भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १

Reading Time: 3 minutes डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. 

गुगल पे मार्फत आर्थिक व्यवहार

Reading Time: 3 minutes ‘तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय’ हे तर कित्येकदा ऐकलं असेलच. पण या जागतिकीकरणाचा तुम्ही कधी फायदा करून घेतलाय का? नाही? मग आता करा.  विचार करा, तुम्ही कामा निमित्त एखाद्या नवीन शहरात आहात आणि तुमच्या कडील रोख पैसे ((कॅश)) संपले. काही वेळाने असं लक्षात आला की घाईमध्ये निघताना क्रेडीट, डेबिट कार्ड्स सुद्धा घरीच विसरले आहेत. ज्यांच्याकडून तत्काळ मदत मिळेल असं अनोळखी शहरात तुमचं कोणीही नाही. जेवण, प्रवास, निवास सगळ्या गरजा तुमच्या समोर ठाण मांडून बसल्या आहेत. अशा वेळी काय कराल? तुमचा मोबाइल डिव्हाइस वापरून आपल्या जवळपास असलेल्या किंवा भारतात कोठेही असलेल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला पैसे पाठविण्यासाठी विनंती करू शकता तसच तुम्ही बाहेर असताना तुमचे कुटुंबीय संकटात असतील अथवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती संकटात असेल तर अशा वेळी त्यांना पैसे पाठवूही शकता. कसं? ‘गुगल पे’ चा वापर करून! मोबाईल वर ‘गुगल पे’ डाउनलोड करा आणि आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना ‘गुगल पे’ वरून पैसे पाठवा अथवा पाठवण्याची विनंती करा. झालं तर मग देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही तुमच्या  प्रियजनांना पैसे पाठवू शकता अथवा त्यांना पैसे पाठविण्याची विनंती करू शकता. यालाच तर म्हणतात- “जग जवळ आलंय!”

तुमची कार्डस् गुगल पे सोबत जोडली आहेत का?

Reading Time: 2 minutes गुगल पे ने जाहीर केलेली नवनवीन वैशिष्ट्ये वापरात आणायची असतील तर त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक कार्डस् आणि व्हाउचर्स गुगल पे ला जोडण्याची सोय आता आपण वापरू शकता. वेगवेगळे कार्डस् त्यांचे वेगवेगळे पासवर्डस, तसेच नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विविध उपक्रमांचे तपशील नव्याने लक्षात ठेवण्याची गरज आता उरलेली नाही. तुम्हाला एकच करायचं आहे, आजच तुमचे गुगल पे अकाऊंट तयार करा आणि तुमच्याजवळ असलेले सर्व कार्डस् आणि उपक्रम या गुगल पे अकाऊंटसोबत जोडा. झालं तर मग! तुमचे सर्व कार्डस् तुमच्या पाकिटात आहेत. कुठेही घेऊन फिरा! ना कार्डस् घरी विसरण्याची चिंता, ना हरवण्याची, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी.

‘गुगल पे’ची ओळख – क्षणार्धात पैसे पाठवायचे सोयीस्कर अॅप

Reading Time: 2 minutes गुगल पे चा इतिहास : गुगल या कंपनीने साधारण एका वर्षा पूर्वी…