वर्ष 2004 मध्ये सुरू झालेली फिडेल सॉफ्टटेक ही पुणे स्थित कंपनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामधे कार्यरत आहे. सुनील कुलकर्णी हे फिडेल सॉफ्टटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना सेवा आणि सुविधा देताना स्थानिक भाषेचा वापर करून वितरण आणि समर्थन (डिलिव्हरी- सपोर्ट ) दिले जाते. कंपनीने लँग्वेज इंजीनियरिंग , क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस, एंटरप्राइज प्रॉडक्ट सर्व्हिसेस या काही सेवांमध्ये विशेष असे प्राविण्य मिळवले आहे.ही कंपनी ISO-9001, ISO-27001 प्रमाणित आहे.
जेव्हा स्थानिक भाषेत ग्राहकांना तांत्रिक प्रश्नांबाबत उत्तरं दिली जातात तेव्हा ही सुविधा अधिक परिणामकारक होते असे म्हणता येईल. “कंपनीची गेल्या काही वर्षातली प्रगती पाहिली असता येणाऱ्या काही वर्षात कंपनीची आर्थिक उलाढाल ही शंभर कोटी रुपयांच्या पुढे जाईल” असे वक्तव्य सुनील कुलकर्णी यांनी कंपनीच्या या वर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये केले आहे. याच कंपनीची थोडक्यात माहिती बघूया.
फिडेल सॉफ्टटेक कंपनीच्या आयपीओचा आढावा :
- फिडेल सॉफ्टटेक कंपनी 10 जून 2022 ला एनएसई एसएमईवर लिस्ट झाली .
- फिडेल सॉफ्टटेक कंपनीचा आयपीओ 30 मे, 2022 रोजी सर्वांसाठी सुरू झाला आणि 2 जून, 2022 बंद झाला होता.
- इश्यूची किंमत प्रती शेअर Rs.37 इतकी होती. सध्या कंपनीच्या शेअरचे मूल्य 112 रुपये आहे.( शेअरचे मूल्य 16 ऑगस्ट 2024 च्या मार्केट बंद नुसार )
- फिडेल सॉफ्टटेक कंपनीचा आयपीओ तब्बल 102 पटीने ओव्हरसबस्क्राइब झाला होता. यावरून गुंतवणूकदारांनी आयपीओला खूप छान प्रतिसाद दिला हे लक्षात येते.
हे नक्की वाचा : इरेडा इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी
कंपनीचा वार्षिक अहवाल :
- वार्षिक अहवालाच्या माहितीपत्रकानुसार, आर्थिक वर्ष 2023-2024 मधे फिडेल सॉफ्टटेकला जवळपास 6 करोंड इतका नफा झाला आहे.
- याच अनुषंगाने कंपनीने शेअर होल्डरसाठी लाभांश जाहीर केला आहे.
- चालू आर्थिक वर्षात कंपनीने प्रत्येक शेअर मागे Rs. 1.10 इतका लाभांश जाहीर केला आहे.
भारत जपान संबंध :
- कंपनीचा व्यवसाय हा प्रामुख्याने जपान या देशासोबत होतो. जपान-भारत यांच्या संबंधावर लक्ष केंद्रित करून तंत्रज्ञान-भाषा-कन्सल्टिंगबाबत सेवा आणि सुविधा देणारी तसेच स्मॉल अँड मिडीयम साईज एंटरप्राईजेस (SME) मधली फिडेल ही पहिली आयटी आणि सल्लागार सेवा देणारी कंपनी आहे.
- कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, “भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे हे 70 वे वर्धापन वर्ष आहे आणि म्हणूनच आमच्यासाठी खूप खास आहे.”
“फिडेल सॉफ्टटेकची प्रगती आणि नफा हे कंपनीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सकरात्मकच आहे. नवीन तंत्रज्ञान आणि एआय यांच्या एकत्र येण्याने भाषा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांचे एकत्रिकरण यामध्ये फिडेलने स्वतःचे चांगले स्थान निर्माण केले आहे.” असंही सुनील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
#फिडेल सॉफ्टटेक #स्मॉल अँड मिडीयम साईज एंटरप्राईजेस (SME) #माहिती तंत्रज्ञान