Reading Time: 3 minutes
डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे
आजच्या लेखात आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उघडल्या जाणाऱ्या डिमॅट अकाऊंट संदर्भातील महत्वाच्या प्रश्नोत्तरांची (FAQ of Demat Account) माहिती घेऊया.
Demat Account FAQ- डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे
- साधारणपणे तुमचं बँकेत खाते असेलच. बँकेत खाते असणे ही फार सामान्य गोष्ट आहे. काही जणांची वेगवेगळ्या बँकेत अनेक खाती असतील. डिमॅट अकाऊंट हे एक प्रकारचं खातेच आहे.
- बँकेमध्ये ज्या प्रकारे आपण आपले सेव्हिंग, पैसे जमा करतो तसंच डिमॅट अकाऊंटमध्ये आपण केलेली वेगवेगळी गुंतवणूक, खरेदी केलेले शेअर्स यांची माहिती सुरक्षितपणे जतन केली जाते.
- थोडक्यात, ‘डिमॅट अकाऊंटम्हणजे असे इलेक्ट्रॉनिक अकाउंट, जिथे शेअर बाजारातील शेअर्स, इतर गुंतवणूक, इन्शुरन्स, बॉण्ड, म्युच्युअल फंड, सिक्युरिटीज, इत्यादींची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन केली जाते. यामध्ये सर्व कागदोपत्री असलेली माहिती डिजिटल फॉर्म मध्ये रूपांतरित केली जाते.
- जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिता किंवा सुरवात करता, तेव्हा डिमॅट अकाऊंट असणे अत्यावश्यक असते.
संबंधित लेख : डिमॅट खात्याबद्दल बोलू काही…
२. डिमॅट अकाऊंटची वैशिष्ट्ये-
- वरती उल्लेख केल्या प्रमाणे डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकीसंबंधी कागदोपत्री असलेली सर्व माहिती डिजिटल फॉर्म मध्ये रूपांतरित केली जाते.
- हे डिमॅट अकाऊंटवापरणे अतिशय सोपे असते. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर तुमचे अकाऊंट ओपन करून पाहू शकता. यासाठी फक्त तुमच्याकडे तुमचा लॉग इन आयडी व अकाऊंटचा पासवर्ड असणे गरजेचे असते.
- डिमॅट अकाऊंटचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, वाचणारा वेळ, पैसा आणि ऊर्जा. पूर्वी शेअर्स विकणे, खरेदी करणे, शेअर्सच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करणे, त्याची कागदोपत्री नोंद करणे ही प्रक्रिया एकंदरीत वेळखाऊ होती. यासाठी वेळ लागायचा, बरीचशी ऊर्जा व पैसा खर्च व्हायचा. पण डिमॅट अकाऊंटच्या डिजिटल फॉर्म मुळे ही प्रक्रिया ऑनलाइन झाली असून, ह्या प्रक्रियेला फारसा वेळ लागत नाही.
- त्या संबंधित कोणतीही कायदेशीर वा इतर काही अडचण आली, तर ती त्वरित दूर करण्यात येते.
३. डिमॅट अकाऊंटचे प्रकार-
- डिमॅट अकाऊंटचे 3 मुख्य प्रकार आहेत.
-
- रेग्युलर डिमॅट अकाऊंट- भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी हे रेग्युलर डिमॅट अकाऊंट असते.
- रिपेट्रीएबल डिमॅट अकाऊंट- या प्रकारातील डिमॅट अकाऊंट हे परदेशातून/ परदेशात पैसे हस्तांतरीत करू शकणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी असते. तथापि, हे अकाऊंट एनआरइ (NRE) बँक अकाऊंटशी जोडले गेलेले असणे गरजेचे असते.
- नॉन-रिपेट्रीएबल डिमॅट अकाऊंट- हे अकाऊंट देखील अनिवासी भारतीयांसाठीच असते. परंतु यातून परदेशातून/ परदेशात पैसे हस्तांतरीत करता येत नाहीत. तसेच हे अकाऊंट एनआरओ (NRO) बँक अकाऊंटशी जोडलेले असणे गरजेचे असते.
४. डिमॅट अकाऊंट उघडण्याची कारणे-
- जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता, तेव्हा डिमॅट अकाऊंट असणे अत्यावश्यक असते.
