Financial Planning
Financial Planning
Reading Time: 3 minutes

Worst Money Habits 

तरुण वयात आर्थिक नियोजनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मजा – मस्ती करणे, फिरायला जाणे, महागड्या वस्तू खरेदी करणे यांसारख्या गोष्टींवर जास्तीत-जास्त खर्च केला जातो व यामुळे बचत व गुंतवणुक करणे याला फारसे महत्व दिले जात नाही.

परंतु तरुण वयात नवीन नोकरीला लागल्यानंतर फक्त वर्तमानाचा विचार करणे चुकीचे आहे. चुकीच्या आर्थिक सवयींमुळे भविष्यात तुमची आर्थिक परिस्थिती खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी आत्तापासूनच बचत व गुंतवणूक करणे याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी खाली दिलेल्या चुकीच्या आर्थिक सवयी टाळणे गरजेचे आहे.

हेही वाचा – Financial Planning : पहिल्या नोकरीपासून सुरूवात करताय? असे करा आर्थिक नियोजन

१) बजेट तयार न करणे – आर्थिक नियोजनात मासिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे असते. बजेट तयार  केल्यामुळे आवश्यक खर्च व अनावश्यक खर्च यामधील फरक लक्षात येतो व अनावश्यक खर्च टाळता येतो. मासिक बजेट  तयार केल्यामुळे जास्तीत – जास्त गुंतवणूक व बचत करण्यास मदत होते.

२) बचत करण्यास प्राधान्य न देणे – सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी बचत करणे अत्यंत गरजेचे असते. तरुण वयात सहसा  बचत करण्यास प्राधान्य दिले जात नाही. परंतु अगदी तरुण वयातच बचतीचे महत्त्व लक्षात घेणे व बचत करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमध्ये आर्थिक गरज भासू शकते अशा वेळेस आधीपासून केलेली बचत उपयोगी पडते.

३) लक्ष न देता खर्च करणे – अनेकदा महिना अखेरीस आपले पैसे कसे संपले या गोष्टीचे आश्चर्य वाटते. याचे कारण म्हणजे आपल्या खर्चावर ताबा न ठेवणे. तरुण वयात मित्र-मैत्रिणींच्या संगतीमुळे फिरायला जाणे, नवनवीन गोष्टी खरेदी करणे यांसारख्या गोष्टींवर खर्च कारणे या गोष्टींची सवय लागू शकते परंतु या सर्व सवयींचा तुमच्या आर्थिक नियोजनावर वाईट परिणाम होत असतो. आपण महिन्याला किती खर्च करतो कोणता खर्च करणे आवश्यक आहे कोणत्या प्रकारच्या अनावश्यक आहे या गोष्टींचा मागोवा घेणे गरजेचे आहे.

४) कमाईपेक्षा खर्च जास्त असणे – महिन्याच्या शेवटी हातात पैसे न उरणे हे तुमची आर्थिक परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे उदाहरण आहे.

प्रत्येक महिन्याला जसे बचत करणे महत्त्वाचे असते तसेच आपला खर्च कमी कसा करता येईल याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. खर्चावर नियंत्रण ठेवल्याने बचत करणे अवघड जात नाही.

५) अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे – पुरेशी बचत न होण्याचे कारण म्हणजे अनावश्यक गोष्टींवर विचार न करता खर्च करणे. तरुण वयात मजा मस्ती करणे फिरायला जाणे महागडे गॅजेट्स खरेदी करणे यांसारख्या गोष्टींवर जास्त खर्च केला जातो. हा अनावश्यक खर्च सतत केल्यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम होतो.

हेही वाचा – Financial Planning For couples : सुखी संसारासाठी आर्थिक नियोजनाचे ‘हे’ १० नियम

 

६) आर्थिक उद्दिष्टे निश्चित न करणे – बचत करताना तसेच आर्थिक नियोजन करताना  आर्थिक उद्दिष्टे निश्चित असणे अत्यंत महत्त्वाचे असते जेणेकरून  त्यानुसार बजेट तयार करणे व बचत करणे सोपे जाते. घर खरेदी करणे असो,  गाडी खरेदी करणे किंवा इतर काही आर्थिक उद्दिष्टे असेल तर पूर्ण करण्याचे ध्येय असल्यामुळे  अनावश्यक खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करण्यास महत्त्व दिले जाते.

७) विमा संरक्षणास महत्व न देणे – आर्थिक नियोजन करताना बचतीबरोबरच विमा संरक्षण असणे देखील महत्त्वाचे असते. आत्ता तरुण वयात मला विमा संरक्षणाची काहीच गरज नाही हा गैरसमज आहे. वाढता वैद्यकीय खर्च बघता एक छोटासा अपघात झाल्यास तुम्ही केलेली बचत कदाचित पुरेशी नसू शकते. भविष्यात आपत्कालीन वैद्यकीय आणीबाणी मध्ये विमा संरक्षण असेल तर आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होते.यामुळे विमा संरक्षण असणे आज काळाची गरज आहे.

८) सेवानिवृत्तीसाठी बचत न करणे –  बजेट तयार केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे भविष्यासाठी तसेच सेवानिवृत्तीसाठी बचत करणे ! आत्तापासूनच सेवानिवृत्ती साठी बचत करण्याची आवश्यकता नाही असा विचार करणे चुकीचे आहे. अगदी पहिल्या नोकरी पासून भविष्यासाठी तसेच सेवानिवृत्तीसाठी थोडी – थोडी बचत करणे आवश्यक आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक अडचणी भासत नाहीत.

९) क्रेडिट कार्डचा नियमित वापर करणे – प्रत्येक खरेदी साठी विचार न करता  क्रेडिट कार्डचा वापर केला जातो परंतु क्रेडिट कार्डचे बिल आल्यानंतर ते भरता येत नसेल तर क्रेडिट कार्ड कर्ज वाढत जाते. ही सवय आर्थिक भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हेही वाचा – 

१०) महागडी जीवनशैली, आलिशान राहणीमान – नवीन नोकरी लागल्यानंतर किंवा नोकरीत प्रमोशन मिळाल्यानंतर  खर्च वाढणे, महागड्या आलिशान वस्तूंवर विचार न करता खर्च करणे, ट्रीप प्लॅन करणे, खर्चा कडे लक्ष न देणे, सतत कसलेतरी सेलिब्रेशन करणे या गोष्टी साहजिक आहे परंतु हे सर्व मर्यादित कालावधी पर्यंत ठीक आहे यामुळे आलिशान राहणीमानाची सवय लागू शकते ज्यामुळे बचत,गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे शिल्लक राहणे कठीण होते.

वरील चुका टाळून सुखी, समाधानी व समृध्द आयुष्य तुम्ही सहज जगू शकता. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

नोटाबंदीपासून ठप्प नागपूरातील लाकूड व्यापाराच्या संकटात भर

Reading Time: < 1 minute लाकडावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्यात आला असला तरी सरकारने…

सोने खरेदीविक्रीवर पॅनकार्ड अनिवार्य

Reading Time: < 1 minute सद्य परिस्थितीत दोन लाख रुपयांच्यावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.…

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutes आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

आजचा अर्थविचार

Reading Time: < 1 minute Share this article on :