आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutes

परवा माझा मित्र विजयचा फोन आला. (वय 30)

एका मोठया ग्रूप ऑफ कंपनीच्या जनरल मॅनेजर पदावर खूप कमी वयात पोहचण्याची किमया त्याने त्याच्या  बुद्धिमत्तेच्या जोरावर साधली होती. शालेय जीवनापासून तर महाविद्यालयीन शिक्षणातही त्याने त्याच्या प्रगतीचा आलेख कायमच उंचावतच नेला होता. आणि म्हणूनच या पदावर पोहचून भलेमोठे पाच आकडी पॅकेज व कंपनीच्या सर्वकाही सुविधा त्याला उपलब्ध झाल्या होत्या.

मात्र तरीही त्याचा फोनवरील संभाषणाने माझ्या लक्षात आले की विजय कितीही बुद्धिमान असला तरी आर्थिक नियोजनाचे ज्ञान त्याला बिलकुल नाही.

अर्थात संपूर्ण भारतात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय.

“सुनील मला एक चांगली विमा गुंतवणूक दे की त्या माध्यमातून माझ्या मुला मुलीचे शिक्षण, लग्न या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत.” विजू अतिशय विश्वासाने बोलत होता .

एक दर्जेदार सरकारी विमा कंपनीही त्यानेच सुचविली होती. एका तथाकथीत विमा व गुंतवणूक सल्लागाराने त्याला एक कॉम्बिनेशनही त्याला सुचविले होते. मात्र मी त्याचा मित्र व आर्थिक नियोजक म्हणून तोच प्लॅन त्याला माझ्याकडून हवा होता.

या ठिकाणी आता वेगळे काम करणे आवश्यक आहे हे मला लक्षात आले. आमचे संभाषण सुरू झाले,.

“विजू , विमा ही गुंतवणूक नव्हे हे तुला माहीत नाही का ?”  

“अरे हो पण एका दगडात दोन पक्षी ! गुंतवणूकीबरोबरच विमा सुद्धा.. ” विजू विजयी आविर्भावात बोलत होता.

 मी त्याला आता मोबाईल चे उदाहरण दिले.

“संभाषण, व्हाट्सएप – फेसबुक वापर, इ मेल्स, फोटो, इ. सर्वगोष्टी आपण मोबाईल वर करतोय. परंतु जर मी असे म्हणालो की एक सर्वश्रेष्ठ अभिनेत्री दीपिका पदुकोणचा मॉडेल म्हणून फोटो मी या मोबाईल मध्ये काढून एका जगद्विख्यात मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यासाठी देणार आहे . तर तू काय म्हणशील ? ”

आता विजू खळखळून हसायला लागला होता.

विमा व गुंतवणूक एकत्र केल्यास असेच होते. आपल्याला पुरेसे विमा संरक्षण ही मिळत नाही व पारंपरिक गुंतवणूकही महागाईला पार करून संपत्ती निर्माण करू शकत नाही. हे त्याच्या मी लक्षात आणून दिले.

पोस्टल व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?  हे आता त्याच्या लक्षात आले.

खरंतर सर्वत्र हीच अवस्था आहे . आपण सर्वांनी आर्थिक नियोजनाचे मुलभूत मंत्र लक्षात ठेऊन संपूर्ण सुरक्षा कवच अंगिकारले पाहिजे.

१) विमा ही गुंतवणूक नव्हे. विमा संरक्षण म्हणून शुद्ध विमा (टर्म इन्शुरन्स) अंगीकारावा.

२) दीर्घकालीन संपत्ती निर्माणासाठी गुंतवणूक म्हणून इक्विटी या पर्यायाचा (शेअर्स / म्युच्युअल फंड्स) स्वीकार करावा.

३) वैयक्तीक अपघात विमा संरक्षण असावे.

४) आपल्या कुटूंबाचा योग्य विमा संरक्षण कव्हरेज असलेला आरोग्य विमा ( Mediclaim) असावा.

६) गंभीर आजारांसाठी (Critical illness) विमा असावा.

७) आपले स्वतःचे ऑफिस व घराचाही विमा असावा.

८) आपल्या जीवनात एक प्रामाणिक आर्थिक नियोजक  सल्लागार म्हणून असावा.

  माझी विजूशी फोनवरच सविस्तर चर्चा झाली. त्याला मी टर्म इन्शुरन्स सुचविला. केवळ महिन्याला पाचशे ते सातशे रुपये खर्चात एक कोटीचा विमा मिळतो ते त्याच्या गावीही नव्हते.

  • आपल्या  वार्षिक उत्पन्नाच्या दहापट विमा संरक्षण असायला हवे.
  • हे विमा संरक्षण घेतांना कंपनीचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ बघायला हवा.  आयआरडीआयएच्या (IRDA) वेबसाईटवर तो बघायला मिळतो. ऑनलाईनच्या चकव्यात अडकण्यापेक्षा आर्थिक नियोजकाचा सल्ला “व्हॅल्यू अड्डेड” ठरू शकतो.
  • आता विजूला विमा ही गुंतवणूक नाही हे लक्षात आले होते. आपली बचत ही गुंतवणुकीत परावर्तित करण्यासाठी तो तयारही झाला. मुलामुलींच्या शिक्षण व लग्नासाठी तसेच स्वतःच्या सेवानिवृत्तीसाठी त्याचे आर्थिक नियोजनही केले.

एका  सूंदर भविष्याचे नियोजन झाले होते. त्यासाठी गरजेनुसार त्याने म्युच्युअल फंडाचा एसआयपी (SIP) प्लॅन अंगिकारला. टर्म इन्शुरन्स, मेडीक्लेम इन्शुरन्स, वैयक्तिक अपघात विमा, क्रिटिकल इलनेस पॉलिसी या सर्व गोष्टीचे परिपुर्ण नियोजन झाले झाल्याने आता विजू भविष्यबाबत निश्श्चिंत झाला होता.  

(पुढील लेखात आपण टर्म इन्शुरन्स बाबत सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.)

– सुनील कडलग .

 9422855786 / 9881327686

 kadlaginvestment@gmail.com

(लेखक हे पूर्णवेळ आर्थिक नियोजक म्हणून कार्यरत आहेत.आपण त्यांच्याशी इमेलवर अथवा भ्रमणध्वनी वर संपर्क साधू शकता.)

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना,

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!,

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

error: Content is protected !!