KYC केवायसी
Reading Time: 2 minutes

केवायसी (KYC)

कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आता ‘आपला ग्राहक ओळखा’ म्हणजेच केवायसी (KYC) याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळेच नवीन ठिकाणी गुंतवणूक करताना आपले छायाचित्र असलेले मान्य ओळखपत्र व अधिवास पुरावा आपल्याला द्यावा लागतो. अनेकदा आपली बँक त्याच्या मनात आले की असा पुरावा पुन्हा देण्याची मागणी करते काही ठिकाणी विहित कालावधीत अशी माहिती न दिल्यास व्यवहार थांबवले जातात. त्यामुळे मनस्ताप होतो. प्रत्येक वेळी गुंतवणूकदारांना नव्याने फॉर्म, फोटो, स्वाक्षरी निवासाचा पुरावा आणि फोटो असलेले ओळखपत्र द्यावे लागते. यासाठी कोणते ओळखपत्र फोटो ओळखपत्र व कोणते ओळखपत्र निवासी पुरावा म्हणून चालेल तर कोणत्या गोष्टी दोन्ही कामे होतील याची मोठी यादी आहे यातील एक दोन गोष्टींच्या स्वसाक्षांकीत प्रति या अर्जासोबत किंवा अर्जाशिवाय द्याव्या लागतात.

Know Your Customer (KYC):आपला ग्राहक ओळखा (केवायसी)

  • ‘आपला ग्राहक ओळखा’ ही विनियमित प्रक्रिया असून बँक, म्युच्युअल फंड, विमा, पेन्शन, डिपॉझिटरी खाते, कंपन्या, बिगर बँकिंग फायनान्स संस्था या सर्वांसाठी एकच केंद्रीकृत ओळख क्रमांक असावा ज्यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक वेळी आपली ओळख सिद्ध करण्यासाठी लागणारा त्रास वाचेल असा यामागील हेतू होता. 
  • अशा प्रकारची सूचना सन 2012-2013 च्या अर्थसंकल्पात सुचवली होती. प्रत्यक्षात कार्य होऊन सुरुवात होण्यास जुलै 2016 पर्यत वेळ लागला. 
  • याचे व्यवस्थापन The Central Registry of Securitization and Asset Reconstruction and Security Interest in India (CERSAI) यांच्याकडून केले जाते. 
  • ही ऑनलाईन सिक्युरिटीज इंटरेस्ट रजिस्ट्री असून केवायसी रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे केंद्र सरकारने सोपवली आहे (PMLA 2005 मधील नियमावलीनुसार). त्याच्याकडून गुंतवणूकदारांची माहिती डिजिटल माध्यमात जतन केली जाते. 
  • येथे केवायसी केल्यावर त्याचा नोंदणी क्रमांक आपल्याला देण्यात येतो. हा क्रमांक आपण दिला असता वेगळी केवायसी करण्याची गरज नसते. 
  • यातील व्यक्तीची सत्यता मान्य करण्याचे अधिकार अनेक मध्यस्थाना देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे ही प्रक्रिया ऑनलाईन करणे आता सहज शक्य आहे. 
  • याप्रकारे विहित नमुन्यात आवश्यक गोष्टींसह अर्ज ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वीकारण्यात येऊन आपणास 14 अंकी केवायसी ओळखक्रमांक (KIN) पुढील पाच कामाच्या दिवसात दिला जाईल. 
  • हा क्रमांक अर्जदाराच्या मोबाईलवर तसेच मेलवर त्यास कळवण्यात येईल. यासंबंधी अन्य कोणताही पत्रव्यवहार केला जात नसल्याने याचा मागोवा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावा लागेल. 
  • काही अधिकचा तपशील हवा असेल, तर तो पूर्ण करून द्यावा लागेल. विदेशस्थ भारतीय नागरिकांना ते भारतात वास्तव्यात असताना याच पद्धतीने सी केवायसी करता येणे शक्य आहे. 
  • सी केवायसी सर्व मध्यस्थाना या ओळख क्रमांकावरून गुंतवणूकदाराची आवश्यक माहिती पडताळता येईल. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना आपल्या माहितीत काही दुरुस्ती करायची असल्यास आवश्यक पुरावे देऊन माहिती अद्ययावत करता येऊ शकेल.

KYC, EKYC, CKYC: केवायसी, इ केवायसी, सी केवायसी मधील फरक-

केवायसी:

  • केवायसी करण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असले तरी त्यात महत्वाचा फरकही आहे. 
  • यातील केवायसी कशी करायची त्यासाठी काय लागेल ते सर्वाना माहीती आहेच. 
  • प्रत्येक ठिकाणी ही माहिती नव्याने द्यावी लागते. काही ठिकाणी मागणी केल्यास पुन्हा द्यावी लागते. प्रत्यक्ष हजर राहून (IPV)  मान्यताप्राप्त मध्यस्थांच्या मदतीने ती करावी लागते.

इ केवायसी: 

  • इ केवायसी करताना आधार क्रमांकावरून गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध होते यासाठी दोन मार्ग आहेत यातील एक म्हणजे गुंतवणूकदाराने आधारशी नोंदवलेल्या मोबाईलवर एक सांकेतिक क्रमांक (OTP)  येतो. 
  • याद्वारे आपली ओळख पटवून ₹50000/- च्या मर्यादेत व्यवहार करता येतील. 
  • याशिवाय बायोमेट्रिक पद्धतीने ओळख सिद्ध केल्यास कोणत्याही मर्यादेशिवाय व्यवहार करता येणे शक्य आहे.

सी केवायसी:

  • सी केवायसी ही सर्व गुंतवणूक माध्यमात आपली ओळख सिद्ध करण्याचा उत्तम मार्ग असून आपल्या स्वतःच्या सोयीसाठी गुंतवणूकदारांना हा नोंदणी क्रमांक एकदा मिळवणे आवश्यक आहे.
  • या पद्धतीस सुरुवातीला काही समस्या आल्या होत्या. त्यामुळे याचा म्हणावा तसा प्रचार प्रसार झाला नाही. 
  • एखादी गोष्ट चांगली कशी आहे त्यापेक्षा ती वाईट कशी आहे ते पसरण्याचा वेग खूप जास्त असल्याने असे होत असावे. 
  • एक सजग गुंतवणूकदार आणि विविध सेवांचे ग्राहक म्हणून आपल्याला सी केवायसी नक्कीच उपयुक्त आहे.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: KYC in Marathi, KYC Marathi Mahiti, KYC mhanaje kay, What is KYC in Marathi, KYC Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.