Hidden Charges in Real estate
Reading Time: 3 minutes

Hidden Charges in Real estate

पहिलं घर घेत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती नसते (Hidden Charges in Real estate). बिल्डरने दिलेल्या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, आपण निर्णय घेताना डोक्यापेक्षा जास्त मनाने घेत असतो. आपल्यासमोर आलेल्या मालमत्ता कागदपत्रांवर बारीक अक्षरात इतक्या सूचना लिहिलेल्या असतात की, बहुतांश लोक न वाचताच आपल्या ५०-६० सह्या देऊन मोकळे झालेले असतात. बिल्डरने आपला नफा वाढवण्यासाठी या कागदपत्रात काही ‘छुपे चार्जेस’ आपल्या माथी मारलेले असतात. हे नंतर समोर येणारे वाढीव खर्च कोणते, याबद्दल  जाणून घेऊयात. 

घर खरेदी करताना आकारले जाणारे ८ छुपे खर्च  (Hidden Charges in Real estate) –

१. जीएसटी: 

  • साधारणपणे जीएसटी म्हटलं की आपल्याला १८% हेच माहिती आहे. पण, बांधकाम क्षेत्रात जीएसटी इतका लागू पडत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. 
  • बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर भारत सरकार केवळ ५% जीएसटी आकारत असते. म्हाडा सारख्या काही मालमत्ता या १% जीएसटी आकारून सुद्धा आपली मालमत्ता विकत असतात. 
  • जी सोसायटी बांधून झालेली असते व ज्यांच्याकडे ‘पूर्णत्वाचं प्रमाणपत्र’ असतं त्यांना जीएसटी भरण्याची कोणतीही आवश्यकता नसते. 
  • या सर्व बाबींची शहानिशा करूनच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस प्रमाणे जीएसटी भरून मगच घर खरेदी करावी. 

२. पार्किंग रक्कम: 

  • तुम्ही विकत घेतलेल्या घराच्या किमतीत सोसायटीने आकारलेल्या पार्किंगच्या रकमेचा समावेश आहे का, याची नक्की खात्री करून घ्या. 
  • पार्किंगची रक्कम ही तुमच्या घराच्या आकारावरून सुद्धा ठरत असते. तुम्ही घर विकत घेणाऱ्या सोसायटीत सर्वांना समान पार्किंगची रक्कम लागू पडू शकत नाही. 
  • घर विकत घेण्याच्या तुमच्या बजेटमध्ये पार्किंगची रक्कम सुद्धा लक्षात घ्या आणि योग्य तीच रक्कम बिल्डरला द्या. 

३. देखभाल अनामत रक्कम: 

  • तुम्ही घर घेत असलेल्या सोसायटी किंवा बिल्डिंगची देखभाल करण्यासाठी बिल्डर हे तुमच्याकडून २ ते १० वर्षांची देखभाल रक्कम ‘अनामत’ म्हणून घेत असतात. 
  • ही रक्कम किती घेतली आहे, याची नोंद प्रत्येक ग्राहकाने करणं नेहमीच चांगलं असतं. घराचा ताबा मिळाल्यानंतर तुमच्यासमोर येणारी घराची देखभाल रक्कम ही तुम्ही या अनामत रकमेतून वजा करून आपले पैसे वाचवू शकतात. 

४. मोक्याच्या जागेची रक्कम : 

  • तुम्ही विकत घेणारं घर जर इमारतीच्या सर्वात उंच मजल्यावर असेल किंवा बागेच्या किंवा समुद्राच्या दिशेने असेल तर घराची रक्कम ही जास्त असू शकते. 
  • त्याच इमारतीतील इतर घरांची आणि या घराच्या किमतीतील तफावत तपासून मगच आपला निर्णय घ्या. 

५. नोंदणी शुल्क : 

  • भारतात कुठेही घर विकत घेताना नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी रक्कम भरणं हे बंधनकारक आहे. 
  • फरक एकच आहे की, राज्यनिहाय ही रक्कम बदलत असते. तुम्ही ज्या राज्यात घर विकत घेत आहात ते राज्य सध्या घराच्या किमतीच्या किती टक्के नोंदणी शुल्क आकारत आहे, हे तपासूनच आपल्याला सांगितलेली रक्कम बिल्डरला द्या. 
  • सर्वसाधारणपणे ही रक्कम घराच्या मूळ किमतीच्या ५% ते ७% इतकी असते.

६. मध्यस्थ व्यक्तीचे पैसे: 

  • तुम्हाला घर शोधून देणारी मध्यस्थ व्यक्ती ही तुमच्याकडून साधारणपणे घराच्या मूळ किमतीच्या २% रक्कम घेत असते. 
  • जर तुम्ही घराच्या प्रथम  मालकाकडून घर विकत घेत असाल तर मध्यस्थ व्यक्तीची ही रक्कम दोघांमध्ये विभागून द्यायची असते हे लक्षात ठेवा. 
  • ‘मध्यस्थ’ व्यक्तीला दिलेल्या पैशांचा तुम्हाला व्यवहार सुरळीत होऊन योग्य मोबदला मिळत आहे हे सुद्धा तपासून घ्या. 
  • सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कित्येक वेबसईटमुळे घर विकत घेणं हे ‘विना मध्यस्थ’ सुद्धा सहज शक्य होऊ शकतं. 

हे नक्की वाचा: Investment Mistakes: गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका 

७. ‘सजावट (इंटेरियर ) खर्च’: 

  • तुम्ही विकत घेण्याचं ठरवलेल्या घराची मूळ किंमत ही सजावट खर्चामुळे कित्येक पटीने वाढू शकतं. 
  • तुमची मालमत्ता ही व्यवस्थित न ठेवल्याने तुम्हाला कदाचित कमी किमतीत मिळेलही. पण, त्या मालमत्तेवर करावा लागणारा सजावट खर्च सुद्धा लक्षात घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या.
  • फर्निचर केलेलं घर हे इतर घरांच्या किमतीपेक्षा जास्त किमतीचं असेल, हे लक्षात ठेवून मग घराचं बजेट तयार करावं. 

८. मालमत्ता तपासणी खर्च: 

  • तुम्ही विकत घेणार असलेल्या घरावर कर्ज दिलं जाऊ शकतं की नाही, हे तपासण्यासाठी बँक कर्मचारी हे मालमत्तेला भेट देत असतात.
  • तुम्हाला दिलेल्या गृहकर्जाची रक्कम बिल्डरला देईपर्यंत झालेला प्रत्येक खर्च बँक तुमच्या गृहकर्जातून वसूल करत असते. 
  • घर घेण्याचा विचार करत असाल तर हा खर्च सुद्धा तुमच्या बजेटचा भाग असू द्या, म्हणजे तुमचं आर्थिक नियोजन योग्य होईल. 

महत्वाचा लेख: घर विकत घ्यावे की भाड्याने राहावे? 

घर विकत घेताना वरील ८ मुद्द्यांचा योग्य अभ्यास करा आणि मग आर्थिक व्यवहार करा. नवीन घरात रहायला गेल्यावर कोणताही अचानक खर्चाला सामोरं जावं लागू नये त्यासाठी या बाबींचा विचार आधी केला पाहिजे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Hidden Charges in Real estate in Marathi, Real estate Hidden Charges in Marathi, Real estate Hidden Charges Marathi, Hidden Charges in Real estate Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.