Reading Time: 2 minutes

बचतीच्या पैशांची गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. उत्तम परतावा देणाऱ्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणुक करण्याऐवजी तुम्ही नाममात्र व्याज देणाऱ्या बचत खात्यामध्ये पैसे ठेवले तर तुमचे ते एकप्रकारचे नुकसानच असते. 

बचत खात्यामध्ये पैसे ठेवावेत का त्यांची गुंतवणूक करावी हे समजून घेणे गरजेचे आहे. या सोबतच पैसे वाचवण्याच्या महत्वपूर्ण टिप्स खालील लेखात देण्यात आल्या आहे. 

बचत खात्यावरील व्याजदर आणि वाढती महागाई – (Savings and Inflation rate in Marathi)

  • अनेक लोक बचत खात्यामध्ये पैसे साठवतात. बचत खात्यामधील गुंतवणुकीतून सरासरी ४ टक्के परतावा दिला जातो. 
  • बचत खात्यावर ४ टक्के व्याजदर मिळत असले तरी महागाई मात्र दिवसेंदिवस त्या दरापेक्षा वाढतच चालली आहे. 
  • बचत खात्यावर ठेवलेले पैसे आणि महागाईच्या प्रमाणामध्ये विसंगती आढळून येते. महागाई ८ टक्के तर कधी कधी १० टक्यांपर्यंत जाऊन पोहोचते. 
  • महागाई वाढत असताना बचत खात्यावर मिळणारा परतावा कमी होत असल्यामुळे बचत खात्यामध्ये ठेवलेले पैसेच एकप्रकारे कमी होत आहेत असा त्याचा अर्थ होतो. 

लक्षात ठेवा ! “काटकसर” या एका शब्दात इतर सर्व सद्गुणांचा समावेश होतो 

गुंतवणुकीची संधी वाया जाते – (Loss of Investment Opportunity)

  • सध्याच्या घडीला सर्वानाच पैसे गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. पण बरेचजण गुंतवणूक न करता त्यांची बचत करण्याला प्राधान्य देतात. 
  • एखाद्या उत्तम कंपनीचा आयपीओ बाजारात आला आणि आपण त्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी बचत खात्यातच पैसे ठेवले तर गुंतवणुकीची मोठी संधी तुमच्या हातातून निघून जाते. 

नक्की वाचा : तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना? 

बचत खात्यातून लवकर पैसे वापरले जातात –

  • आपण बँकेच्या बचत खात्यामध्ये पैसे ठेवले तर त्यामधून गरज लागेल तेव्हा लगेचच पैसे काढले जातात. 
  • पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले तर ते काढणे अवघड असते. रिअल इस्टेट किंवा शेअर बाजारात केलेली गुंतवणूक अनेकदा उत्तम परतावा मिळाल्याशिवाय काढली जात नाही. 
  • त्यामुळे शक्यतो पैसे गुंतवताना ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणेच योग्य ठरू शकते. 

पैसे वाचवून त्याची बचत करणे गरजेचे असते. पैसे वाचवायचे कसे हे आपण बघूया – (Importance of savings in marathi)

१. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा –

  • दररोज कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा. 
  • गरज असेल तेथेच वैयक्तिक गाडीचा वापर करावा, अन्यथा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करून तुम्ही इच्छित स्थळी पोहोचू शकता. 
  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास महिनाकाठी तुमचे चांगले पैसे वाचू शकतात. 

लक्षात ठेवा! तुम्ही पै पै ची काळजी घेतली तर तेच पैसे रुपयांची काळजी घेतील 

 

२. क्रेडिट कार्ड व्याज वेळेवर भरा – 

  • क्रेडिट कार्ड वापरत असताना गरज असेल तेथेच त्याचा वापर करावा. महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त रक्कम कार्डवरून वापरू नये. 
  • क्रेडिट कार्ड वरून काढलेले कर्ज वेळेवर भरून टाकावे. 
  • क्रेडिट कार्डावरील कर्ज वेळेवर भरले नाही तर त्यावरील व्याज चक्रवाढ दराने वाढत जाते. 

नक्की वाचा : आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र 

   ३. महिन्याच्या खर्चाचे नियोजन करा –

  • महिन्यामध्ये खर्च किती होतो त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटी किती खर्च झाला याचा हिशोब करायला हवा. 
  • बाहेरील जेवण, खरेदी किंवा इतर वस्तूंवर जर अनावश्यक खर्च होत असेल तर तो कमी करा. 
  • खर्चाचा आढावा घेतला की त्या महिन्याचा अतिरिक्त खर्च कळून पुढील महिन्यात तो टाळता येऊ शकतो. 

४. आपत्कालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टये ठरवा –

  • करिअरच्या सुरुवातीलाच बचतीची सवय लागली की आपत्कालीन निधी आणि निवृत्तीनंतरची बचत करता येते. बचतीची सवय लवकर लावून घेणे गरजेचे असते. 
  • आपत्कालीन निधी उभारला का बचत करायला सुरुवात करायला हवे. रोजच्या छोट्या छोट्या बचतीमधूनच मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 

५. मासिक उत्पन्नामधून पैशांची बचत करणे –

  • दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या खर्चामधून विशिष्ट रकमेची बचत करायला हवी. 

बचतीचे चुकीचे गणित – उत्पन्न (वजा) खर्च  = बचत  

बचतीचे योग्य गणित   – उत्पन्न (वजा) बचत = खर्च   

बचत करून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे तुमची दीर्घकालीन ध्येये गाठण्यासाठी गरजेचे असते. 

 

कर्जप्रेमी होण्याऐवजी बचतप्रेमी व्हा आणि तुमचे जीवन सुखी, समाधानी, समृद्ध बनवा. 

आजच्या बचत दिनी या पवित्र कामासाठी तुम्हाला टीम अर्थसाक्षर कडून शुभेच्छा !

 

लक्षात ठेवा! पैसे हातात असतानाच बचत करा ही सोपी गोष्ट शिकणे मात्र कठीण असते

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…