Reading Time: 3 minutes
  • वृद्धापकाळातील चिंतेपासून दूर राहण्यासाठी आर्थिक निवृत्ती नियोजन हे फार महत्त्वाचे आहे. (Retirement Planning) तुम्ही रोज काही पैशांची बचत करून योग्य गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीत, तर एक दिवशी तुम्ही नक्कीच निवृत्ती नियोजनातून चिंतामुक्त व्हाल ! (Investment) 
  • निवृत्ती नियोजनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन, जे आपले भविष्य अधिक सोयीस्कर बनवण्यास उपयुक्त ठरते. 
  • आता दरमहा 50K म्हणजे रु. ५०,००० पेन्शन कसे मिळवायचे व यासाठी आपले पैसे कुठे गुंतवायला हवेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.  
  • तुमचे वय ३० वर्षे असल्यास, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठा कालावधी असतो व त्यामुळे अधिक परतावा  मिळविण्यासाठी लहान गुंतवणूक तुम्ही सुरु करू शकता. 
  • जर तुम्ही काही वर्षांत निवृत्त होत असाल व त्यासाठीचे आर्थिक निवृत्ती नियोजन आखत असाल, तर तुम्हाला अधिक परतावा मिळवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवावी लागेल.
  • मासिक उत्पन्न निश्चित करण्यात इक्विटी मार्केटमधील गुंतवणूक पर्याय हे अधिक परतावा देतात.

 प्रति महिना ५० हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय –

 

  • नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही भारत सरकारने सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. 
  • ही योजना सदस्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठीची बचत करण्यास उपयोगी ठरते. 
  • यामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांकडील निधी एकत्रित केला जातो व मनी मार्केट, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर, बिले व शेअर्स अशा पर्यायांमध्ये पुन्हा गुंतवले जातात. यांमुळे गुंतवणूकदारांना बाजारातून अतिरिक्त परतावा सुनिश्चित होते.
  • एकदा गुंतवणुकदाराने निवृत्तीचे वय गाठले की, जमा झालेल्या कॉर्पसची काही टक्के रक्कम ही एकरकमी म्हणून काढली जाऊ शकते व उर्वरित रक्कम ही जीवन विमा कंपनीकडून जीवन वार्षिकी खरेदी करण्यासाठी गुंतवता येते.

युनिट-लिंक्ड विमा योजना –

  • युनिट-लिंक्ड विमा योजना या विविध म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सच्या आधारे गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देतात.
  • यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी संपला की तुमच्यासाठी उत्पन्नाचा स्रोत देणारे खास रिटायरमेंट ULIPs पर्याय असतात. 
  • याव्यतिरिक्त योजनेसाठी भरलेल्या प्रीमियमचा एक भाग लाइफ कव्हरसाठी वापरला जातो. उरलेली रक्कम अधिक परतावा मिळविण्यासाठी इक्विटी आणि डेट फंडामध्ये एकत्रितपणे गुंतवली जाते.
  • तसेच यामध्ये गुंतवणूकदार असमाधानी असल्यास त्यांना फंडांमध्ये स्विच करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

महत्वाचा लेख – Life Insurance : जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

 

हमी परताव्यासह पेन्शन योजना –

  • हमी परताव्यासह पेन्शन योजना या नियमित पेन्शन योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांना विमा संरक्षण देखील देतात. 
  • पेन्शन योजना तुमच्या सेवानिवृत्तीच्या वयानंतर दर महिन्याला हमी पेआउट देतात. शिवाय, या योजना तुमचा जोडीदार किंवा मुलांची भविष्यात काळजी घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत.
  • या योजना निवृत्तीनंतर २५ ते ३० वर्षांसाठी मासिक पेन्शनसह परिपक्वतेवर एकरकमी पेआउट देतात.
  • १००% गॅरंटीड रिटर्न सोल्यूशन वापरून दरमहा 50k पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्हाला पुढील १० वर्षांसाठी समतुल्य रक्कम गुंतवावी लागते.

म्युच्युअल फंड

 

  • कोणतीही व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची गुंतवणूक सुरू ठेऊ शकता किंवा ती थांबवूही शकता.  
  • एकदा गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीद्वारे वर्षानुवर्षे पुरेशी संपत्ती जमा केली की, ते अँन्यूटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही भाग वापरू शकतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांना जीवन विमा संरक्षणासह आजीवन उत्पन्नाची हमी मिळते. 
  • यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किंवा त्याविषयीचे ज्ञान असण्याचीही काही गरज नाही. हे काम म्युच्यअल फ़ंड कंपनीचे एक्सपर्ट मॅनेजर्स करतात.  

 

नक्की वाचा – Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे नक्की वाचा

 

वार्षिकी योजना (Annuity Scheme) –

  • अँन्यूटी म्हणजेच वार्षिकी योजनेमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित गुंतवणूकदारांना नियतकालिक पेआउट दिले जातात. 
  • सेवानिवृत्त व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उत्पन्न म्हणून वार्षिकी मासिक भरले जाते. 
  • या योजनांसाठी गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक एकरकमी भरावी लागते, त्यानंतर अँन्यूटी सुरू होतात.
  • साधारण दोन प्रकारचे वार्षिकी असतात – तात्काळ वार्षिकी व स्थगित वार्षिकी (डिफर्ड अँन्यूटी). 
  • तत्काळ अँन्यूटी योजना – गुंतवणुकीचा कालावधी संपताच मासिक पेमेंट ऑफर करतात. 
  • डिफर्ड अँन्यूटी योजना – गुंतवणुकीच्या समाप्तीनंतर वेस्टिंग कालावधीनंतर पेआउट्स होतात.
  • समजा, तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसाठी रु.१२,००० रुपयांची गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्या गुंतवणुकीची एकूण रक्कम रु.२८.८ लाख इतकी होऊ शकते. 
  • आता १२% अपेक्षित परतावा दर गृहीत धरल्यास, २० वर्षांच्या शेवटी तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य रु.१.२ कोटी इतके असेल. या कमाईचा काही भाग या पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवून रु.५०,००० प्रति महिना उत्पन्न मिळवू शकता. 

हेही वाचा – Common Tax Saving Mistakes : कर बचत करताना टाळा ‘या’ 8 चुका 

वाढती महागाई व एकूणच बदलत चाललेली जीवन पद्धती पाहता निवृत्ती नियोजनाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते आहे. शेतकरी ज्याप्रमाणे सुगीच्या काळातच तरतूद करून ठेवतो, त्याप्रमाणे आपण तरुण असतानाच दीर्घ कालावधीच्या वृद्धत्त्वासाठी सन्मानाने व टेन्शनफ्री जगता यावे यासाठी वेळीच आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते. 

त्यामुळे लगेचच तुमचे आर्थिक निवृत्ती नियोजन करण्यास सुरुवात करा. तुमच्या पुढील वाटचालीस अर्थसाक्षर टीमतर्फे खूप शुभेच्छा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…