Investment Portfolio
गुंतवणूक करताना पारंपरिक आणि आधुनिक पर्यायांचे मिश्रण करून आपल्या गरजेनुसार योजना निवडणे (Investment Portfolio) आवश्यक आहे. आपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत. खरंतर शेअर बाजारात असलेली जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करून महागाईवर मात करणारा परतावा मिळवणे अगदी सोपे असून यासाठी थोडा अभ्यास, चिकाटी आणि शिस्त याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या सक्षम असणेही आवश्यक आहे. आपण जेथे आपली बचत आणि गुंतवणूक करतो त्या बँका, बिगर बँकिंग कंपन्या, म्युच्युअल फंड, विमाकंपन्या त्यांची सर्वाधिक गुंतवणूक शेअरबाजारात करीत असतात ही गुंतवणूक त्यांच्या वृद्धी आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग असते. नव्या आर्थिक वर्षात थेट समभाग सोडून अन्य कोणत्या प्रकारांत बचत गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास त्यासाठी उपलब्ध विविध संधीचा विचार करूयात. गुंतवणूक हा शब्द व्यापक असल्याने इथे फक्त तो आर्थिक संदर्भात वापरलेला आहे.
हे नक्की वाचा: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनाच्या ५ स्टेप्स
Investment: आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी योजना:
- अचानक तुमची नोकरी सुटली तर? तुम्ही हुशार आहात दुसरी नोकरी नक्की मिळवू शकाल, परंतू मधल्या काळासाठी आपल्या अत्यावश्यक गरजा भागावण्याऐवढी तरतूद आपल्याकडे असायला हवी.
- साधारणपणे 6 महिन्याच्या किमान मासिक खर्चाऐवढी तरतूद ही गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात असावी. त्यावर सेव्हिंगहून अधिक परतावा मिळेल.
- ही गुंतवणूक कधीही काढता येते या दृष्टीने त्याचा विचार करावा परतावा किती मिळेल ही दुय्यम गोष्ट आहे.
- माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत घडलेली ही घटना, तो गेले 15 वर्ष पर्यटन व्यवसायातील चांगल्या कंपनीत नोकरीला होता. दुसरीकडे अधिक पगाराची नोकरी मिळणार हे पक्के झाल्यावर त्याने नोकरीचा राजीनामा दिला त्यानंतर लगेचच कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने त्याच्या दुसऱ्या नोकरीत रुजू होण्याची तारीख पुढे गेली. त्यामुळेच पुढील काही महिने त्याला बेकारीत काढावी लागली.
- तो पूर्वीच्या कंपनीत असता, तर एवढ्या वर्षाच्या सेवेचा विचार करून त्याला कामावरून निश्चित कमी केले नसते.
- कुणालाही अपेक्षित नसलेले करोना संकट आले आणि गेले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने अनिश्चितता अजून कायम आहे. जरी हे संकट टळले तरी भविष्यात कोणते याहून भयंकर संकट उभे राहील त्याचा भरवसा नाही.
अल्पकालीन खर्चासाठी तरतूद:
- येणाऱ्या 1 ते 3 वर्षाच्या कालावधीत करावे लागणारे निश्चित असे जास्तीचे खर्च, जसे शाळेची फी, वह्या पुस्तके, कोचिंग क्लासची फी असे खर्च एका निश्चित काळात करावे लागत असल्याने नियमित पगारात अधिकचे खर्च भागवताना ओढाताण होते.
- यासाठी आवश्यक रक्कम म्युच्युअल फंडाच्या शॉर्ट टर्म फंडात गुंतवावी. यावर बँकेतील मुदतठेव योजनेहून अधिक परतावा मिळू शकतो.
- धोक्याची विभागणी करण्यासाठी अशी गुंतवणूक असणे गरजेचे आहे.
विशेष लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे
टॅक्स सेव्हिंग फंडातील गुंतवणूक:
- करबचत करणाऱ्या ज्या योजना आहेत त्यातील सर्वात कमी मुदतीची योजना म्हणजे इ एल एस एस फंड यातील 90% गुंतवणूक ही समाभागात केली जाते. यात निश्चित परताव्याची हमी नसली तरी मुदत कालावधी 3 वर्षांचा आहे.
- सर्वसाधारण यातून 15% च्या आसपास परतावा मिळू शकतो अशी गुंतवणूक करत राहिल्यास अडीअडचणीस आपल्याला पैसे सहज उपलब्ध होण्याची शक्यता राहते. कारण ही गुंतवणूक तीन वर्षांनी काढून न घेण्याचे बंधन नसल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होऊ शकते शकते.
- ज्या करदात्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे त्याच्यासाठी लाभांश घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
मूल्यवृद्धी देणाऱ्या योजना:
- म्युच्युअल फंडाच्या अशा योजना ज्या आपल्या दीर्घकालीन गरजांची पूर्तता करतील. अशी गुंतवणूक निश्चित ध्येय ठेवून करावी.
