Reading Time: 2 minutes

faशेअर बाजारात गुंतवणुकीस सुरुवात केल्यानंतर कोणत्या स्टॉक मध्ये किती गुंतवणूक करावी ते कळत नाही. गुंतवणूक करत असताना बहुतेकांनी विशिष्ट ध्येय गृहीत धरलेले असते. (Shares Investment in Marathi)

उदाहरणार्थ : तुम्हाला गुंतवणूक म्हणून सेवानिवृत्तीसाठी निधी जमा करून ठेवायचा असेल तर  दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय निवडता किंवा तुम्हाला कार, बाईक किंवा घर घ्यायचे असेल तर अल्प काळासाठीच्या गुंतवणूकीचा प्लॅन निवडता. 

ध्येयाधारित गुंतवणूक करताना गुंतवणूकदार त्यांच्या योग्य ध्येयाशी सुसंगत असणारे स्टॉक निवडतात. त्या गुंतवणुकीतून अल्प किंवा दीर्घ कालीन उद्दिष्टये पूर्ण करता येतात. यामध्ये ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्यू स्टॉक हे सर्वात मोठी भूमिका बजावत असतात. व्हॅल्यू स्टॉक आणि ग्रोथ स्टॉकच्या संदर्भात अधिक माहिती समजून घेऊयात. (Share Market Study in Marathi)

व्हॅल्यू स्टॉक (Value Stocks)

  • व्हॅल्यू स्टॉकमध्ये त्वरित मूल्यवृध्दीची शक्यता नसते. हे स्टॉक विशिष्ट कालावधीनंतर  योग्य परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीची हमी देतात. 
  • आपण व्हॅल्यू स्टॉक उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात. समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक २५० रुपयांवर ट्रेडिंग करत असेल तर बाजार विश्लेषकांना वाटू शकते की या स्टॉकचे  वाजवी मूल्य यापेक्षा भरपूर जास्त आहे तेव्हाच ते यामध्ये गुंतवणूक करतात. 

ग्रोथ स्टॉक (Growth Stocks)

  • ग्रोथ स्टॉक गुंतवणूकदारांना उच्च नफ्याची हमी देतात कारण त्यांच्या स्टॉकची किंमत पटकन वाढत असते. ग्रोथ स्टॉक मधील कंपन्या नियमित लाभ मिळवून देत नाहीत कारण नफ्याची रक्कम व्यवसायात गुंतवण्यास ते प्राधान्य देतात.
  • लाभांश न वाटता नफ्याचे पैसे कंपनीचा विस्तार करणे हेच त्यांचे ध्येय असते. 

नक्की वाचा : गुंतवणुकीचे हे ६ सुरक्षित मार्ग नक्की लक्षात ठेवा !

ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्यू स्टॉक मधील फरक समजून घेऊयात –

  • किंमत –
  • ग्रोथ स्टॉकची किंमत वेगाने वाढते. या स्टॉकमध्ये केलेल्या गुंतवणुकीला ग्रोथ इन्वेस्टींग म्हणतात. 
  • व्हॅल्यू स्टॉकमधील बाजारभाव हळू हळू वाढतात पण लाभांश वेळेवर आणि नियमितपणे दिला जातो. शेअर बाजारामध्ये ग्रोथ स्टॉकपेक्षा व्हॅल्यू स्टॉक स्वस्त असतात. 

२.  गुंतवणुकीचे गुणोत्तर – 

  • व्हॅल्यू स्टॉकमधील किंमत कमी असलेल्या समभागांचे मूल्यांकनामधील किंमत उत्पन्न गुणोत्तर (PE Ratio)  कमी असते. 
  • ग्रोथ स्टॉक मध्ये किंमत उत्पन्न गुणोत्तर जास्त असते. 

३. मूल्यमापन मेट्रिक्स –

  • व्हॅल्यू स्टॉक मूल्यमापन मेट्रिक्स मध्ये पुस्तकी मूल्य, लाभांश आणि रोख प्रवाहाचा समावेश होतो. 
  • ग्रोथ स्टॉकमध्ये प्रति शेअर कमाई, निव्वळ उत्पन्न, नफा मार्जिन आणि वाढीतील दराचा मूल्यमापन मेट्रिक्स मध्ये समावेश होतो. 

४. जोखीम –

  • शेअर बाजारात प्रत्येक गुंतवणूक ही जोखमीचीच असते. 
  • व्हॅल्यू स्टॉक हे ग्रोथ स्टॉकपेक्षा जास्त जोखमीचे असतात. 

नक्की वाचा – Investment Tips : प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ‘या’ स्मार्ट टिप्स

५. बिझनेस प्रोफाइल –

  • व्हॅल्यू स्टॉक मधील बिझनेस प्रोफाईलचे मूल्यमापन कमी कमाई, जनसंपर्क व्यवस्थित न केल्यामुळे कमी होते, पण काही कालावधीनंतर त्याला मूल्य प्राप्त होते.
  • ग्रोथ स्टॉकमध्ये लहान पासून मध्यम स्वरूपापर्यंतचे स्टॉक असतात. या स्टॉकच्या यूएसपी आणि स्पर्धात्मक फायद्यामुळे ग्राहकांना बाजारात फायदा होतो. 

६. लाभांश  –

  • व्हॅल्यू स्टॉक हे ग्राहकांना लाभांश देत असतात, त्यांनी परत दिलेला नफा कंपनीत गुंतवणूक करण्याची सक्ती केली जात नाही. 
  • ग्रोथ स्टॉक लाभांश देत नाहीत कारण कमाई झालेली रक्कम ते कंपनीच्या विस्तारात गुंतवत असतात. 

७. वाढीची शक्यता –

  • व्हॅल्यू स्टॉकमध्ये वाढीची शक्यता कमी असते.
  • ग्रोथ स्टॉक मध्ये वाढीची शक्यता जास्त असते. 

८. गुंतवणुकीचा कालावधी –

  • व्हॅल्यू स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा कालावधी दीर्घकालीन असतो. 
  • ग्रोथ स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा कालावधी कमी दिवसांचा असतो. 

ग्रोथ स्टॉक किंवा व्हॅल्यू स्टॉक हे दोनही स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे असतात. स्टॉकमधील गुंतवणुकीसाठी निश्चित असे कोणतेही तत्व नसून गुंतवणूकदारांच्या कौशल्य आणि अभ्यासावर ते अवलंबून आहे. ग्रोथ स्टॉक मध्ये कंपनी जशी वाढत राहते तसे तिचे मूल्यांकन वाढते. व्हॅल्यू स्टॉक मधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. व्हॅल्यू स्टॉकमधील सवलतीच्या दरात खरेदी केलेले स्टॉक चांगला परतावा आणि लाभांश देतात. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दोन्ही प्रकारच्या स्टॉक मधील गुंतवणूक नक्की ठेवा. 

नक्की वाचा : Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…