अर्थसाक्षर क्विक हिल सायबर सिक्युरिटी
https://bit.ly/3fs34QV
Reading Time: 2 minutes

प्रायव्हसी प्रोटेक्शन परफॉर्मन्स 

ग्राहक, व्यवसाय व सरकारी यंत्रणेला सायबर सिक्युरिटी सुविधा पुरवणाऱ्या क्विक हील टेक्नॉंलॉजीने अत्यंत परिणामकारक अशी सर्वांत अद्ययावत प्रणाली बाजारात आणण्याची घोषणा केली. ग्राहकांची सायबर सिक्युरिटी जपणारी व सर्व डिजिटल डेटा संपूर्णपणे अबाधित ठेवणारी अशी ही ‘प्रायव्हसी प्रोटेक्शन परफॉर्मन्स’ संकल्पना आहे.

सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याचे देशातील व जागतिक वातावरण आणि कालसुसंगत सायबर धोके लक्षात घेऊन क्विक हील टेक्नॉंलॉजीने ही प्रणाली विकसित केली आहे.  या अंतर्गत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व संपूर्ण सुरक्षितता देत अव्याहत ब्राऊजिंगची खात्री मिळते.

अर्थसाक्षर क्विक हील - सायबर सिक्युरिटी

सायबर सिक्युरिटी – क्विक हीलची अद्ययावत प्रणाली

  • डेटा मर्यादेचे उल्लंघन होताच ऑनलाइन ट्रॅकर्स वापरकर्त्याच्या ऑनलाइन वर्तनविषयी (Online behavior) माहिती मिळविण्यास डेटा मायनर्सना सक्षम करतात आणि वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरतात. यामुळे वापरकर्त्याची गोपनीयता धोक्यात येते.
  • क्विक हीलची अद्ययावत प्रणाली अशा ट्रॅकर्सना ब्लॉक करते व त्यायोगे ग्राहकाची वेब हिस्टरी (सर्च पॅटर्न, कोणत्या वेबसाइटवर किती वेळ घालवला, इत्यादी), वैयक्तिक माहिती (वय, लिंग, कुटुंबातील सदस्य) आणि आर्थिक (गुंतवणूक, बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड्स) गोष्टींची गुप्तता पाळली जाते.
  • या व्यतिरिक्त ‘पॅरेंटल कंट्रोल’ या वैशिष्ट्यात पालक आपल्या मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेऊ शकतात, तर वेबकॅम प्रोटेक्शनमध्ये वेबकॅममधून वेबकॅम हॅक करून नजर ठेवणाऱयांवर आळा घातला जातो.
  • या वैशिष्ट्यांमुळे अशा धोक्यांवर निश्चितपणे प्रतिबंध घालता येतो.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

अँटीरन्समवेअर प्रोटेक्शन

  • ‘अँटीरन्समवेअर प्रोटेक्शन’ हे पेटंटेड तंत्र ग्राहकांच्या सायबर सुरक्षेची काळजी घेते. ही प्रणाली वाढत्या रन्समवेअर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. 
  • याद्वारे डेटा मर्यादा उल्लंघल्यामुळे गेलेला डेटाही पुनर्प्राप्त करता येतो.
  • ‘सिग्नेचरलेस बिहेवियर डिटेक्शन’ ह्या पेटंटेड तंत्राच्या सहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजंस व मशिन लर्निंग मध्ये झिरो-डे मालवेअरचे निदान करण्यास मदत होते.

वायफाय स्कॅनर

  • सध्याच्या काळात मुख्यतः वर्क फ्रॉम होम करणा-यांसाठी मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्ट टीव्ही चालवण्यासाठी वायफाय राऊटर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हॅकर्सना फक्त राऊटरला लक्ष्य करणे पुरेसे आहे.
  • क्विक हीलचे ‘वायफाय स्कॅनर’ हे अत्याधुनिक वैशिष्ट्य यासाठी उपयोगी ठरेल.
  • हा स्कॅनर वायफाय नेटवर्क तपासून संभाव्य धोक्यांचे तत्काळ निदान करतो. त्यामुळे ग्राहकाला धोकादायक बाबी ओळखून त्या सोडवणे व संपूर्ण सुरक्षित नेटवर्क मिळवणे शक्य होते.

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

क्लाऊड बेस्ड इमेल सिक्योरिटी’

  • ‘क्लाऊड बेस्ड इमेल सिक्योरिटी’ या वैशिष्ट्यामुळे स्पॅम व पुशमेल्सवर निर्बंध येतो तर ‘सेफ बँकिंग’ आणि ‘वेब सिक्योरिटी’ या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकाला ब्राऊजिंग आणि बँकिंग करताना गुप्तता व सुरक्षिततेची हमी मिळते.
  • कमीत कमी संसाधनांसह जास्तीत जास्त सुरक्षितता हेच क्विक हीलचे ब्रीद राहिले आहे.
  • पारंपरिक सिक्योरिटी पर्याय जसे डिव्हाइसचा वेग कमी करतात तसे या प्रणालीत होत नाही. याउलट ती डिव्हाइस स्पीडला जराही धक्का न लावता उत्कृष्ट कामगिरी करते.

तंत्रज्ञानातील विकासागणिक सायबर धोकेही वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत क्विक हीलने बऱ्याच सुधारणा करत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग एएल व एमएल तंत्रज्ञानाचा वापर करत अत्याधुनिक सेवा दिल्या आहेत. त्यामुळे या नव्या प्रणालीने क्विक हिलच्या ग्राहकांना संपूर्ण सुरक्षित व सर्वोत्कृष्ट  सायबर सिक्युरिटी मिळू शकेल. 

– Value360 Communications

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Cyber Security in Marathi, Quick heal protection Marathi mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.