Reading Time: 3 minutes

दरवर्षी जून महिन्यातला पहिला आठवडा हा भारतात फायनान्शिअल लिटरसी विक अर्थात अर्थसाक्षरतेचा आठवडा म्हणून पाळला जातो. दिवसेंदिवस सुधरणाऱ्या व प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार तर वाढले आहेतच, पण त्यांचं स्वरूपही बदललं आहे. काळ कागदोपत्रांचा असो वा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा, व्यवहार थांबत नाहीत आणि जिथे पैसा आला, तिथे फसवणुकही आलीच. आणि आपण याबाबतीत कितीही सावध आणि प्रगत झालो तरी त्याचा अर्थ आपण अर्थसाक्षर झालो असा होत नाही.

अर्थसाक्षरतेचा अर्थ फक्त व्यवहारांत सावधगिरी बाळगणे नाही, तर आपल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करणे आणि फसवले न जाता संपूर्ण नैतिक मार्गांनी अधिकाधिक बचत करणे असा होतो. ह्यासाठी रिझर्व बँकेने ग्राहकांसाठी अनेक सुविधा, योजना उपलब्ध करून ठेवल्या आहेत. दुर्दैवाने आपल्याला त्याबद्दलही माहिती नसते. आपल्या हक्कांबद्दल व अधिकारांबद्दल माहिती नसणे हा सुद्धा आर्थिक निरक्षरतेचाच भाग झाला. हीच आर्थिक निरक्षरता दूर करणे हाच अर्थसाक्षर.कॉमचाही मुख्य उद्देश आहे. तर ह्या वर्षीच्या ४ ते ८ जून ह्या अर्थसाक्षरतेच्या आठवड्यात अशाच काही साध्या-सोप्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

१. तक्रार नोंदवणे-

तक्रार नोंदवणे ही प्रक्रिया म्हणजे बँकेत अनेक खेपा घालाव्या लागणे, योग्य उत्तरं न मिळणे, योग्य पर्याय न मिळणे, वगैरे गोष्टी डोक्यात येतात. पण एक गोष्ट आपण सगळेच मान्य कराल, ती म्हणजे, ह्यातला ९०% भाग आण इतरांच् अनुभवांतून ऐकलेला असतो. एक तर आपल्या वाट्याला असा काही चुकीचा व्यवहार आलेला नसतो, नाहीतर तो किरकोळ समजून किंवा ह्या ऐकीव गोष्टींना घाबरून तो आपण दुर्लक्षित करतो. पण तंत्रज्ञान सुधारलं तशी व्यवस्थाही सुधारली आहेच. पुर्वीच्या अनुभवांवरून आता तोटा आणि माघार स्विकारणे बरोबर नाही. रिझर्व बँकेने ग्राहकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी करून त्यावर अधिकाऱ्यांचं नियमित लक्ष असण्याची खातरजमा केली आहे.
कार्ड किंवा अन्य स्टेटमेन्ट्समध्ये चुकीचे कर लावले व आकारले जाणे, ए.टी.एम. मधून व्यवहार पूर्ण होऊनही पैसे न मिळणे किंवा कमी मिळणे, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधित काही अडचणी किंवा कर्जासंबंधित काही अनाकलनिय चुका ह्या आणि इतर कोणत्याही अडचणींसाठी तुम्ही तुमच्या बँकेतील तक्रार नोंदणी वहीत म्हणजेच कम्प्लेन्ट रजिस्टरमध्ये तक्रार दाखल करू शकता किंवा बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. ह्या कोणत्याच प्रक्रियेसाठी बँकेतली कोणतीही व्यक्ती तुम्हाला अडवू शकत नाही. तक्रार दाखल केल्यापासून एक महिन्याच्या आत जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर तुम्हाला रिझर्व बँकेकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तक्रार दाखल केल्याच्या योग्य अर्ज आणि कागदपत्रांसह तुम्ही रिझर्व बँकेत दाद मागू शकता. किंवा इथेही ऑनलाईन फॉर्म भरण्याचा मार्ग उपलब्ध आहेच. त्यासाठी पुढील लिंकला भेट द्या- https://bankingombudsman.rbi.org.in

२. रिस्क विरूद्ध रिटर्न्स-

जिथे-जिथे तुमच्या गुंतवणूक मुद्दलावर इतर उपलब्ध पर्यायांपेक्षा अधिकाधिक परतावा देण्याचं सांगितलं जातं तिथे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे हे समजून घ्या. अधिक परतावा (रिटर्न्स) म्हणजेच जास्त रिस्क. जास्त दाखवलेल्या दरांनी हुरळून जाऊ नका.  बँका ह्या रिझर्व बँकेच्या नियमनात येत असल्याने बँकेत असलेल्या ठेवी सुरक्षित असतात. काही गडबड झाल्यास तक्रार दाखल करून योग्य मागोवा घेता येतो. बँक ही सरकारी संस्था असल्याने किंवा सरकारच्या अधिपत्याखाली येत असल्याने त्यांना तुम्हाला उत्तरं देणे भाग आहे. अडचण आल्यास तुम्ही संस्थेला जबाबदार धरू शकता. खाजगी ठिकाणी ज्यांचा काहीच ठावठिकाणा नसतो, जे रिझर्व बँकेचे नियम पाळत नाहीत आणि रिझर्व बँकेच्या नियमनाखालीदेखील येत नाहीत अशा ठिकाणी गुंतवणूक करणे नेहमीच धोकादायक असते. केवळ चार पैसे जास्त मिळतील या हव्यासापोटी तुम्ही तिथे पैसे गुंतवले तर उद्या घोटाळा झाल्यावर तुम्हाला कुठेच जाब विचारता येणार नाही आणि तुमचे पैसेही परत मिळणार नाहीत. शिवाय, बँकेत ठेवलेल्या ठेवी ह्या रू. १,००,००० प्रति ग्राहक प्रति बँक अशा डिपॉझिट इन्शुरन्स*  द्वारे सुरक्षित असतात. (*अटी लागू)

