Reading Time: 3 minutes

श्री साने यांनी निवृत्तीनंतर जनरितीप्रमाणे पैसे मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवले. मुदत संपली. पण खात्यात ५०,००० रुपये व्याज जमा होण्याऐवजी फक्त ४५,००० रुपये  जमा झालेले. चौकशी केल्यावर असे लक्षात आले की ५,००० रुपये ‘टीडीएस’चे (TDS) म्हणून कापले गेले आहेत.

आता, “वार्षिक उत्पन्न फार नसतानाही टॅक्स का बरं जावा?” हा प्रश्न भेडसावत असताना त्यांची गाठ पडली आपल्या दिनकररावांशी. त्यांनी सर्वज्ञात असलेला मार्ग सुचवला – रिटर्न फाईल करणे, रिफंड क्लेम करणे अणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून पैसे येण्याची वाट बघणे. याशिवाय सीएला द्याव्या लागणाऱ्या फी चा भुर्दंड वेगळाच. पण या पुढे असा त्रास परत होऊ नये यासाठी दिनकररावांनी फॉर्म 15/H भरण्याचा रामबाण उपायदेखील सुचवला. फॉर्म  15/H हे नक्की काय प्रकरण आहे ते आपण समजून घेऊया.

  • आता आपणा सर्वांना वार्षिक उत्पन्नावर लागू असलेले कर माहिती आहेतच. याच वार्षिक उत्पन्नात मोडते मुदत ठेवींवर (FD) कमावलेले व्याज आणि या व्याजावर कापला जाणारा टॅक्स वाचवण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे 15/H.
  • या अंतर्गत तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला बँकेकडे एक ‘स्वयं घोषणा पत्र’ (Declaration) जमा करावं लागतं. त्यात असे नमूद केले जाते की, तुमचे वार्षिक उत्पन्न कर्मर्यादेच्या आत असून कर कपातीपासून सुट मिळावी. प्रत्येक बँकेचा आपला एक विशिष्ठ फॉर्म असून तो त्यांच्या शाखेत अथवा वेबसाईट वर सहज उपलब्ध होऊ शकतो.
  • हा फॉर्म भरणे अगदी सोपे असून खालील प्रमाणे ते करता येईल –
    • फॉर्म पूर्ण करावयास लागते ती आपली वैयक्तिक माहिती म्हणजे – आपले नाव, पत्ता, पॅन नंबर, इत्यादी.
    • तुम्हाला संबधीत नमुना फॉर्म किती उत्पन्नासाठी भरायचा आहे अणि
    • असे किती फॉर्म आपण भरलेले आहेत,  एवढच पुरे!
  • आता आपण आपल्या श्री सानेंच्या उदाहरणातून आणखीन स्पष्ट करूया –
    • साने यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखापेक्षा कमी आहे. त्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन म्हणजे पेंशन आणि मुदत ठेवींमधून मिळालेलं व्याज. Risk diversification म्हणुन सानेंनी 4 FD केल्या त्या अशाप्रकारे –
      • जनता सहकारी बँक रु.५,००,०००
      • ICICI बँक रु.५,००,०००
      • SBI रु.५,००,०००
      • पोस्ट खात रु.५,००,०००
      • एकूण राशी रु.२०,००,०००. आपल्या सोयीसाठी या सर्व FD वर १०% असा समान व्याजदर आपण समजूया. म्हणजे वार्षिक व्याजातून आलेली रक्कम २,००,००० रुपये.
  • या व्यतिरिक्त दर महा २०,००० पेंशन. अशा प्रकारे त्याचं एकूण उत्पन्न ४,४०,००० रुपये म्हणजे रु. ५ लाखापेक्षा कमी.
  • आता प्रत्येक ‘एफडी’करिता एक 15/H फॉर्म भरावयास लागतो. म्हणजे आपल्या उदाहरणात ४ फॉर्म भरणे आले. प्रत्येक फॉर्म मागे बँक अथवा ब्रँचकडून एक UIN नंबर त्या फॉर्मला दिला जातो.
  • याचाच अर्थ सानेंनी स्वयं घोषित केले आहे की त्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ५ लाखांपेक्षा कमी असून व्याजावर टीडीएस कापला जाऊ नये.

आता एक ‘कहानी मैं ट्विस्ट’ –

  • काही कारणास्तव तुमचे वार्षिक उत्पन्न अचानक वाढले. तुम्ही एक घर किंवा जमीन विकली आणि त्यातून आलेले उत्पन्न आपल्या स्वयं घोषणेला खोटे ठरवू शकते. पण काळजी करण्याचे कारण नाही – आलेल्या करदायित्व स्वीकारून वेळेत रिटर्न भरल्यास काही प्रश्न उद्भवत नाही.

आणि हो,

  • ही सुविधा फक्त जेष्ठ नागरिकांसाठी नसून ६० वर्षांपेक्षा कमी आणि करमर्यादेच्या आत उत्पन्न असलेले लोक देखील याचा लाभ घेऊ शकतात. मात्र त्यांना लागू असलेला फॉर्म  15/H नसून 15/G आहे आणि त्या साठी लागणारी सर्व माहिती वरील प्रमाणेच असते.

एक सुचना:-

जर आपण आपल्या स्वयं घोषणा पत्रात (Declaration) चुकीची माहिती दिली तर दंड अथवा शिक्षा होऊ शकते.

तर मग काय, या वर्षी भरायचा ना 15/H किंवा 15/G?

प्रेरणा शेठ

 9769484242

[email protected]

(प्रेरणा शेठ, या मुंबईस्थित कर सल्लागार असून त्यांना १० वर्षांपेक्षा जास्त काळ मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.)

टीडीएस (TDS) म्हणजे नक्की काय?,

टीडीएस प्रणाली आणि बँक ठेवींवरील व्याजाचं गणित

आयकर विवरणपत्र भरताना आपले हे उत्पन्न विसरू नका

फॉर्म २६ बद्दल माहिती आणि त्याचे महत्व

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.