- ही गुंतवणूक बाजाराच्या चढ उतारांवर अवलंबून असल्याने आपल्या गरजेपुर्वी यातील गुंतवणूक टप्याटप्याने काढून ज्यातून निश्चित परतावा मिळतो अशा योजनेत गुंतवावी म्हणजे आपल्याला जेव्हा खरीखुरी गरज असेल तेव्हा बाजार कोणत्याही स्थितीत असला तरी आपल्याला गरजेएवढे पैसे उभे करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
सोने एक गुंतवणूक पर्याय:
- सोन्याने दीर्घकाळात महागाईवर मात करणारा परतावा दिला असल्याने आपल्या गुंतवणुकीत त्याचा सामावेश असला पाहिजे.
- जगभरात मध्यवर्ती बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोनेच खरेदी करीत असतात.
- आता बहुतेक देशांचे चलन हे सुवर्णाधारीत नाही. याचे फायदे तोटे हा वादग्रस्त विषय असला तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मितीस चालना मिळाली हे कोणी नाकारू शकत नाही.
- ज्याप्रमाणे आपण केलेल्या सुधारणांमध्ये सुधारणा करून पुन्हा जुन्या गोष्टी स्वीकारल्या त्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीत कदाचित सुवर्णाधारीत अर्थव्यवस्था अस्तित्वात येऊ शकते. तेव्हा गुंतवणुकीतील काही भाग तेथेही असावा.
- सार्वभौम सुवर्ण रोखे घेणे हा सुवर्ण गुंतवणुकीचा अधिक चांगला पर्याय आहे.
महत्वाचा लेख: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक
सार्वजनिक भविष्यनिधी योजना:
- अतिशय लवचिक अटी शर्ती असलेली सार्वजनिक भविष्य निधी योजना हा लोकप्रिय पर्याय असून यावर मिळणारा परतावा मुदत ठेवींहून अधिक असून तो करमुक्त आहे.
- आज यातून 7.1% परतावा मिळतो त्याचा दर तीन महिन्यांनी त्याचा पुनर्विचार करून आवश्यक असल्यास ते कमी अधिक केले जातात.
मुदतीचा विमा:
- अपवादात्मक परिस्थितीत आपल्या कुटुंबास आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी, आपण गुंतवणूक केलेले पैसे फुकट जावेत याच हेतूनेच ही गुंतवणूक केली जावी.
- यात विविध प्रकार असून त्यात भरलेला सर्व प्रीमियम परत मिळणे, 100 वर्ष संरक्षण मिळणे असे विविध प्रकार आहेत ते आकर्षक वाटत असले तरी घेऊ नयेत कारण या कोणत्याही सवलती आपण काहीतरी अधिकची किंमत मोजल्याशिवाय मिळणार नाही.
- गंभीर आजार, अपघात यासाठी थोडी जास्त रक्कम मोजून संरक्षण घ्यावे. विमा संरक्षण रक्कम, कालावधी याच्या अटी आपल्या गरजेप्रमाणे ठरवाव्यात.
- कमी खर्चातील आणि बहुतेकांना परवडेल अशी एकसमान अटी असलेली जीवन सरल योजना सर्व कंपन्यांकडे उपलब्ध आहे.
आरोग्यविमा:
- आरोग्य विषयक गंभीर समस्या उद्भवली तर आपली सर्व जमापुंजी क्षणार्धात नाहीशी होऊन आपण कर्जबाजारी देखील होऊ शकतो त्यामुळेच आपल्याला कुटुंबाचा पुरेसा आरोग्यविमा घेतला पाहिजे.
- यासाठी अनेक पर्यायासोबत सर्वत्र समान अटी शर्ती असलेली आरोग्य संजीवनी योजना सर्वाना उपलब्ध आहे.
अधिक व्याजदाराच्या कर्जाची परतफेड:
- क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज यावरील व्याजदर जास्त असल्याने त्याची परतफेड लवकर करून त्यावर द्यावे लागणारे अधिकचे व्याज वाचवणे ही एक प्रकारची अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे.
- कोणतेही कर्ज फेडणे आर्थिक स्थेर्याच्या दृष्टीने चांगली चांगले असले तरी अत्यंत कमी व्याजदराने मिळणारे गृहकर्ज लवकर फेडण्याची घाई अजिबात करू नये.
- यासाठी उपलब्ध रक्कम कर्ज न फेडता सुयोग्य योजनेत केली तर काही कालावधीत कर्ज एकरकमी फेडून काही रक्कम शिल्लख राहण्याऐवढी भांडवल निर्मिती होऊ शकते.
निवृत्ती योजना:
- आपल्या निवृत्तीनंतर नियमित आणि पुरेसे उत्पन्न मिळावे यादृष्टीने लवकरात लवकर नियोजन करणे केव्हाही चांगले दरमहा बाजूला ठेवलेले ₹ 500/- ने सुद्धा दीर्घकाळात मोठी भांडवल निर्मिती होऊ शकते.
आपली बचत /गुंतवणूक, गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून त्यातील जोखीम समजून घेऊन, वरील साधनात योग्य प्रमाणात विभागून करावी आणि चतुर गुंतवणूकदार व्हावे.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Investment Portfolio Marathi, Investment Portfolio in Marathi, Investment Portfolio Marathi Mahiti