ग्राहकांना अधिक दरांचे आणि पैशाचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या अशा संस्थांवर आळा बसावा म्हणून भारत सरकारने रिझर्व बँकेच्या संयुक्त विद्यमाने सचेत हा उपक्रम सुरू केला आहे. www.sachet.rbi.org.in ह्या संकेतस्थळावर आपण अशा घोटाळेबाज संस्थाविषयी माहिती देऊन तक्रार दाखल करू शका व त्याचा पाठपुरावाही करू शकते.

सचेतबद्दल अधिक माहिती आपण ह्याआधी अर्थसाक्षरवर वाचलीच आहे. 

 

३. डिजीटल व्यवहार करताना सावधानता बाळगा-

हे करा

ब्राऊजर/वेबसाईट/ऍप पैसे पाठवणे क्रेडिट/डेबिट कार्ड
व्हेरिफाईड आणि विश्वासार्ह ब्राऊजर्सचाच वापर करा ओळखीच्याच व्यक्तीस पैसे ट्रान्सफर करा. आपले कार्ड व त्याच्या वापरावर लक्ष ठेवा.
HTTPS ने सुरक्षित वेबसाईट्सचाच वापर करा. युपीआयद्वारे पैसे पाठवताना पेमेन्ट कलेक्ट रिक्वेस्टची खातरजमा करा. प्रत्येक व्यवहारानंतर मोबाईलवर येणारा मेसेज तपासा. योग्य तितक्याच रकमेचा व्यवहार झाला असल्याची पडताळणी करा.
पेमेन्टसाठी वापरत असलेले ऍप्स नियमित अपडेट करा. एटीएम किंवा व्यवहारांच्या पावत्या योग्य प्रकारेच फाडून किंवा जाळून फेका. आपली कोणतीही माहिती त्यावरून चुकीच्या माणसाला कळणार नाही ह्याची खात्री करा.

हे करू नका

लॉग-इन करताना गुपीत माहिती क्रेडिट/डेबिट कार्ड
सार्वजनिक ठिकाणचे कॉम्प्युटर्स वापरून व्यवहार करू नका. पिन नंबर, ओ.टी.पी., सी.व्ही.व्ही., यु.पी.आय. पिन नंबर कोणालाही सांगू नका. आपले कार्ड इतरांना वापरायला देऊ नका.
पासवर्ड नसलेले, फ्री वायफाय वापरून व्यवहार करू नका. वरील माहिती कोणत्याही मोबाईल फोनमध्ये सेव्ह करू नका. आपल्या कार्डचे कोणतेही तपशील
(पिन नंबर, सी.व्ही.व्ही., इ.) कोणालाही सांगू नका.

कोणत्याही बँकेला/वित्तसंस्थेला किंवा तेथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांना हे तपशील विचारण्याची परवानगी नसते. व कोणी असे करतही नाही.

सरते शेवटी, तुमच्या खात्यात असे काही अनोळखी व गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास-

 • चिंतेत न पडता तात्काळ तक्रार दाखल करा.
 • आपल्या बँकेचे पुढील तपशील आपल्याला व घरच्यांना नेहमी माहिती असतील ह्याची खात्री घ्या-
  • बँक शाखेचा फोन नंबर
  • बँकेचा टोल-फ्री कस्टमर केअर नंबर
  • बँकेचा ईमेल-आय.डी.
  • होम-ब्रॅंचचा पत्ता
  • ई-मेल व मोबाईल अलर्टसाठी नोंदणी करून ठेवा.
 • तुम्ही दुर्लक्ष केल्यास-
  • आपला पिन नंबर, सी.व्ही.व्ही., इ गुपीत माहिती इतरांना सांगणे हा तुमचा हलगर्जीपणा असतो. अशा प्रकारे फसवणूक होऊनही तक्रार दाखल न केल्यास तुमचेच आर्थिक नुकसान होते व भविष्यातही होत राहू शकते.
  • तुम्ही तक्रार दाखल केल्यावरही तुम्हाला परतावा मिळाला तरी बँकेचे नुकसान होतेच.
  • त्यामुळे आपली गुपीत माहिती कोणालाही सांगू नका.
 • बँकेने दुर्लक्ष केल्यास-
  • बँकेचेच नुकसान होते.
  • तुम्ही आपल्या परताव्यासाठी व न्यायासाठी रिझर्व बँकेकडे दाद मागू शकता.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…