Reading Time: 2 minutes

आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.  

  • सर्व कंपन्या आपापल्या पद्धतीने व्यवसाय करतात, नवनवीन फॉर्मुला तयार करतात, शोध लावतात. त्यासाठी खूप वेळ, पैसे लागतात. त्यासाठी औषध कंपन्या बराच खर्च करतात. हा सर्व खर्च अधिक मार्केटिंगचा खर्च व जाहिराती, अनेक लोकांचे म्हणजे डिस्ट्रिब्युटर, होलसेलर, रिटेलरचे कमिशन वाहतूक खर्च, रॉयल्टी व कंपनीचा प्रॉफिट असा सर्व व्यवहार बसवण्यासाठी मग कंपनीला अवाच्या सवा किंमत ‘एमआरपी’च्या (MRP) स्वरूपात आकारावी लागते. 

  • या एमआरपी कमाल विक्री किंमतमध्ये सर्व भारतभर वाहतूक खर्च समाविष्ट असतो. जर औषध मुंबईमध्ये बनत असेल, तर मुंबई मध्ये वाहतूक खर्च अगदीच नगण्य असेल. पण कन्याकुमारीमध्ये तो जास्त असेल. एमआरपीमध्ये कन्याकुमारीच्या वाहतुकीक खर्च समाविष्ट असतो व तो खर्च मुंबईसहित सर्व भारतभर द्यावा लागतो. याचाच  उलट अर्थ म्हणजे आपल्याला प्रत्येक औषध अथवा प्रत्येक वस्तू एमआरपीपेक्षा कमी दराने मिळालंच पाहिजे . 

  • अनेक वर्ष हे सर्व चालू झाल्यावर त्या औषधाच्या चल खर्चाची रक्कम (variable cost) कमी होत जाते. शोधाची रॉयल्टी संपते. औषध बनविण्याचा खर्च खूपच कमी होतो. अशी स्वस्तातली अनेक औषधे सर्वच आजारांवर व सर्वच औषध कंपन्यांची आज भारतात उपलब्ध आहेत आणि हे पहिल्यापासून चालू आहे. पण बहुतेक सर्वच डॉक्टर महागडी औषधे का लिहून देतात, हे न उलगडणारे पण विचार केला तर, समजू शकणारे कोडे आहे. आता तर, औषधांच्या जाहिरातीही दिसू लागल्या आहेत.  

एक उदाहरण पाहू –

मधुमेहावर अमायरील ३ mg हे औषध आहे. त्यात ग्लीमेपिरिड ३ mg हा रासायनिक घटक असतो. हे ग्लीमेपिरिडी नावाचे रसायन मधुमेहावर उपयुक्त आहे. या गोळी मध्ये ग्लीमेपिरिडी ३ mg असते. त्याच बरोबर चवीसाठी, रंगासाठी, जास्त वेळ टिकण्यासाठी व या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी (binder) असे इतर घटक असतात.  बाजारात ग्लीमेपिरिड ३ mg च्या असंख्य कंपनीच्या गोळ्या उपलब्ध आहेत .  

Product

Company

Price
(Rs.)

Glimiprex-3 Tab

Aristo Pharma

64.55 

Glador 3 mg Tablet 10s

Lupin

65.90 

Glyree-3mg Tab

Ipca Labs

90.59 

Betaglim 3 mg mg Tablet 10s

Panacea Biotec

92.55 

GP 3mg Tablet 10s

USV

104.00 

Azulix 3mg Tab 10s

Torrent Pharma

107.70 

Glimer 3 mg Tablet 10s

Abbott India

130.00 

Zoryl 3mg Tab

Intas

140.50 

Glimy 3mg Tablet 10s

Dr. Reddy

141.50 

Glimulin 3mg Tablet 15s

Glenmark

172.50

Rioglim 3mg Tab 30s

Ranbaxy

199.00 

Amaryl 3mg Tablet 30s

Sanofi Aventis

289.00 

बाजारात ही गोळी रु.६ पासून रु.११ पर्यंत उपलब्ध आहे. तरी बहुतेक डॉक्टर्स महागाचीच गोळी का लिहून देतात? जनरिक औषधांमध्ये ही गोळी ०.४० रुपयांना (४ रुपयांना १० गोळ्या) अशा किमतीत उपलब्ध आहे .  

ही जेनेरिक औषधालय बहुतेक सगळीकडे उघडलेली आहेत 

तात्पर्य:- आपण औषध कंपन्या व डॉक्टर्सचा स्वभाव बदलू शकत नाही. पण विचार करून त्याच रासायनिक घटकाची स्वस्त गोळी नक्कीच घेऊ शकतो .

– महेश मुळे

९९२२४००९८०

(लेखक तंत्र , उत्पादन , जाहिरात , विपणन व व्यवस्थापन क्षेत्रात ३४ वर्षांपासून कार्यरत असून व्यवस्थापन कौशल्यामधे निष्णात व निपुण प्रोफेसर आहेत.)

र्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

Reading Time: 2 minutes सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही.