तुमची कार्डस् गुगल पे सोबत जोडली आहेत का?

Reading Time: 2 minutes
 • गुगल पे ने जाहीर केलेली नवनवीन वैशिष्ट्ये वापरात आणायची असतील तर त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक कार्डस् आणि व्हाउचर्स गुगल पे ला जोडण्याची सोय आता आपण वापरू शकता. वेगवेगळे कार्डस् त्यांचे वेगवेगळे पासवर्डस, तसेच नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विविध उपक्रमांचे तपशील नव्याने लक्षात ठेवण्याची गरज आता उरलेली नाही.
 • तुम्हाला एकच करायचं आहे, आजच तुमचे गुगल पे अकाऊंट तयार करा आणि तुमच्याजवळ असलेले सर्व कार्डस् आणि उपक्रम या गुगल पे अकाऊंटसोबत जोडा. झालं तर मग! तुमचे सर्व कार्डस् तुमच्या पाकिटात आहेत. कुठेही घेऊन फिरा! ना कार्डस् घरी विसरण्याची चिंता, ना हरवण्याची, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी.
 • गुगल पे शी तुम्ही पुढील कार्डस् जोडू शकता-
 1.   क्रेडिट/डेबिट कार्ड.
 2.   निष्ठा कार्यक्रम(loyalty program)
 3.   भेट कार्ड(गिफ्ट व्हाउचर)
 4.   पेपैल खाते(PayPal card)
 5.   व्हिसा चेकआउट खाते

ही कार्डस् कशी जोडावीत?  

१. क्रेडिट/कार्ड –

 • नवीन गुगल पे दोन टॅबमध्ये विभागले आहेः ‘होम आणि कार्डस्.’
 • आपण होम टॅबवरुन कोणते क्रेडिट/डेबिट कार्ड ‘डीफॉल्ट’ म्हणून सेट केले आहे का? ते तपासा. असे डीफॉल्ट सेट असतील तर ‘कार्डस्’ विभागात आपले वैयक्तिक खाते आणि कार्डस् आधीपासूनच प्रदर्शित केले जातील.
 • जर नव्याने कार्ड जोडायचे असेल तर प्रथम कार्डस् विभागात जा. तेथेनिळ्या+फ्लोटिंग’ अॅक्शन बटणवर टॅप करा. त्यानंतर, ‘पॉप-अप’ विविध पर्याय प्रदर्शित करेल. ‘क्रेडिट/डेबिट कार्ड’ जोडण्याची निवड करा. यामध्ये आवश्यक असलेला कार्डसंबंधीचा सर्व तपशील भरावा लागेल. तुमची माहिती सत्य आहे का? यासाठी बँकेकडून तपासणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया महत्वाची आहे.

२. निष्ठा कार्यक्रम(loyalty program) –

 • आपल्या आवडत्या स्टोअर (जसे की, स्टारबक्स, रेलायन्स, बिगबझार) किंवा रेस्टॉरंटच्या बक्षीस/निष्ठा कार्यक्रमासाठी साइन अप केले असेल तर अनेक सवलत आणि बक्षिसे मिळविण्याची संधी असते.
 • यासाठी आपले सदस्यता कार्ड सतत सोबत बाळगणे किंवा आपली खाते माहिती लक्षात ठेवणे हे त्रासदायक असू शकते. गुगल पे ने ही समस्या सोडवली आहे.
 • अॅपच्या कार्ड विभागात जा आणि ‘निळ्या+फ्लोटिंग’ अॅक्शन बटणवर टॅप करा. एक ‘निष्ठा कार्यक्रम’ जोडा निवडा.
 • आपल्या आसपास असणाऱ्या स्टोअरची एक सूची दिसेल. ज्यापैकी आवडेल ते आपण निवडू/शोधू शकता. आपल्या खात्याचा नंबर टाइप करा आणि सेव करा. पुढच्यावेळी जेव्हा या दुकानांमध्ये जाल तेव्हा फक्त तुमचे गुगल पे चे हे जोडलेले खाते दाखवा.

३. भेट कार्ड (Gift Card)-

 • लॉयल्टी कार्डसप्रमाणेच, आवश्यकता असेल तेव्हा आपले भेट कार्ड सापडत नाही. अशा वेळी गुगल पे शी आपले भेट कार्ड जोडू शकता. हवं तेव्हा हवं तिथे आपला मोबाईल काढून आपले गिफ्ट कार्ड वटवू शकता.
 • भेट कार्ड जोडण्यासाठी, गुगल पे च्या कार्ड विभागात परत टॅप करा, ‘निळा+फ्लोटिंग’ अॅक्शन बटण निवडा आणि ‘भेट कार्ड जोडा’ निवडा. आपले ‘भेट कार्ड’ स्वीकारेल अशा दुकानाचा शोध घ्या. त्यानंतर, आपल्या कार्डचा क्रमांक आणि इतर माहिती प्रविष्ट करा.

४. पेपाल कार्ड (PayPal card) –

 • खरेदीसाठी क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना सुरक्षेचा प्रश्न उभा रहातो. उच्च स्तराची सुरक्षा पाहिजे असल्यास, पेपाल’ हा एक चांगला पर्याय आहे. तुमचे हे पेपाल खाते गुगल पे शी जोडू शकता.
 • आपल्याकडे आधीपासून ‘पेपाल खाते’ नसल्यास ‘पेपाल’ च्या वेबसाइटवर जाऊन नवीन खाते तयार करा.
 • आधीप्रमाणेच,  कार्डस्’ विभागात जा आणि ‘निळ्या+फ्लोटिंग’ अॅक्शन बटणावर टॅप करा. यावेळी मात्र, ‘अॅड आदर पेमेंट ऑप्शन’ मधून पेपाल पर्याय निवडावा. तेथून, वेब ब्राउझरमध्ये ‘पेपाल वेबसाईट’ उघडली जाईल. आपल्या खात्यात साइन इन करून गुगल पे शी जोडण्याची परवानगी दिली की तुमचे पेपाल कार्ड जोडले गेले आहे. आता सुरक्षित ऑनलाईन खरेदीचा आनंद घ्या.

५. व्हिसा चेकआउट खाते –

 • पेपाल प्रमाणेच सुरक्षित खरेदीचा एक पर्याय म्हणून ‘व्हिसा चेकआउट’ कडे तुम्ही बघू शकता.
 • हे खाते देखील गुगल पे शी जोडले जाऊ शकते. यासाठी पेपाल प्रमाणेच सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि व्हिसा चेकआउट सोबत निश्चिन्तपणे खरेदी करा.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2AgT3UF)

Leave a Reply

Your email address will not be published.