- पूर्वी शेअर्स खरेदी करणे किंवा विकणे, त्या संबंधित कागदपत्रे तयार करणे, ही कागदपत्रे नवीन शेअर धारकाला पाठवणे, ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ होती. या प्रकियेमध्ये वेळ-पैसा आणि ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च व्हायची. म्हणूनच १९९६ साली हा कागदोपत्री व्यवहार डिजिटल व्हावा व तसेच व्यापारावर ही नियंत्रण ठेवता यावे, ह्या दुहेरी हेतूने ‘एनएसई’ने (NSE) डिमॅट अकाउंटची निर्मिती केली.
- डिमॅटच्या खातेदाराला अगदी सहजतेने आपले खाते वापरता येते आणि हव्या त्या शेअर्सची खरेदी – विक्री करता येते.
हे नक्की वाचा: शेअर्स खरेदीचं सूत्र
५. डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठीची प्रक्रिया-
- डिमॅट अकाऊंट उघडणं हे बँक अकाऊंट उघडण्यापेक्षा सोपे असते. बँक अकाऊंटसाठी तुम्हाला फिजिकली बँकेत उपस्थित असणे गरजेचे असते, पण डिमॅट अकाऊंट तुम्ही तुमच्या मोबाईल, कंप्यूटर, लॅपटॉपचा वापरत करून उघडू शकता. तत्पूर्वी संबंधित काही मूलभूत गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
- शेअर बाजारात तुम्हाला डिमॅट अकाऊंट देऊ करणाऱ्या 2 डिपॉझिटोरी( थोडक्यात शेअर बाजारातील एक प्रकारची बँकच) आहेत.
- या दोन्ही डिपॉझिटोरी शेअर बाजारातील व्यापार नियंत्रित ठेवणाऱ्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)’ च्या अधिपत्याखाली, नियमानुसार काम करतात.
- शेअर बाजारात या वरील दोन्ही डिपॉझिटोरीचे ब्रोकर असतात. हे ब्रोकर संबंधित डिपॉझिटोरीचे सभासद असतात. व ते त्यांच्या ग्राहकांना डिमॅट अकाऊंट उघडून देऊ शकतात. तशी त्यांना परवानगी ही असते. उदा. आस्था ट्रेड
- लक्षात ठेवा, तुम्ही एका डिपॉझिटोरीचे केवळ एकच अकाऊंट वापरू शकता. डिमॅट अकाऊंट चालू करणे ही कागदपत्रे विरहीत व ऑनलाइन प्रक्रिया असते.
- तुम्हाला माहिती असलेल्या किंवा तुम्हाला प्रोव्हाईड केल्या गेलेल्या ब्रोकरच्या वेबसाईटवर जा.
- तिथे आवश्यक असणारी माहिती व लागणारे शुल्क भरा.
- डिमॅट अकाऊंट उघडताना तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता भासेल,
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- तुमची सही
- इत्यादी
- वेबसाईटच्या लिंकवर उल्लेख केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन त्यांची पडताळणी झाली की तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाऊंटचा नंबर मिळेल व तुम्ही शेअर बाजारातील एक भाग बनाल.
संबंधित लेख : योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?
६. डिमॅट अकाऊंटचे फायदे-
- डिमॅट अकाऊंटचे व्यवहार पुर्णतः ऑनलाइन असतात. त्यामुळे तुम्ही केव्हाही, कधीही, कुठेही अकाऊंट वापरू शकता, त्याची माहिती घेऊ शकता.
- तुमच्या सर्व गुंतवणूक, शेअर्स, सिक्युरिटीज एका ठिकाणी जतन करून सुरक्षित ठेवता येतात.
- ऑनलाइन कार्यपद्धतीमुळे, कंपनीविषयक माहिती, बोनस, शेअर्सविषयक माहितीे ई.ने तुमच्या डिमॅट अकाऊंटला अद्यावत केले जाते. तसेच, तुमच्या शेअर्सचे लाभांश, रिफन्ड किंवा व्याज हे तुमच्या खात्यात थेट जमा केले जाते.
- व्यवहाराची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने वेळ व पैसा वाचतो. घरबसल्या तुम्ही शेअर्सची खरेदी – विक्री करू शकता.
- सोयीस्कर वापर व कमी रिस्क फॅक्टर ही डिमॅट अकाऊंटची वैशिष्ट्ये आहेत.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Demat Account Marathi Mahiti, Demat Account in Marathi, Demat Account FAQ Marathi Mahiti
Share this article on :