Reading Time: 2 minutes

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेला योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. हजारजबाबीपणाने  निर्णय घेतल्यामुळे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. शेअर बाजाराचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे जेफ बेझोस, चार्ली मुंगेर, इलॉन मस्क आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट डी. आइसनहॉवर यांनी वापरलेले ४ निर्णय मॉडेल खाली दिलेले आहेत. 

 

१. उलटता – जेफ बेझोस यांची निर्णयपद्धती (Jeff Bezos think style in marathi)

 • आयुष्यात करता येण्यासारख्या आणि न करता येण्यासारख्या निर्णयांचे वर्गीकरण उलटता पद्धतीमध्ये केले जाते. करता येण्यासारख्या मार्गाला २ दरवाजे असतात. यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त असू शकते किंवा त्या वस्तूला किंमतच नसू शकते. 
 • न करता येण्यासारख्या मार्गाला १च दरवाजा असतो. एकदा त्या दरवाजातून आत गेल्यावर लवकर बाहेर पडू शकत नाही. न करता येण्यासारख्या मार्गावरच्या वस्तूची किंमतच खूप जास्त असते. 
 • गरजेची नसणारी प्रक्रिया न करता लवकर निर्णय घेता यायला हवा. यासाठी जास्त वेळ देण्याची गरज नसते. तर न करता योग्य विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. त्यावेळी शक्य तितकी माहिती लक्षात घ्यायला हवी. 
 • जेफ बेझोस यांच्या आयुष्यात या निर्णयाचा मोठा परिणाम झाला होता. जेफ बेझोस यांनी अमेझॉनचे चालू केले तेव्हा ते न चालल्यास नोकरीवर परतण्याचा त्यांनी निर्धार करून ठेवला होता. त्यांचा हा निर्णय पलटू शकत होता. 
 • त्यानंतर योग्य वेळी बेझोस यांनी अमेझॉन चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुरुवातीलाच फायदा मिळाला आणि अमेझॉन कंपनीचा इतिहास आता तुमच्या सर्वांच्या पुढे आहे. 

 

२. उलथापालथ – चार्ली मुंगेर यांची निर्णयपद्धती 

 • एखादी सुरुवात करत असताना  सुरुवातीला यशाचा विचार करू नका तर अपयश कशामुळे येऊ शकतो याचा पहिल्यांदा विचार करा. 
 • ध्येयाचा विचार करत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्या लागतील याबद्दलचा अभ्यास करा  आणि त्या टाळून मार्गाला लागा. . 
 • एखादी गोष्ट करताना काय टाळायला हवे याचा विचार करायला हवा, पुढचा रस्ता सोपा होऊन जातो. 
 • चार्ली मुंगेर यांनी म्हटले होते की, मी पुढे घडणाऱ्या वेळेचा योग्य अभ्यास करून निर्णय घेत असतो.
 •  चार्ली मुंगेर हे  एअरफोर्स मध्ये असताना हवामान विभागाचा अंदाज लावण्याचे काम त्यांच्याकडे होते. तेव्हा त्यांनी वैमानिकांना धोकायदायक ठिकाणी जास्त पाठ्वलेच नाही. त्यामुळे त्यांच्या विभागातील सर्वात जास्त वैमानिकांचे प्राण वाचले होते. 

 

नक्की वाचा : एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास 

 

वॉरेन बफेट यांनी म्हटले होते की मला जिथे जाऊन सर्वात मोठा धोका असेल तिथे मी कधीही जाणार नाही. 

 

३. विचार करण्याचे सर्वात पहिला नियम – एलॉन मस्क यांची विचार पद्धती (Elon musk thinstyle in marathi) 

 • एखाद्या समस्येला कलात्मक पद्धतीने सोडवण्यापेक्षा त्यातील मूलभूत गोष्टींचा विचार करायला हवा. 
 • हा विचार वैज्ञानिक पद्धतीचा आहे. मूलभूत गोष्टी समजून घेऊन समस्येच्या मुळाशी जाता येते. एलॉन मस्क यांनी विचार करण्याचा हा पहिला नियम मांडला आहे. 
 • विचार करण्याच्या नियमाचे उदाहरण मस्क यांनी टेस्ला गाडीतील बॅटरीच्या बाबत घडलेले उदाहरण सांगितले आहे. 
 • टेस्ला गाडीची बॅटरी पॅक महाग होते. तिची किंमत ६०० डॉलर प्रति किलोवॅट इतकी होती. 
 • त्यानंतर मस्क यांनी मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला. त्यांनी बॅटरीमधील मूलभूत घटक कोणते आहेत, त्यांची बाजारभावात किंमत किती आहे याचा अभ्यास केला. 
 • मस्क यांनी अभ्यास केल्यानंतर कोबाल्ट, निकेल, अल्युमिनिअम आणि कार्बनची लंडन मेटल एक्स्चेंजवर ८० डॉलर प्रति वॅट इतकी किंमत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे व्यवसायात मोठा बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

 

४. प्राधान्य देणे – आयझेनहॉवर यांची विचार पद्धती 

 • एखादा व्यक्ती निर्णय घेत असताना त्याने महत्वाचे, अत्यंत महत्वाचे आणि नंतर करण्याजोगे असे कामांचे विभाजन करायला हवे असा विचार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी मांडला आहे. 
 • एखादे काम त्वरित आणि महत्वाचे असेल तर ते लगेच करून टाकायला हवे. काम महत्वाचे असेल पण लगेच आवश्यक नसेल तर नंतरच्या वेळापत्रकात त्याचा समावेश करण्यात यावा. 
 • एखादे काम महत्वाचे नसेल पण तातडीचे असेल तर ते बाहेरून करून घ्यायला हवे. 
 • जी कामे अनावश्यक असतील त्यांच्यावर स्वतःचा वेळ खर्च करू नये. 

 

प्रत्येकजण योग्य वेळी निर्णय घेऊ शकेल असे नाही. पण वरील पद्धती तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करेल. 

 

नक्की वाचा : कशी झाली अमेझॉनची सुरुवात 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.