Reading Time: 3 minutes

Devyani IPO

‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’

Devyani IPO: १० महत्वाचे मुद्दे 

१. कोणत्या क्षेत्रात कार्यरत?

 • देवयानी इंटरनॅशनल भारतातील ‘यम ब्रँड्स’ (yum brands) ची सर्वात मोठी फ्रँचायजी आहे आणि भारतातील क्विकचेन सर्व्हिस रेस्टॉरंट्स (क्यूएसआर) च्या सर्वात मोठ्या ऑपरेटरपैकी एक आहे.
 • ‘यम ब्रँड्स’ ही एक अमेरिकन फास्ट फूड ऑपरेटर कंपनी आहे. तीच ‘यम ब्रँड्स’ ‘देवयानी’च्या माध्यमातून भारतात जून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार १६६ शहरांत तब्बल ६९६ स्टोअर्स चालवत आहे.
 • यामध्येकेएफसी, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी यांसारख्या ब्रँड्सच्या स्टोअर्सचा समावेश आहे.
 • भारताबाहेर नेपाळ आणि नायजेरियात केएफसी, पिझ्झा हट यांच्यासह वान्गो आणि फूड स्ट्रीट या दोन स्वतःच्याही ब्रँड्सच्या स्टोअर्सचा समावेश आहे.

२. कंपनीचा थोडक्यात इतिहास:

 • ‘आरजे कॉर्प लिमिटेड’ने १९९१ साली ‘देवयानी इंटरनॅशनल’ची निर्मिती केली.
 • ‘यम ब्रँड्स’ सोबत १९९७ साली जोडली जाऊन देवयानीने सर्वात पहिल्यांदा जयपूरच्या ‘पिझ्झा हट’ स्टोअर्सची सूत्रे हातात घेतली.
 • त्यानंतर २६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांत तब्बल २८४ केएफसी आणि ३१७ पिझ्झा हट स्टोअर्स त्यांनी ऑपरेट करण्यासाठी घेतले.
 • ३१ देशांत ३४०० पेक्षा अधिक स्टोअर्स असणाऱ्या ‘कॉस्टा कॉफी’चे भारतात असलेल्या ४४ स्टोअर्सची जबाबदारी सुद्धा देवयानीने स्वीकारली.
 • दिल्ली, बंगळूरु, कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई या प्रमुख शहरांत ‘देवयानी’चे मोठे प्रस्थ आहे.

३. कंपनीचे व्यवस्थापक आणि शेअरहोल्डर्स:

 • रवीकांत जयपूरिया, वरुण जयपूरिया आणि आरजे कॉर्प हे कंपनीचे प्रवर्तक असून, आतापर्यंत त्यांचे ‘देवयानी’मध्ये ७५.७९ टक्के शेअर होल्डिंग आहे.
 • कंपनीत ड्युनअर्नचे १४.०७ टक्के, यम इंडियाचे ४.५७ टक्के, खंडवाला फाईनसस्टॉकचे १.८९ टक्के तसेच साबरे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचे १.५२ टक्के शेअर्स आहेत.

४. आयपीओ विषयी महत्वाचे:

 • देवयानी इंटरनॅशनलचा आयपीओ ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहील
 • या आयपीओ मार्फत १५,५३,३३,३३० एवढे शेअर्स विकून कंपनी नव्याने ४४० कोटी रुपये उभे करणार आहे.
 • तसेच गुंतवणूकदार असलेल्या ड्युनअर्नचे ६,५३,३३,३३० एवढे शेअर्स, आरजे कॉर्पचे ९ कोटी शेअर्स विक्रीस काढले जातील.
 • तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ५.५ लाख शेअर्समध्ये भागीदारी दिली जाईल.
 • असे एकूण १८३८ कोटी रुपये या आयपीओ मार्फत उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे.

