टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची ५ कारणे

http://bit.ly/2nbLLh0
3,120

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात.

टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

१. कमीत कमी लॉक-इन कालावधी

 • पारंपरिक टॅक्स-सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट्सचे लॉक-इन कालावधी सामान्यतः मोठे असतात. पीपीएफ मध्ये १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, तर एम्प्लॉयी प्रोव्हिडंट फंड (ईपीएफ) आणि एनपीएस यामध्ये निवृत्त होईपर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागते. त्याचप्रमाणे टॅक्स-सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटचा लॉक-इन कालावधी देखील किमान ५ वर्षांचा असतो.
 • गुंतवणुकीच्या या सर्व पारंपरिक पर्यायांचा विचार केला असता ईएलएसएसचा लॉक-इन कालावधी ३ वर्षे हा सर्वात कमी आहे. त्यात तुम्ही गुंतवणूक करणे चालू ठेवू शकता किंवा लॉक-इन कालावधीनंतर तुमची गुंतवलेली रक्कम रिडीम करू शकता.

एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

२. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)

 • सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) हा म्युच्युअल फंड्समध्ये नियमित अंतराने एक ठराविक रक्कम गुंतवण्याचा एक शिस्तबद्ध प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे वापरण्यासाठी एकरकमी रक्कम उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी हा सर्वाधिक व्यवहार्य असा पर्याय आहे. 
 • एसआयपी मध्ये तुम्ही दरमहा एक छोटी रक्कम गुंतवू शकता आणि एकरकमी गुंतवणुकी इतकीच कर कपात ८०सी कलमांतर्गत मिळवू शकता.
 • त्याशिवाय एसआयपी रूपयाच्या किंमतीची सरासरी करण्याचा लाभ देतात. याचा अर्थ, बाजारातील चढ-उतारांवर नियंत्रण ठेवणे तुमच्या हाती असते.

गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर

३. फुगवट्यावर मात करणारा परतावा

 • ठराविक रकमेच्या कर कपात गुंतवणुकीच्या विपरीत ईएलएसएस फंड्स प्राथमिकतेने इक्विटी आणि इक्विटी-उन्मुख इन्स्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच, इक्विटी ही एकमेव ॲसेट श्रेणी आहे ज्यात विद्यमान महागाई दरापेक्षा तुलनेत उच्च परतावा मिळतो. 
 • त्यामुळे दीर्घ काळासाठी ईएलएसएसमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावे मिळतील तसेच ८०सी अंतर्गत करलाभ देखील मिळतील.

ELSS की ULIP?

४. मॅच्युरिटी तारीख नाही

 • ईएलएसएस फंड्समध्ये गुंतवणूक करण्यातील फायद्यांमधील एक लक्षणीय फायदा हा की त्यांना मॅच्युरिटी तारीख नसते. लॉक-इन कालावधी उलटून गेल्यानंतर देखील तुम्ही वाटल्यास त्यातील गुंतवणूक चालू ठेवू शकता. 
 • ईएलएसएस फंड्समध्ये दीर्घ काळ गुंतवणूक ठेवल्याने तुमच्या गुंतवणुकीवर कंपाउंडिंग होत राहते. या योजनेत तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक ठेवाल, तितका अधिक परतावा तुम्हाला मिळेल. जर लॉक-इन कालावधीनंतर तुम्हाला ही गुंतवणूक चालू ठेवायची नसेल, तर तुम्ही ती बंद करू शकता.

५. पोर्टफोलियोतील वैविध्य

 • टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक तुम्हाला आवश्यकतेनुसार तुमच्या पोर्टफोलियोच्या वैविध्याचे लाभ देते. 
 • टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) प्रामुख्याने इक्विटी मार्केटशी संलग्न असल्याने हे फंड विविध क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. 
 • तुम्हाला एकापेक्षा जास्त ईएलएसएस फंडमध्ये आपले पैसे गुंतवायचा पर्याय देखील आहे. शिवाय चांगली कामगिरी करत नसलेल्या फंडमधील गुंतवणूक केव्हाही बंद करून इतर फंडकडे वळवण्याची सोय देखील आहे.

करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय

या लाभांखेरीज, आपल्या इतर समधर्मींच्या तुलनेत ईएलएसएस सर्वात चांगले पोस्ट-टॅक्स रिटर्न देतात. ईएलएसएस मध्ये १ लाखाच्या वरील लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर १०% कर लागतो. तरीही एनएससी, एफडी, पीपीएफसारख्या इतर पारंपरिक टॅक्स-सेव्हिंग प्रकारांशी तुलना केली असता दीर्घावधीत ईएलएसएस हा अधिक चांगला पर्याय आहे. 

टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्सचे अनेक लाभ आहेत पण गुंतवणूकदराने गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचे आर्थिक लक्ष्य, काळाचा पट आणि जोखमीची पातळी यांचा विचार केला पाहिजे.

– श्री. अर्चित गुप्ता, 

संस्थापक आणि सीईओ, क्लियरटॅक्स

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.