Reading Time: 2 minutes
  • आजकाल प्रत्येक नागरिक स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहे. वाढते आजार,  आजारांची तीव्रता,औषधोपचार,रुग्णालयांचे खेटे आणि खर्च यासाठी आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. 
  • यात जर आजार कॅन्सर सारखा असेल तर मग अजूनच भर पडते. कॅन्सर सारख्या खर्चिक आणि जीवघेण्या आजाराचा विळखा फक्त वृद्ध लोकांना नाही तर तरुण पिढीला सुध्दा बसलाय.
  • कोणत्याही वयातील व्यक्ती ही कॅन्सरग्रस्त होऊ शकते,यातच खाण्याच्या चुकीच्या सवयी,बदलते राहणीमान,आनुवंशिकता या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. 
  • ज्या प्रमाणे कुठल्याही आजारातून बाहेर पडण्यासाठी इच्छाशक्ती गरज असते त्याच बरोबर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे तेवढेच महत्वाचे असते. प्रत्येकाही आर्थिक परिस्थिती सारखीच असते असे नाही. 
  • आज या लेखातून आपण कॅन्सर विमा पॉलिसी आणि पॉलिसी चे इतरही काही मुद्दे जाणून घेणार आहोत. 

 काय आहे कॅन्सर विमा पॉलिसी?

  • आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कॅन्सर झालेला आपण बघतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
  • कॅन्सर विमा पॉलिसी मध्ये कॅन्सर साठी लागणारे औषधी आणि उपचार समाविष्ट असतात. आर्थिक दृष्ट्या महाग असणाऱ्या उपचारांसाठी ही पॉलिसी म्हणजे एक मोठी मदतच आहे. 

कॅन्सर विमा पॉलिसीचे फायदे :

 

  • अनेक विमा कंपनी कॅन्सर विमा पॉलिसी देतात. यामध्ये कॅन्सरचे निदान झाल्यावर विमा कंपनी एक ठोक रक्कम पॉलिसी धारकाला देते. 
  • कॅन्सरचे निदान झाल्यावर प्राथमिक अवस्था असल्यास विम्याच्या हप्त्यामध्ये काही प्रमाणात सूट मिळू शकते.
  • एखाद्या वर्षी पॉलिसीधारकाने पॉलिसी क्लेम केली नाही तर पुढच्या वर्षी विम्याची रक्कम ही वाढवून दिली जाते. 
  • कॅन्सर विमा पॉलिसी देणाऱ्या विमा कंपनीचा हप्त्याचा दर वाजवी असतो. 

हे ही  वाचा  : Insurance : जाणून घ्या, आरोग्य विमा दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा किती असते?

कॅन्सर विमा का घेतला पाहिजे?

  • आनुवंशिकता
  • कुटुंबामध्ये अनुवंशिकतेने कॅन्सर आला असेल तर तुम्हालाही कॅन्सर होण्याची शक्यता असते.
  •  हे लक्षात घेऊन भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. 
  • उपचार पद्धती
  • कॅन्सर ची उपचार पद्धती ही दीर्घकालीन असल्यामुळे त्यासाठी येणारा खर्च वाढत जातो. विमा असल्याने आर्थिक बाबतीत सुरक्षितता मिळू शकते. 
  •  कॅन्सरच्या विविध टप्प्यांवर येणारा खर्च आणि उपचार पद्धती ही वेगवेगळी असते.त्यामुळे त्यासाठी येणारा खर्च पर्यायाने वाढू शकतो. 
  • अधिक लाभ :
  • इतर आरोग्य विमा पॉलिसी च्या तुलनेत कॅन्सर विमा पॉलिसी मध्ये अधिक फायदे मिळतात. 
  • काही विमा कंपनी कॅन्सरचे निदान झाल्यावर प्रथम अवस्थेत कॅन्सर असल्यास प्रीमियम मध्ये सूट देतात. 
  • टॅक्स बेनेफिट :
  • आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणेच कॅन्सर विमा पॉलिसी मध्ये देखील टॅक्स बेनिफिट मिळतो.  
  • Section 80D of the Income Tax Act, 1961 अंतर्गत ₹25,000 पर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. 
  • आर्थिक पाठिंबा
  • कॅन्सर साठी असणारे उपचार आणि औषधी खर्चिक असल्याने मोठ्या प्रमाणात पैशाची तजवीज असणे गरजेचे आहे. 
  • आर्थिक पाठिंबा नसणे ही एक काळजीची गोष्ट असू शकते, कॅन्सर विमा पॉलिसी नक्कीच अशा पॉलिसीधारकाला आधार ठरू शकते. 

कुठल्या प्रकारचे कॅन्सर हे विमा पॉलिसी मध्ये समाविष्ट असतात?

  • लंग  कॅन्सर
  • ब्रेस्ट कॅन्सर
  • स्टमक कॅन्सर
  • सर्वाइकल कॅन्सर
  • प्रोस्टेट कॅन्सर
  • ओव्हेरियन कॅन्सर 
  • हायपो फरलेक्स  कॅन्सर 

कुठल्या प्रकारचे कॅन्सर हे विमा पॉलिसी मध्ये समाविष्ट नसतात?

  • स्किन कॅन्सर 
  • प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या एचआयव्ही किंवा एड्समुळे झालेला कॅन्सर
  • जन्मजात असलेला कॅन्सर
  • कुठलेही रेडिएशनचे उपचार घेत असताना किरणोत्सर्गामुळे झालेला कॅन्सर

सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या आजाराला पॉलिसीमध्ये समाविष्ट करणे, यातील बऱ्याच गोष्टी विमा कंपनी वर अवलंबून असतात. त्यामुळे कंपनी परत्वे या गोष्टी बदलू शकतात. 

 

 निष्कर्ष : 

  • कॅन्सर रोखण्यासाठी पौष्टिक अन्न, नियमित व्यायामाची सवय असावी. तंबाखू किंवा तत्सम गोष्टी टाळाव्यात. 
  • कॅन्सर विमा पॉलिसी बद्दल माहिती आणि फायदे लक्षात घेऊन भविष्यामध्ये येणाऱ्या अनिश्चितेसाठी जागरूक रहावे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…