Arthasakshart जागतिक बचत दिन
Reading Time: 2 minutes

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझा’ यांनी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला.

 • World Saving day म्हणजेच ‘जागतिक बचत दिन’ जगभर ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.
 • प्रथम ‘World Saving dayसन १९२५ मध्ये साजरा करण्यात आला. तर सन १९२१ मध्ये स्पेन व अमेरिकेत प्रथम ‘राष्ट्रीय बचत दिन’ साजरा केला गेला.
 • चांगले जीवनमान मिळविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत चालण्यासाठी पैसे वाचवणे महत्वाचे आहे.
 • विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ, तुमची बचत तुमच्या उठण्या-बसण्याच्या, चालण्याबोलण्याच्या पध्द्तीमध्ये झळकत असते. थोडक्यात, तुमच्या शारीरिक हालचाली आणि आत्मविश्वासामधून तुमची बचत काय असेल याचा अंदाज येतो.
 • बचतशुन्य माणूस सतत कशाच्यातरी मागे पळताना दिसतो. समोर आलेली नोकरीची पाहिली संधी त्याला मुकाटपणे स्विकारण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याने दिलेल्या सन्मानाच्या शिखरावर देखील तो सावधपणे बसतो. कारण येणारं छोटंसं संकटही त्याला लाचार बनवू शकतं.
 • बचातीशिवाय माणूस अत्यंत कृतज्ञ किंवा नम्र भासतो. अर्थात, कृतज्ञतातेच्या जागेवर योग्यच असते. पण जगत असताना अतिविनयशील माणसाच्या नशिबात पायदळी तुडवलं जाणं असतं.
 • याउलट, हाताशी बचत असणारा माणूस समाजात ताठ मानेनं, आत्मविश्वासपूर्ण वावरतो. चालून आलेल्या संधीमागे न धावता त्यांची योग्यायोग्यता तो निवांतपणे तपासू शकतो. म्हणजेच, आर्थिक संकटांमागे न धावता, विवेकी विचार करण्याची संधी त्याला मिळते.
 • तत्त्वांना धक्का बसवणारी नोकरी झिडकारण्याची हिम्मत तोच करू शकतो, ज्याच्या गाठीशी बचतीची जमा पुंजी आहे. बचत असेल, तर प्रामाणिकपणा आणि तत्वांशी तडजोड करावी लागत नाही.
 • नोकरी जाण्याची भीती नसल्याने ही माणसं स्पष्ट मतं द्यायला घाबरत नाहीत आणि असे निर्भीड कर्मचारी कंपनीला लाभदायक ठरतात व बढतीसाठी पात्र असतात.
 • माणसं अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजांच्या चौकटीत इतकी अडकतात की त्यांची आयुष्या बद्दल दूरदृष्टी मारून जाते. तत्काळ आर्थिक फायदा देणाऱ्या गोष्टींमागे धावण्यातच त्यांना धन्यता मानावी लागते. बचतीची सवय नसल्याने आयुष्याचा राहाटगाडा असाच चालू राहतो.
 • बचातशीर मनुष्य घर, नातेवाईक यांच्यासाठी दानशूर कर्णाची भूमिका बजावतो. मित्र असोत, अपरिचित किंवा शत्रू, कोणत्याही व्यक्तीसमोर ताठ मानेनं नजर रोखून वावरण्याची धमक या माणसांमध्ये असते. आणि यामुळेच त्याचं व्यक्तिमत्व आकाराला येतं.
 • “बचत करावी इतका आमचा पगाराच नाही!” ही पळवाट तशी सोपी. पण खरं सांगायचं तर, तुमच्या पगाराच्या आकाराचा बचतीशी काहीही संबंध नाही. संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय  हातावरचं पोट असणाऱ्यांप्रमाणेच अवाढव्य पगार असणाऱ्यांनाही नडते आणि ते गरजांच्या चक्रव्युहात अडकले जातात.
 • अमेरिकन बँकेचे उच्च पदाधिकारी(डीन) जे. पी. मोर्गन एका दलालस सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला तर आयुष्यात पुढे होणारी धावपळ टाळली जाऊ शकते.”
 • विल रॉजर म्हणतात, “कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगती पेक्षा, कालच्या बचतीवर भागवणाऱ्या द्वारपालची संगत मी पसंत करेन.”
 • शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरी निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत केलीच पाहिजे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातली पत ठरणार आहे हे नक्की!    

वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून पैसे उडवतच असता. आज “World Saving day” किंवा “जागतिक बचत दिन” पैसे वाचवून साजरा करा. बघा जमतंय का? जमेल नक्की जमेल, प्रयत्न तर करा. 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…