Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes

Share Market Investment

शेअर मार्केट गुंतवणूक (Share Market Investment) म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा.”असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट ब्रोकर किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच. 

डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ)

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूकीचे नियम

१. शेअर बाजार आणि आंधळी उडी मार – हे टाळा-

 • सामान्यतः तुम्ही तुमचे सहकारी, मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तींकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबद्दल ऐकलेले असते. ही चर्चा केवळ शेअर बाजारातून मिळणाऱ्या नफ्यावरचं आधारलेली असते. 
 • या चर्चेने प्रभावित होऊन, कोणतीही माहिती न घेता तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करायचा ठरवता. 
 • तुम्ही शेअर बाजारात फक्त चलतीत असणारी फॅशन म्हणून गुंतवणूक करणार असाल, तर शेअर बाजारात तुम्ही चुकीच्या उद्देशाने प्रवेश करत आहात. 
 • जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुमचे आर्थिक धोरण, उद्दिष्ट व नियम निश्चित करा. शेअर बाजारात प्रवेश करण्याचं हे तुमचं शाश्वत कारण असेल.

२. शेअर बाजार म्हणजे नेहमीच विनासायास पैसा नव्हे-

 • तुम्ही आतापर्यंत शेअर बाजारात नशीब कमावलेल्या, भरपूर पैसा मिळवलेल्या माणसांच्या कथा ऐकल्या असतीलच. 
 • याच ऐकीव कथांमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा होणे साहजिक आहे. त्यामुळे गुंतवणूक केल्यानंतर ठराविक काळाने गुंतवणूकीची भरमसाठ परतफेड व्हावी, अशी तुमची अपेक्षा असते. तर लक्षात घ्या की शेअर मार्केट हे काही मनी मेकिंग मशीन नाही. इथे नफा करवून घ्यायचा असेल तर संबंधित किमान ज्ञान व माहिती असणे आवश्यक आहे. 
 • शेअर्स खरेदी संबंधी धोरणे ठरवणे व ती कशी राबवायची याची माहिती हवी. शेअर बाजारातून झटपट व विनासायास पैसे कमावण्याच्या फंदात बऱ्याच लोकांनी त्यांचं सर्वस्व गमावल्याच्या ही घटना आहेतच. त्यामुळे गुंतवणूक करताना आवश्यक ती माहिती घेऊन व योग्य ठिकाणीचं करा. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

३. कोणतीही घाई नको, विचार करायला वेळ घ्या-

 • शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर्स खरेदी संबंधीत प्राथमिक गोष्टी व त्यातल्या सिक्युरिटीजची माहिती करून घ्या. 
 • शेअर मार्केट संबंधी या गोष्टी माहीतच असाव्यात –
  • शेअर्स निवडण्याची अथवा खरेदी करण्याची लोकप्रिय किंवा रूढ पद्धत व वेळ.  उदा. मूलभूत व तांत्रिक विश्लेषण करून.
  • शेअर्स बाजारातील आर्थिक परिमाणं व त्यांच्या व्याख्या व परिभाषा माहिती करून घ्या.
  • उदा. PE Ratio वापरून मिळणारा नफा), EPS( Earning per share – प्रत्येक शेअर मधून मिळणारी रक्कम वा नफा ), ROE ( return on equity – शेअर धारकाला शेअर्स मधून मिळणारे एकूण व सरासरी उत्पन्न) मार्केट कॅप (कंपनीची डॉलर मधली किंमत),  
  • शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेचे परस्पर संबंध समजून घ्या. महागाई, जीडीपी मध्ये वाढ किंवा घट, वित्तीय तूट, क्रूड तेलाच्या किंमतीमुळे मार्केट वर होणारा परिणाम, रुपयाची डॉलर मधली किंमत या गोष्टींचा शेअर बाजारावर कश्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो, हे  माहिती असायला हवं. 

डिमॅट अकाउंट म्हणजे काय?

४. अंथरूण पाहून पाय पसरावेत-

 • शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या भागधारकांकडून उत्साहात होणारी गोष्ट म्हणजे, ज्या रकमेचा तोटा सहन करणं अगदीच अशक्य आहे, अशी अवाजवी रक्कम शेअर्समध्ये गुंतवणे. 
 • कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीमध्ये “जोखीम” असतेच. तसंच, शेअर बाजारातली गुंतवणूक ही सुद्धा जोखीम आहे. ज्याप्रमाणे नफा मिळण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे तोटा सहन करावा लागण्याची सुद्धा शक्यता असते. 
 • तुमचं वय, आर्थिक क्षमता, उत्पन्नाचे इतर मार्ग, निवृत्तीची वर्षे ई. गोष्टींचा विचार करून शेअर बाजारात रक्कम गुंतवा. जेणेकरून नुकसान झालेच, तर ते तुम्ही सहज सहन करू शकाल. 

भविष्यातील तरतुदीसाठी गुंतवणूक हवीच, पण सगळी साठवणूक, तुमचा इमर्जन्सी फंड गुंतवणूकीसाठी वापरू नका. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Share Market Investment Marathi, Share Market Investment in Marathi, Share Market Investment Marathi Mahiti

Leave a Reply

Your email address will not be published.