गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.
साधारणतः “कर्जाची प्रक्रिया फार गुंतागुतीची आहे, आपल्याला ह्यातलं काहीएक समजणार नाही, गोंधळ उडेल” असाच पुर्वग्रह लोकांमध्ये दिसून येतो.
पण वास्तविक असे नसते. संपुर्ण माहिती असल्यास, व ती नीट समजून घेतल्यास ह्यात कठीण असं काही नाही. या प्रक्रियेत अनेक कागदपत्र लागतात. यातली काही वैयक्तिक व घरच्याघरी उपलब्ध असतात, तर काही इतर संस्थांकडून मिळवावी लागतात.
ह्या दस्तऐवजांची यादी संस्थेगणिक बदलत असली तरी बरीचशी कागदपत्रं ही सामाईक व प्रत्येक संस्थेसाठी अनिवार्य असतात.
कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे-
प्राथमिक कागदपत्रे-
-
अर्जदाराचा फोटो व सही असणारा अर्ज (ॲप्लिकेशन फॉर्म)
-
बँक अकाऊंट स्टेटमेंट
-
टेलिफोन बिल
-
क्रेडिट कार्ड बिल (असल्यास)
-
वीज बिल
-
पत्रव्यवहाराचा पत्ता खरा असल्याचा दाखला देणारे एम्प्लॉयरचे पत्र
-
पासपोर्ट (वैध) (अटः ॲप्लिकेशन फॉर्म आणि पासपोर्टचा पत्ता एकच असावा)
-
फोटो असलेले सरकारी ओळखपत्र
-
सध्याची नोंदणीकृत घरभाडेपट्टी
अतिरिक्त कागदपत्रे-
-
(नोकरदार असल्यास) मागील किमान तीन महिन्याच्या सॅलरी स्लीप्स
-
(व्यवसायिक असल्यास) व्यवसाय चालू असल्याचा पुरावा आणि व्यवसायाचे स्वरूप सांगणारी कागदपत्रं
-
प्रक्रिया शुल्काचा चेक
-
फॉर्म १६ / इन्कम टॅक्स रिटर्न
-
शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी प्रमाणपत्रं
-
मागील तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स (ऐच्छिक, संस्थेस आवश्यक असल्यास)
-
चार्टर्ड अकाउंटन्टने प्रमाणित केलेल्या किंवा ज्यांचे ऑडिट झाले आहे अशा, मागील तीन वर्षांच्या बॅलन्स शीट्स आणि प्रॉफिट ऍण्ड लॉस अकाउंट (ऐच्छिक, संस्थेस आवश्यक असल्यास)
-
गॅरण्टर फॉर्म (ऐच्छिक, संस्थेस आवश्यक असल्यास)
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.