५. आयपीओचे कारण:

 • कंपनी ३२४ कोटी रुपये कर्ज परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम ही समभाग वाटपासाठी वापरात येईल

६. कंपनीचे वित्तीय व्यवस्थापन:

 • कंपनीला वित्तीय वर्ष २०२० सालात १२१.४२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तो तोटा वित्तीय वर्ष २०२१ सालात घटून ६२.९८ कोटी एवढ्यावर आला. याच वर्षांतील महसूलाकडे पाहिल्यास ११३४.८४ कोटी रुपयांवरून १५१६.४ कोटी रुपये एवढा घटला गेला.

 • केएफसीने २०२१च्या वित्तीय वर्षात ६४४.२६ कोटी रुपये उत्पन्न मिळवून दिले तेच २०२० साली ६०९.१३ कोटी एवढे होते. परंतु ‘पिझ्झा हट’चे उत्पन्न ४१७.४ कोटी वरून थेट २८७.९ कोटी एवढे खाली घसरले. ‘कॉस्टा कॉफी’चे देखील उत्पन्न ८१.९६ कोटी रुपयांवरून घसरून २०२१च्या वित्तीय वर्षात २१.४ कोटीवर थांबले.

Devyani IPO

७. कंपनीच्या सकारात्मक बाजू:

 • कंपनीकडे ग्राहकांच्या पसंतीच्या श्रेणीची पूर्तता करणाऱ्या उच्च मान्यताप्राप्त जागतिक ब्रँडचा पोर्टफोलिओ आहे.
 • ही एक बहुआयामी सर्वसमावेशक क्विकचेन सर्व्हिस रेस्टॉरंट्स (क्यूएसआर) कंपनी आहे.
 • क्लस्टर-आधारित प्रमुख बाजारपेठांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे.
 • कंपनीने व्यवहार आणि परताव्यांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक गणिते शिस्तबद्ध केली आहेत.
 • कंपनीसाठी कार्यरत असणारे व्यवस्थापकीय अधिकारी दिग्गज आणि अनुभवसंपन्न आहेत.

८. गुंतवणुकीचे संभाव्य धोके:

 • आज घडीला कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. नवनव्या लाटा, प्रशासनाचे नियम यात अनेक व्यवसायांवर परिणाम झालाय. यापैकी सर्वात मोठा परिणाम हॉटेलिंग व्यवसायाला झालाय.
 • देवयानीच्या वित्तीय आलेखाची चढ उतार भविष्यातील कोव्हीड १९ च्या परिस्थितीवरच अवलंबून आहे.
 • कंपनीचा महत्वाचा भाग म्हणजे ‘यम’वर असलेली निर्भरता. भविष्यात पिझ्झा हट आणि केएफसी चालवणाऱ्या या ‘यम ब्रांड’ने करार रीन्यू नाही केला तर काय? या प्रश्नाचे दिलासादायक उत्तर आजच्या घडीला तरी मिळत नाही.
 • हेच कॉस्टा कॉफी विषयी देखील लागू होते. भविष्यात देवयानी आणि कॉस्टाचे करार तसेच राहतील, ते रिन्यू होतील/ न होतील यावर वित्तीय बाबी अवलंबून आहेत.

९. आयपीओ प्राथमिक माहिती:

 • आयपीओ किंमत पट्टा – रु. ८६ ते रु. ९० 
 • लॉटसाईज : १६५ शेअर्स  
 • किमान अर्ज रक्कम : रु.१४८५० 
 • आयपीओ  कालावधी : ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२१

१०. तुम्ही काय कराल ?

 • देवयानी मोठी उद्योग संधी आहे परंतु शेअर्सच्या किंमती कंपनीच्या नफ्याच्या गुलाम असतात असे जाणकार सांगतात.
 • सध्या उत्पन्न आणि नफा यामध्येच हेलकावे खात असलेली ‘देवयानी’ भविष्यात किती नफा मिळवेल हे सांगता येत नाही.
 • तुम्हाला लिस्टिंग गेन म्हणजे शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर शेअर्स विकून पहिल्या दिवसाचा भाववाढीचा फायदा घ्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे पण दीर्घकालीन परताव्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागू शकते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Devyani IPO in Marathi, Devyani IPO Marathi Mahiti, Devyani IPO Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…