Reading Time: 2 minutes
  • आपल्या देशात आकडेवारीनुसार सध्या कोट्यवधी असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. परंतु, आत्तापर्यंत या कामगारांचा कोणताही अचूक व पुरेपूर डेटा नसल्यामुळे सरकारी योजनांचा (Government schemes) लाभ या कामगारांपर्यंत पोहोचणे अशक्य होते. 
  • ही कमतरता दूर करण्यासाठी, भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ पासून ‘ई-श्रम’ (e-SHRAM) ही योजना अमलात आणली आहे.
  • देशातील प्रत्येक असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या गरजा समजून घेण्यासाठी व प्रत्येक कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकाने  हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेबद्दलचा एक उत्तम भाग म्हणजे ही पूर्णपणे विनामुल्य व ऑनलाईन प्रक्रिया आहे. 
  • ई-श्रम योजने बद्दलची सवितर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.    

highlights :

  • ‘‘ई-श्रम’’ योजना काय आहे ?
  • ‘ई-श्रम’ योजनेचे फायदे 
  • योजनेची उद्दिष्टे 
  • ई-श्रम योजनेचे लाभार्थी 
  • ई-श्रम पोर्टलवर  नोंदणी कशी कराल?
  • ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे 

 

‘‘ई-श्रम पोर्टल’’ योजना काय आहे ? (What is ‘e-SHRAM’)

  • असंघटीत कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने हे ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. 
  • या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड देण्यात येईल. ज्यावर १२ अंकी युनिक कोड म्हणजेच UAN क्रमांक दिला जाईल जो संपूर्ण देशात वैध आहे.  
  • या कार्डद्वारे सर्व असंघटीत कामगार केव्हाही, कुठेही सामाजिक सुरक्षा योजनांचे विविध लाभ घेऊ शकतात.  
  • नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले आहे, ज्याचा कालावधी हा एक वर्षांसाठी आहे.
  • देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणारे १६ ते ५९ या वयोगटातील सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगार या ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

 

हे ही वाचा – LIC Bima Ratna Yojana : LIC ची नवी योजना; संरक्षण व बचत यांचा मेळ घालणारी “विमा रत्न योजना”

 

‘ई-श्रम’ योजनेचे फायदे काय ? (Benefits of ‘e-SHRAM Portal’)

  • देशभरात रोजगार शोधण्यास मदत करण्यासाठी शैक्षणिक व कौशल्य तपशिलांसह कामगारांचे संपूर्ण प्रोफाईल असेल.  
  • केंद्र व राज्य सरकारच्या सर्व नवीन सरकारी योजना व सुविधांमध्ये स्वतंत्रपणे वेगळी नोंदणी न करता  प्रवेश. 
  • १ वर्षांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत अपघाती विमा संरक्षण. 
  • अपघाती मृत्यू व कायमचे अपंगत्त्व आल्यास दोन लाख रुपये आणि अंशतः अपंगत्त्वासाठी एक लाख रुपयांची मदत.
  • केंद्र व राज्य सरकारांना सर्व पात्र असंघटीत कामगारांना महामारी किंवा आपत्तीच्या परीस्थितींमध्ये आर्थिक मदत. 
  • स्थलांतरित कर्मचाऱ्यांचा मागोवा घेण्यास व त्यांना  अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त. 

 

योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

  • भारतातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या ४ कोटींहून अधिक कामगारांना संघटीत करून त्यांचे केंद्रीकृत सरकारी डेटाबेस तयार करणे. .
  • डेटा रेकोर्ड व ते प्रमाणित करण्यासाठी आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या आधार पायाभूत सुविधांचा वापर. 
  • सर्व अर्जदारांसाठी वैयक्तिक शैक्षणिक व कौशल्य प्रोफाईल तयार करणे. 
  • देशाच्या विविध भागांमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांना आवश्यकतेनुसार संघटीत रोजगार उपलब्ध करून देणे.

 

ई-श्रम योजनेचे लाभार्थी – (Eligibility Criteria for ‘e-SHRAM’ scheme)

  • भाजी आणि फळ विक्रेते 
  • वृत्तपत्रे विक्रेते 
  • लेदर काम करणारे 
  • घरगुती काम करणारे
  • सुतार 
  • इमारत बांधकाम करणारे मजूर
  • कोळी 
  • शेतमजूर 
  • लहान व अल्पभूधारक 
  • सीएससी केंद्र चालक 
  • मनेरगा कामगार इत्यादी. 

 

हे ही वाचा – Worst Money Habits : तरुण वयात आर्थिक नियोजनाकडे द्या लक्ष

 

योजनेची नोंदणी कशी कराल? (e-SHRAM portal Registration)

  • आधार क्रमांक व बँक खाते क्रमांकाच्या सहाय्याने ई-श्रम च्या https://eshram.gov.in/hi/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. 
  • यामध्ये जन्म दिनांक, मुळ गाव, संपर्क क्रमांक व सामाजिक श्रेणी यांसारखी आवश्यक माहिती द्यावी.  
  • कामगारांना १२ अंकी अनोखा संकेतांक म्हणजे युनिक कोड असलेले ई-श्रम ओळखपत्र दिले जाईल, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा समावेश आहे. 
  • या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी १४४३४ हा राष्ट्रीय निःशुल्क संपर्क तयार करण्यात आला असून याद्वारे कामगारांना मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे  निरसन केले जाते. 

 

ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी महत्त्वाची कागदपत्रे –

  • बचत बँक खाते व बँकेतील खात्याचा IFSC कोड
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड)
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड 
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर 
  • निवास प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा पुरावा 

या योजनेसाठी तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा व एक चांगले काम केल्याचे समाधान मिळवा ! 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.