Credit Card Statement
Reading Time: 3 minutes

Credit Card Statement

कित्येकजण आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) उघडूनही बघत नाहीत, जतन करणं तर दूरचीच गोष्ट. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्याने आधीसारखं एखाद्या बिलाची प्रिंट घेऊन फाईलला लावून ठेवणे वगैरे हे प्रकार तर आता कालबाह्यच झाले आहेत. क्रेडिट कार्डबद्दल मात्र अर्थतज्ज्ञ असं सांगतात की, ते आपण डिजिटल स्वरूपात किमान ६० दिवस जतन करून ठेवलं पाहिजे. काय कारणं असतील ? जाणून घेऊयात. 

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) जतन का आणि किती दिवस करायचे?

१. क्रेडिट कार्डचं आलेलं बिल हे त्या महिन्यात तुम्ही केलेल्या प्रत्येक व्यवहारासोबत तपासून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बँकेच्या झालेल्या एखाद्या चुकीमुळे आपल्याला जास्त पैसे भरावे लागत नाहीयेत हे आपणच तपासलं पाहिजे. तुमच्याकडे असलेली पावती आणि क्रेडिट कार्ड मधील तपशील यांची तुलना करून मगच पावती आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट यांची विल्हेवाट लावावी. 

२. तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये जर काही सुधारणा करणं अपेक्षित असेल, तुमच्या कार्डचा गैरवापर झाला असेल तर त्यासाठी बँकेने निर्धारित करून दिलेल्या वेळेतच आपण संपर्क करू शकतो. ही तक्रार प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदवताना क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तुमच्यासोबत असणं सोयीस्कर ठरू शकतं. 

३. तुमचा सीबील स्कोअर तयार होताना बँकेने तुम्हाला पाठवलेले क्रेडीट कार्ड स्टेटमेंट सुद्धा तपासले जात असतात. तुमचा सीबील स्कोअर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड स्टेटमेंटची योग्यता तपासली पाहिजे.

४. तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वाचायची सवय लावल्यास तुमच्या खर्च करण्याच्या सवयीवर तुम्ही नियंत्रण आणू शकतात. अर्थ नियोजन करताना तुम्हाला या सवयीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. 

हे नक्की वाचा: Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ? 

५. तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक बँकेने ६० दिवस हा कालावधी निर्धारित करून ठेवला आहे. तुम्ही सुचवलेल्या सुधारणांवर काम करण्यासाठी प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँक ३ आठवड्यांचा कालावधी घेत असते. हा कालावधी बँकेने निर्धारित केलेल्या ६० दिवसांच्या आत असेल तर सुधारणा लवकर होऊ शकते.

६. तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या एखाद्या खर्चाची नोंद जर तुम्हाला एखाद्या करामध्ये सूट देऊ शकत असेल तर ते साध्य करण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. तुम्ही आयकर भरून त्याचे पैसे तुमच्या खात्यात परत जमा होईपर्यंत तुम्ही सर्व क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सांभाळून ठेवावेत असं सर्व अर्थ तज्ज्ञ नेहमीच सांगतात. 

७. ऑनलाईन कंपन्यांनी देऊ केलेली ‘रिटर्न प्रोटेक्शन (आरपी)’ ही सोय तुम्ही क्रेडी कार्ड वरून चुकीने खरेदी केलेली वस्तू कंपनीला परत देण्यासाठी उपयुक्त ठरत असते. ज्या कालावधी पर्यंत तुमच्या वस्तूची ‘रिटर्न प्रोटेक्शन’ ही लागू आहे तोपर्यंत आपण या सेवेचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही परत केलेल्या वस्तूची रक्कम ही तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये जमा झाली आहे की नाही ? हे तपासण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट जतन करून ठेवणं आवश्यक आहे. 

८. तुम्ही एखादी वस्तू जर क्रेडीट कार्डने खरेदी केली तर त्यावर ‘वाढीव दुरुस्ती हमी’ ही तुम्हाला काही कंपन्यांनी मान्य केलेली असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा मोबाईल खरेदी केला, तर त्यावर मोबाईल कंपनीने एक वर्ष वॉरंटी दिलेली असते आणि एक वर्ष दुरुस्ती हमी तुम्हाला क्रेडिट कार्डने खरेदी केल्यामुळे मिळत असते. तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूसोबत जर अशी अतिरिक्त हमी मिळत असेल, तर ती वस्तू खरेदी केलेल्या महिन्याचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट ‘अतिरिक्त दुरुस्ती हमी’ लागू असेपर्यंत जतन करायला पाहिजे.

महत्वाचा लेख: मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल? 

९. क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला ‘रिवॉर्ड पॉईंट्स’, कॅशबॅक मिळत असतात. हे पॉईंट्स वापरून तुम्ही इतर वस्तू, सेवांची खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, ‘५००० रुपयांची खरेदी केल्यास ८०० रुपयांची विमान तिकिटात सूट’ अशी ती जर ऑफर असेल, तर तो कॅशबॅक मिळेपर्यंत तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. 

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सांभाळून ठेवल्यास जर इतके फायदे होणार असतील तर ते जतन करून ठेवायची सवय लावणं आवश्यक आहे. ऑनलाईन स्टेटमेंट एखाद्या फोल्डरमध्ये आणि हार्ड कॉपी एखाद्या फाईलला लावून ठेवणं हे त्याचं महत्व पटल्यावर फारसं अवघड काम नाहीये. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटची विल्हेवाट लावताना कित्येक लोक सतर्कता म्हणून त्यांना जाळून टाकत असतात. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे फक्त एक कागद नाहीये हे लक्षात घ्या आणि त्याची क्रेडिट कार्ड इतकीच काळजी घ्यावी. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…