Reading Time: 3 minutes

मानवी विकासाच्या दृष्टीने ऊर्जा म्हणजेच काम करण्याची शक्ती महत्वाची आहे. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करता येत नाही फक्त एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येते. जी उर्जा रूपांतरित करताना पर्यावरण समस्या सहसा उद्भवत नाहीत, त्यांचे साठे शाश्वत असतात अशा ऊर्जेस हरितऊर्जा किंवा शाश्वतऊर्जा असे म्हणतात. जलसाठा, वेगाने वाहणारे वारे,  सूर्य, समुद्राच्या लाटा, जैविक इंधन इ हरित ऊर्जेचे स्रोत मानता येतील.

       

पेट्रोल डिझेल याचे अपुरे साठे आणि ते डॉलर्स देऊन आयात करावे लागत असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात हरित ऊर्जेस प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. 

सन 2070 पर्यंत भारत हा शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश असेल हे आपले ध्येय आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आपले जे सात प्राधान्यक्रम ठरवले आहेत त्यात हरित ऊर्जेस प्राधान्य पाचव्या स्थानावर आहे.

      

असं उच्च ध्येय मनाशी ठेवून आपण त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण सन 2022 मध्ये सौर ऊर्जेचे आणि ती साठवून ठेऊ शकणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले. सन 2030 पर्यंत 500 GW एवढी सौर ऊर्जा आपल्या वापरात असेल(1 GW म्हणजे 1000 दशलक्ष वॅट) असा संकल्प आपण गेल्या वर्षी केला तेव्हा 173 GW एवढी सौर ऊर्जा वापरात होती त्याच्या आपण याचा वापर तिप्पट करणार आहोत. सध्या 80 GW सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी चालू आहे. या वर्षीपासून दरवर्षी 30 ते 35 GW चे प्रकल्प अस्तीत्वात आले तर आपले उद्दिष्ट दोन वर्षे आधीच म्हणजे सन 2028 रोजी पूर्ण होऊ शकते.

        

या क्षेत्रातील गुंतवणुकीत सध्या मोठ्या प्रमाणत परकीय गुंतवणूक येत असून ही गुंतवणूक वीज निर्माण करणे आणि साठवून ठेवणे यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीच्या निर्मितीच्या गुंतवणुकीत आहे त्यामुळेच इतर क्षेत्रांच्या तुलनेत येथे भरीव वाढ होत आहे. देशांतर्गत आणि परदेशात जेथे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प होऊ घातले आहेत त्यातील अडथळे बाजूला करम्याचे काम चालू आहे.  सौर ऊर्जेखालोखाल पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रांस येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

        

हरितऊर्जा निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठा अडथळा म्हणजे प्रकल्प निर्मितीसाठी येणारा खर्च प्रचंड आहे त्यामानाने त्यातून निर्माण झालेली ऊर्जा स्पर्धात्मक दराने विकावी लागते त्यामुळे त्यातुन मिळणारे उत्पन्न एक गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करणाऱ्याच्या दृष्टीने कमी आकर्षक आहे अगदीं साधे उदाहरण द्यायचे झाल्यास 1 MW सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रकल्प स्थानानुसार 4 ते 5 कोटी रुपये गुंतवणूक करावी लागते  तर पवनऊर्जेसाठी हाच खर्च 7.5 ते 8.2 कोटी रुपये आहे. यातून निर्माण झालेली वीज बाजारात स्पर्धात्मक दराने विकावी लागते. वीज कशापासून निर्माण झाली हा प्रश्न विकताना येत नाही त्या दृष्टीने जलविद्युत निर्मितीतील गुंतवणूक खर्च खूप कमी आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा निर्मिती ते वितरण केंद्र आणि ग्राहक यांच्याकडे नेण्यासाठी होणारा खर्च आणि वहनातून होणारी घट हा मोठा प्रश्न आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सुयोग्य जागा लागत असल्याने आणि आता सर्वच ठिकाणी जागृती वाढल्याने जमीन अधिग्रहण करण्यात मोठे अडथळे निर्माण होऊन प्रकल्प खर्चात वाढ होते. आधीच हे प्रकल्प खूप खर्चिक असल्याने त्यातून फायदा मिळण्यास अधिक कालावधी लागतो.

