Risk Management
जोखीम व्यवस्थापन (Risk Management) म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ही संकल्पना फक्त व्यवसायिकांसाठीच आहे. खरंतर ही संकल्पना वैयक्तिक आर्थिक नियोजनातही तितकीच महत्वाची आहे. आपले आयुष्य अशाश्वत परिस्थितीवर विसंबून असते. कधी कधी कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना जोखीम पत्करून आर्थिक जबाबदारी पार पाडावी लागते, तर कधी आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा प्रसंगात आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा ही संकल्पना अस्तित्वात आली. फार पूर्वीपासून जोखीम व्यवस्थापन ही वैयक्तिक आर्थिक नियोजनातील स्वतंत्र संकल्पना समजली जाते. आज आपण जोखीम व्यवस्थापनातील विमा योजनेचे महत्व या विषयावर विस्तृतपणे माहिती घेणार आहोत.
हे नक्की वाचा: कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!!
Risk Management: विमा योजनेबद्दल महत्वाची प्रश्नोत्तरे
१. विमा म्हणजे काय ?
- आयुष्यात अनपेक्षितपणे घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊन आर्थिक अडचणींमध्ये संरक्षण देणारी उपाययोजना म्हणजे विमा.
- उदा. योगेशला गंभीर स्वरुपाचा आजार आहे, आणि त्याला त्याच्या आयुष्याची काहीही शाश्वती नाही. परंतु, योगेशने नोकरी लागल्यानंतर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची सोय म्हणून विमा योजना घेतली होती. त्यामुळे योगेशचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांनाआर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
- थोडक्यात, विमा म्हणजे एक प्रकारची आर्थिक गुंतवणूक. विमा उतरावणाऱ्या अनेक विश्वासू कंपनी आपल्या भारतात आहेत.
२. विमा कसे कार्य करते?
- विमा हा गुंतवणूकदार आणि विमा कंपनी यांच्यामधील कायदेशीर करार असून, विमा पॉलिसीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते.
- विमा पॉलिसीमधील नियम व अटींनुसार विमा कंपनी, विमाधारक व्यक्तीला पॉलिसीची रक्कम देते.
- विमा म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची तरतूद.
३. विमा योजनेचे प्रकार:-
- विमा योजनेचे अनेक प्रकार आहेत. भारतामध्ये प्रचलितअसणारे प्रकार म्हणजे –
- जीवन विमा
- आरोग्य विमा
- वाहन विमा
- गृह विमा
- विमा योजना हा पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यामधील करार असतो. कोणत्याही विमा योजनेमधील मूलभूत तत्वे ही सारखीच असतात.
महत्वाचा लेख: सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार
Risk Management: विमा योजनेमधील मूलभूत तत्वे:
प्रत्येक विमा पॉलिसीच्या काही अटी, नियम किंवा तत्व असतात पॉलिसीधारकाने समजून घेणे आवश्यक आहे. विमा योजना हे नफा कमाविण्याचे साधन नसून आकस्मिक आणि नैसर्गिक रित्या निर्माण झालेल्या परिस्थिती मध्ये करावयाचे आर्थिक नियोजन आहे. विमा योजनेमधील ७ मूलभूत तत्वे पुढीलप्रमाणे –
१. विश्वास
- विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करताना, पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांचा परस्परांवर विश्वास असावा लागतो.
- ज्या व्यक्तीला पॉलिसि घ्यायची असेल त्याने आपले वय, व्यसन, आपले आरोग्य,उत्पन्न आणि आनुवंशिक आजार याबद्दल सर्व माहिती विमा कंपनीला विश्वासाने देणे अनिवार्य आहे.
२. आर्थिक नुकसानीचे कारण
- या तत्वानुसार विमाधारकाचे आर्थिक नुकसान एकापेक्षा जास्त कारणाने झाले असेल, तर जे सर्वात जवळचे किंवा शेवटचे कारण असेल तेच विमाधारकाचे उत्तरदायित्व ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते, त्यानुसार विमा धारकाला पैसे दिले जातील.
३. विम्याचा प्रिमिअम
- प्रामुख्याने विमा धारकाचे वय, आरोग्य तसेच त्याच्या नोकरी/ व्यवसायचे स्वरूप याआधारे विम्याचा प्रिमिअम निश्चित करण्यात येतो.
- याशिवाय इतर कोणत्याही गोष्टींना विचारात घेतले जात नाही.
४. नुकसानभरपाई
- या तत्त्वाप्रमाणे विमा हा कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी गुंतवलेला किंवा नफा मिळवण्यासाठी केलेला करार नाही. एखाद्या गोष्टीचे आर्थिक नुकसान झाले असेल तर् ते परत मिळवण्यासाठी केलेली उपाययोजना आहे.
- उदा. जर तुम्ही चारचाकी गाडी खरेदी केली आणि तिचा अपघात होऊन काही हानी झाली असेल. तर त्याच्या दुरुस्तीला आलेला खर्च हा गाडीच्या विमा पॉलिसीमधून मिळू शकतो. यालाच नुकसानभरपाई असे म्हणतात. परंतु, संबंधित वाहन जर तुम्ही विकले तर त्या वाहनाच्या विम्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
महत्वाचा लेख: योग्य आरोग्य विम्याची निवड
५. सब्रगेशन (Subrogation)
- ही संकल्पना प्रामुख्याने वाहन विम्यामध्ये वापरली जाते. या तत्त्वाप्रमाणे जर पॉलिसीधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीचे काही नुकसान झाल्यास, विमा कंपनी त्याला नुकसानभरपाई तर देते.
- उदा. जर अमरच्या वाहनामुळे दिनेशला अपघात झाला आणि त्यामध्ये त्याला दुखापत झाली किंवा त्याच्या गाडीचे काही नुकसान झाले, आणि अमरने थर्ड पार्टी इंश्युरन्स घेतला असेल, तर विमा कंपनी नुकसान भरपाई नक्की करू शकते.
६.योगदान
- जेव्हा विमाधारक एकाच मालमत्तेचे एकापेक्षा जास्त विमा पॉलिसी घेईल तेव्हा योगदानाचे तत्व लागू होते.
- याचाच अर्थ विमाधारक एकाच वेळी वेगवेगळ्या पॉलिसी किंवा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून नफा कमवू शकत नाही.
- उदा. प्रकाशने ५ आणि ३ लाख रुपयांच्यापॉलिसी घेतल्या आहेत. जर प्रकाशला काही नुकसान झाले तर पहिल्या कंपनीकडून प्रकाश संपूर्ण रकमेचा दावा करु शकतो परंतु नंतर दुसऱ्या कंपनी कडून कोणतीही रक्कम मागू शकत नाही. किंवा दोन्ही कंपनीकडून अर्धी अर्धी भरपाई प्रकाश घेऊ शकतो. पण ती नुकसानभरपाई असेल, नफा नाही.
७. कमीतकमी तोटा
- या तत्वानुसार, एक मालक म्हणून आपण आपल्या मालमत्तेचे हलगर्जीपणा न करता जबाबदारीने संरक्षण करणे अनिवार्य आहे.
- विमा कंपनी नुकसानभरपाई देईल या उद्देशाने मालमत्तेचे नुकसान होऊ देणे योग्य नाही.
- उदा. कारखान्यात आग लागली तर अशावेळी संबंधित विमा कंपनी नुकसानभरपाई देतेच. तरीही आपण आग न लागू देण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Risk Management in Marathi, Risk Management Marathi Mahiti, Risk Management Marathi, Risk Management mhnaje kay?