देणे आवश्यक.
-
ITR 7-
-
धर्मादाय संस्थेची माहिती देण्यासाठी नवीन रकाना समाविष्ट करण्यात आला आहे.
-
नवीन नोंदणी केल्यानंतर विस्तृत तपशील आवश्यक.
-
१० लाखांपेक्षा जास्त लाभांश करपात्र करण्यात आला आहे.
-
इतर संस्थाना देण्यात आलेल्या कॉर्प्स देणगीवर कपात केली जाणार नाही.
-
राजकीय पक्षांना रोख रकमेच्या स्वरुपात मिळालेल्या देणगीची माहिती देणे बंधनकारक.
त्या बदलांचा परिणाम :-
नवीन फॉर्ममध्ये करण्यात आलेले बदल हे अर्थसंकल्प २०१७ मध्ये केलेले प्रस्तावित बदल आहेत. यानुसार केलेले काही बदल हे किचकट आहेत. प्रथमच कर भरणाऱ्या आणि अगदी जुन्या करदात्यांसाठी देखील हे बदल गोंधळ उडवणारे ठरू शकतात. जसे कि. उत्पन्नाचा विस्तृत तपशील देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेले नवीन रकाने. यापूर्वी ढोबळमानाने नोंद केल्या जाणाऱ्या उत्पन्नाची अधिक विस्तृत आणि खोल माहिती करदात्याला द्यावी लागणार आहे. साहजिकच ती एक वेळखाऊ बाब असेल. त्याचबरोबर अनिवासी रहिवाश्यांना आता आयटीआर १ ऐवजी आयटीआर २ हा फॉर्म दाखल करावा लागेल. मात्र त्यांचा परतावा त्यांच्या विदेशी बँक खात्यात जमा केला जाईल. त्यांच्यासाठी हि सोयीस्कर बाब आहे. अनुमानित करदात्यांना आता आपल्या आर्थिक व्यवहारांची सर्व नोंद ठेवावी लागेल. एकंदरीत काही निर्धारण वर्ष २०१८-१९ साठीच्या आयटीआर फॉर्म मधील काही बदल हे फायद्याचे आहेत तर काही वेळखाऊ. सर्व बदलांची व्यवस्थित माहिती घेतल्यास मात्र खर्च होणारा वेळ टाळता येऊ शकतो.