          

यादृष्टीने सर्वच प्रकारातील हरित ऊर्जा अधीक किफायतशीर कशी करता येईल या दृष्टीने संशोधन चालू असून त्याचे परिणाम सकारात्मक आहेत त्याचप्रमाणे ही ऊर्जा पर्यावरण स्नेही असल्याने त्यास अधिकाधिक प्रोत्साहन देणे हे सरकारी धोरण आहे.

यासाठी-

★यातील गुंतवणूक ही पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक समजली जाते.

★यासाठी स्वतंत्र फायनास कंपन्याही आहेत. कर्ज देताना या कंपन्या स्वतःची भांडवली गुंतवणूक देखील करीत आहेत.

★प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या वस्तूंवर कमी दराने कर आकारणी होते.

★यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानात संशोधन होऊन सुधारणा होत आहे त्याचा लाभ कंपन्यांना घेता येतो

★प्रकल्पाची जमीन घेताना भरपाई कशी द्यायची याचे एकसमान सूत्र बनवण्यात आले आहे.

★असे प्रकल्प ही देशाची प्राथमिक गरज समजून त्यातील अडथळे प्राधान्याने दूर करण्याची व्यवस्था आहे.

★ऊर्जा विक्रीसाठी काही अटींवर रिव्हर्स बिडिंग प्रक्रिया राबवली जाते. यामुळे उत्पादकास अधिक दर मिळण्याची शक्यता असते.

      

या पार्श्वभूमीवर शेअरबाजारात हरिताऊर्जा क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या काही कंपन्या-

■झोडियाक एनर्जी:सौर ऊर्जा क्षेत्रातील आधाडीची परंतु मध्यम स्वरूपातील कंपमी असून गेली वीस वर्षे  ते टर्न की प्रकल्प उभारणी करून देतात गेल्या पाच वर्षात त्यांनी पंधरा टक्के सरासरी परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. सध्या कंपनीच्या दहा रुपये दर्शनी मूल्य असलेक्या शेअरचा बाजारभाव ₹ 125 च्या आसपास आहे.

■के पी एनर्जी: ही कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रांशी निगडित आहे 8.2 MW चे पणन ऊर्जा निर्माण करत असून असे प्रकल्प उभारून उभारणीचे काम ही कंपनी करते. गुजराथ राज्यात कार्यरत असून तिच्या पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचा बाजारभाव ₹350 च्या आसपास आहे.

■बोरोसिल रिन्यूएबल:सोलर पॅनल बनवणारी भारतातील जुनी कंपनी. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचा भाव ₹485 च्या आसपास आहे.

■वेबसोल एनर्जी सिस्टीम: सोलरसेल बनवणारी ही कंपनी असून दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचा भाव ₹ 90 च्या आसपास आहे

■एन टी पी सी: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती आणि वितरण क्षेत्रात असलेली कंपनी याशिवाय सल्ला व्यवसाय तेलवायू शोध कोळसा उत्खदन असे पूरक व्यवसाय कंपनी करते दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर्स सध्या ₹200 च्या आसपास उपलब्ध आहे.

■अडाणी ग्रीन एनर्जी: अडाणी गृपमधील चर्चेत असलेली कंपनी. आपल्या सहकंपन्यांना हरित ऊर्जा पुरवते. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर ₹1140 च्या आसपास आहे.

      

याशिवाय हरिताऊर्जा संबंधित कंपन्या आणि त्याचे 26 जुलै 2023 चे भाव

*Olectra Greentech Limited (₹1190)

*BF Utilities Ltd.(₹ 369)

*Inox Wind Energy (₹1528)

*Synergy Green Industries (₹216)

*Urja Global Ltd (₹10)

*Shigan Quantum Technologies (₹112) 

*Indowind Energy Ltd.(₹13)

*Energy Development Co (₹17)

*NHPC (₹49)

*Indian Energy Exchange (₹124)

*Suzlon (₹18)

*Adani Power (₹256)

*Waaree Renewable Technologies (₹1371)

*KKV Agro Powers (₹601)

*Taylormade Renewables (₹447)

*INOX Green Energy Service (₹69)

*Swelect Energy Systems (₹481)

*PTC India (₹113)

*Reliance Power (₹16)

*Adani Total Gas (₹664)

*INOX Leisure (₹509)

     

पूर्णपणे शैक्षणिक हेतूने लिहलेल्या या लेखात शेअरबाजारात नोंदणीकृत बहुतेक कंपन्या देण्याचा प्रयत्न केला असून यात गुंतवणूक करण्याची कोणतीही शिफारस नाही.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक     

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…