आता जीएसटी ची मॅच सुरु, खरेदीची मॅचींग करा !

Reading Time: 2 minutes

अर्जुन (काल्पनिक पात्र ) : कृष्णा, शासनाने  १८ मे पासुन जीएसटीआर – २ए पहाण्यासाठी चालू केलं आहे. हा काय प्रकार आहे ? करदाऱ्यांनी आता काय करायला हवे ?                               

कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन १ जूलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू झाला. आर्थिक वर्ष २०१७-१८ हे मार्च १८ मध्ये संपले. आता प्रत्येक करदात्याला त्यांच्या लेखापुस्तकांमध्ये खरेदी विक्री आणि जीएसटीच्या खात्यांची जुळवणी करावी लागेल आणि त्यानूसार रिटर्न्स दाखल करावे लागतील. जीएसटीआर – २ए मध्ये प्रत्येक करदात्याला त्याची बीलानूसार खरेदीची माहिती परावर्तीत हॊईल. प्रत्येक करदात्याला ह्या माहितीची पुस्तकाशी जुडवणी करावी लागेल. आता जीएसटी ची खरी मॅच सूरू होईल. कारण विक्री आणी खरेदी जुळाली तरच जीएसटीत आपण जिंकलो असे समजावे.      

अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर – २ए मध्ये कोणकोणत्या गोष्टी परावर्तीत होतात ?

कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर – २ए मध्ये  बी २ बी  इन्व्हॉईसेस , डेबीट नोट, क्रेडीट नोट, कंपोझिशन करदात्यांकडून खरेदी केलेल्याचे बील, टिडीएस, टिसीएस चे घेतलेले क्रेडीट आणि विक्रेत्याने ह्या बिलांमध्ये काही सुधारणा  केली असेल तर ते सूधारीत बील हे सर्व परावर्तीत होतात.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने  २ए आवर्जुन तपासणे का गरजेचे ?

कृष्ण : अर्जुना, काही दिवसांतच शासन जीएसटीआर – २ चालू करेल. जीएसटीआर २ मध्ये आपल्याला आपल्या हिशोबाच्या पुस्तकांप्रमाणेच क्रेडीट मिळेल. जर विक्रेत्याने  त्याच्या जीएसटीआर – १ मध्ये  करदात्याच्या  खरेदीची माहिती टाकली नसेल तर करदात्याला त्या बिलाचे क्रेडिट मिळणार नाही.  त्यामूळे जीएसटीआर २ मधील  माहिती तपासून इनपूट टॅक्स क्रेडीट जुळणी करून घ्यावी लागेल.

उदा   जुलै २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ‘अ’ ने ‘ब’ कडून बीला व्दारे १ लाखात माल खरेदी केला व  त्यावर ३बी मध्ये १२ हजाराचा जीएसटीचा क्रेडीट घेतला असेल तर, आता ती  खरेदी २ ए  व्दारे ‘अ’  ला तपासून घ्यावी  लागेल. त्यानंतरच ‘अ’ ला इनपूट टॅक्सचे  क्रेडीट  मिळेल.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने जीएसटीआर – २ ए पासून काय करावे ?

कृष्ण : अर्जुनाकरदात्याने जीएसटीआर – २ ए आणि लेखापुस्तकांमधील बीलवाईज खरेदीची जुळवणी करावी.  जर करदात्याकडून त्याच्या लेखापुस्तकांत काही एंट्रीज सुटल्या असतील तर त्या व्यवस्थीत करून घ्याव्यात.  तसेच जर करदात्याकडे खरेदीचे बील आहेत परंतु त्याच्या जीएसटीआर – २ ए मध्ये ते  परावर्तीत होत नसेल  तर करदात्याने विक्रेत्यासोबत संपर्क साधून बिलांची  जुळणी  करून घ्यावी.

अर्जुन :कृष्णा, जीएसटीआर – २ ए मूळे काय फरक पडेल ?

कृष्ण : अर्जुना, खरेदी विक्री करताना खूप भांडण होतात. डिस्कांउट, रेट डिफरंन्स, पैसे कमी जास्त येणे, पैसे बुडवणे हे विषय असेच राहतात. आता खरा जीएसटीचा मॅचींग मिसमॅचींगचा काल सूरू झाला आहे.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?

कृष्ण : अर्जुना, प्रत्येक व्यक्तीने सर्व खरेदी विक्री जूळवून घ्यावी. जर विक्रेत्याने जीएसटी शासनाला भरला नाही  किंवा योग्य रिटर्न दाखल केले नाही तर त्याचा भूर्दंड खरेदीदाराला पडणार आहे. खरेदीदार आणि विक्रेता यात आता खरे खोटे व्यवहार  जीएसटीत पकडले जातील. अर्थातच जीएसटीची मॅच आता सूरू झाली आहे व यात कुणा-कुणाची विकेट पडते. हे पाहावे लागेल.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *