Reading Time: 3 minutes

इंटरनेट बँकिंगचा वापर करताना ‘काय करावं’ यापेक्षा ‘काय करू नये’ याची यादी नेहमीच मोठी असते. त्यामुळेच ‘काय करावे?’ या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. काही गोष्टी टाळणे जसे महत्वाचे आहे तसेच थोडी अधिक काळजी घेऊन काही गोष्टी केल्या की आपण सुरक्षेच्या वाटेवर अजून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आवर्जून काळजीपूर्वक करायला हव्यात.

१. नियमितपणे आपला पासवर्ड बदला-

 • आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या डेबिट/क्रेडीट कार्ड चा पासवर्ड नियमित बदलावा आणि महत्त्वाचे म्हणजे हा पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा.
 • नोटपॅड किंवा डेअरीमध्ये बँक डिटेल्स आणि संकेतशब्द लिहून ठेवले असतील तर ते गोपनीय राहतील याची खात्री करा.
 • एखादा क्लिष्ट पासवर्ड लक्षात ठेवणे कदाचित त्रासदायक ठरू शकते, परंतु आपल्या खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गोपनीयता टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
 • नेहमी मजबूत आणि दीर्घ संकेतशब्द निवडा. इंटरनेट बँकिंग व्यवहारांसाठी आपले नाव, जवळच्या व्यक्तीचे नाव किंवा वाढदिवस यापेक्षा काहीतरी वेगळा पासवर्ड निवड आणि राखून ठेवा. आपली ही माहिती कोणासोबत ही शेअर करू नका.

२. खात्रीलायक अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा-

 • फिशिंग, मालवेयर आणि इतर सुरक्षा धोक्यांपासून आपल्या संगणक, मोबाईल, इ. सुरक्षित करण्यासाठी नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
 • काहीवेळा, खुद्द अँटी-व्हायरसच आपल्या डीवाईस मधील संवेदनशील माहिती चोरतात किंवा चोरण्यास मदत करतात. आपली संवेदनशील माहिती चोरणाऱ्या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अधिकृत सॉफ्टवेअर वापरावे.
 • अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची पायरेटेड आवृत्ती विनामूल्य उपलब्ध असू शकतात, परंतु ते आपल्या संगणकाला ऑनलाइन जगामध्ये असलेल्या नवीन व्हायरसपासून संरक्षित करू शकत नाहीत. त्यामुळे फक्त परवानाकृत अँटी-व्हायरस आणि त्याचे अपडेटेड व्हर्जन तुम्हाला खात्रीशीर सुरक्षा देतात.    

३. टू फॅक्टर व्हेरिफिकेशन-

 • ‘टू फॅक्टर व्हेरिफिकेशन’ आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणाऱ्या सर्वोत्कृष्ट मार्गांपैकीच एक आहे. बऱ्याच बँका आणि वित्तीय संस्था या दिवसात फसवणूकीपासून संरक्षणासाठी वापरकर्त्यांना टू फॅक्टर व्हेरिफिकेशन सारख्या सेवा प्रदान करीत आहेत.
 • यामुळे आपल्या खात्याला उच्च दर्जाची सुरक्षितता मिळते. जेव्हा कोणीही इतर ठिकाणाहून ‘लॉग इन’ करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपल्याला सूचित केले जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक पावले उचलता येतात. अशी सुविधा आपल्या बँक खात्याला लागू आहे याची खात्री करावी.

४. इंटरनेट बँकिंग यूआरएल चा वापर-

 • ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये आपला बँक URL टाइप करा. बरेचदा वेबसाइट्सच्या लिंकसह असणारे ईमेल (जे अगदी बँकच्या मूळ वेबसाइटसारखेच डिझाइन केलेले आहेत) फसवे असू शकतात.
 • एकदा अशा वेबसाइटवर आपले लॉगिन तपशील प्रविष्ट केले की ते आपल्या खात्यात प्रवेश करून आपले पैसा चोरण्यासाठी सर्व माहिती वापरली जाऊ शकतो. लॉग इन करताना, युआरएल  मध्ये ‘https: //’ पहा आणि आपल्या बँकेची अधिकृत वेबसाइट असल्याचे निश्चित करा.

५. मोबाइल सूचनांसाठी मागणी करा-

 • आपल्याला मोबाईल एसएमएस द्वारे बँकेच्या व्यवहारांची सूचना मिळत असेल तर,  ही सूचना आपल्याला कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची त्वरीत सतर्क करेल.
 • व्यवहारासाठी ठरलेली मर्यादा ओलांडली आहे किंवा ती काय आहे? याबद्दल एक अलर्ट मेसेज मिळतो. तसेच यामध्ये खात्यामधली उर्वरित शिल्लक रक्कमही नमूद केलेली असते. त्यावरून आपल्या खात्याबद्दलच्या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत सतत पोहचत राहतील.
 • केवळ व्यवहारच नाही तर, आपल्या नेट-बँकिंग खात्यात अयशस्वी लॉगिन प्रयत्नांबद्दलही बँक आपल्याला सतर्क करते.

६. आपले खाते नियमित तपासा-

 • सुरक्षित इंटरनेट बँकिंग साठी नियमित कालावधीत आपले खाते तपासा. काही फिशिंग किंवा अनियमित गोष्ट आढळल्यास त्वरित आपला पासवर्ड बदला किंवा आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधा.
 • आपल्या खात्याद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहाराची देखरेख करणे आवश्यक आहे. नियमितपणे आपले खाते तपासण्यासाठी उचित सावधगिरी बाळगणे आणि काहीतरी संशयास्पद असल्यास आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच कोणतेही व्यवहार ऑनलाइन केल्यानंतर आपले खाते तपासा. तुमच्या खात्यातून योग्य रक्कम कपात केली गेली आहे का ते वेळोवेळी तपासत राहावे.

७.  डिव्हाइसची सुरक्षितता-

 • फोन, लॅपटॉप हरवला अथवा चोरीला गेला तर आपण आपल्या डिव्हाइस वर सेव्ह केलेली माहिती धोक्यात येऊ शकते. आपली माहिती मिळविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आपली माहिती वापरता येऊ शकते.
 • पिन, संकेतशब्द किंवा फिंगरप्रिंटसह लॉक ठेऊन आपल्या डिव्हाइसचे संरक्षण करा.

८. बँकेचे मोबाईल अॅप वापरा-

 • आपल्या बँकेचे एन्क्रिप्टेड मोबाइल अॅप बँकेच्या वेबसाइटपेक्षा अधिक सुरक्षित आहे, कारण वेबवर सापडणाऱ्या धोक्यांपेक्षा अॅप कमी संवेदनशील आहे.
 • बँकने ठराविक कालावधीने पाठविलेले अॅप अद्ययावत (Updates) करण्यास विसरू नका, जे आपल्या अॅपला नवीनतम सुरक्षा असल्याचे सुनिश्चित करतात.
 • आपल्याकडे एखादे अँड्रॉइड डिव्हाइस असल्यास, आपण ‘गुगल प्ले स्टोअर’ (Google Play Store) व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणावरून अॅप्स डाउनलोड करू नये हे लक्षात ठेवा.

थोडक्यात, ऑनलाईन व्यवहार करताना ‘जागरूकता’ राखणे सर्वात महत्वाचे आहे.  

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2CRLYM6 )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.