अर्थसाक्षरता वर्कशॉप

Reading Time: 2 minutes

अर्थसाक्षर.कॉमच्या वतीने शनिवारी पुण्यातील एका नामवंत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ५० हून अधिक  कर्मचाऱ्यांसाठी Fin-Literacy वर्कशॉप घेण्यात आलं. नोकरवर्गाने आपण कमवलेल्या पगाराबाबत अधिक सजग आणि अर्थसाक्षर व्हावे अश्या उद्देशाने कंपनी आणि अर्थसाक्षरच्या संयुक्त विद्यमाने हे वर्कशॉप घेण्यात आलं. सी.ए. श्रृती शाह-साठे आणि सी.ए. अभिजीत कोळपकर यांनी या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन केलं.

  • “माझ्याकडे पैसेच उरत नाही, पगार कुठे जातो कळतच नाही” असे प्रश्न वारंवार पडत असतील तर आपण कुठे चुकतोय आणि आपण काय करायला हवं हे उलगडून सांगणारं हे वर्कशॉप होतं. श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या समाधानी तर प्रत्येकालाच व्हायचं असतं, परंतु ते सत्यात उतरवण्याच्या प्राथमिक पायऱ्या कोणत्या असाव्या याची माहिती अत्यंत सोप्या भाषेत सांगण्यात आली

  • आर्थिक नियोजन का आणि कसे करावे, आपली उद्दिष्टं ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याची वेगवेगळ्या उदाहरणांतून माहिती देण्यात आली.

  • नेटवर्थ कसे मोजावे हे जाणून घेण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मासिक बजेट कसे आखावे हे जाणून घेण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • अशी उद्दिष्ट ठरवताना आपली आत्ताची आर्थिक स्थिती कशी ओळखावी, नेटवर्थचे महत्त्व सांगून प्रत्येकाला ते कसे मोजावे याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आलं. त्याचबरोबर महिन्याचं बजेट आखण्याचं महत्त्व, ते कसे आखावे ह्याचंही छोटंसं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. 

  • गुंतवणुकीच्या पारंपारिक पर्यायांबरोबरच आजच्या काळातले गुंतवणुकीचे नविन पर्याय, इन्श्युरन्सचे महत्त्व, पॉन्झी स्कीम्स आणि इतर फसव्या योजनांपासून कसे सावध रहावे अश्या अनेक महत्त्वाच्या आणि पगारदारासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.

  • वर्कशॉपच्या शेवटी सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक शंकांचं दिलखुलास निरसन करण्यात आलं.

आपल्याला आपल्या कंपनीत, संस्थेत वा इतर ठिकाणी असे वर्कशॉप घ्यायचे असल्यास info@arthasakshar.com या ईमेल आय.डी.वर. संपर्क साधा.

याच वर्कशॉपमधली काही क्षणचित्रे-

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *