Reading Time: 3 minutes

आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसभरात कित्येक कारणांनी आर्थिक व्यवहार करत असतो. पैशाला विनिमयाचं एकमेव साधन या एककावर आपण स्थिर झालो असलो तरी या विनिमयाचे अर्थात आर्थिक देवाणघेवाणीचे कित्येक नवनवीन पर्याय आपल्यासमोर येत असतात. तंत्रज्ञान विकसित होतं तसं आणखी सोयीचे पर्याय उपलब्ध होतात. टपालाच्या बरोबरने येणारी मनी ऑर्डर असेल किंवा अॅपस् च्या जगात ‘तेझ’ (आता गुगल मनी) चा वाढणारा वापर असेल. पण समोर येणारे सगळेच पर्याय खात्रीलायक आणि सुरक्षित असतीलच असा नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही पर्यायाची सार्वत्रिक स्विकार्यता सर्वात आधी लक्षात घ्यायला हवी.

काही संस्थांनी पुरवलेल्या सेवा नेहमीच खात्रीलायक आणि सर्वमान्य असतात. जसे की सरकारमान्य बँका, प्रायव्हेट बँका इ. आणि यांच्यासोबत केलला व्यवहार नेहमी फायदेशीर आणि सुरक्षित असतो. 

  • NEFT(नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर), 

  • RTGS(रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट), 

  • ECS(इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सिस्टम), 

  • IMPS(तत्काळ देयक सेवा) 

या त्यांपैकी काही सुविधा आहेत.

NEFT(नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर) :

  • दोन घटकांमध्ये पैशाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हस्तांतरण करण्याचं काम NEFT करते.

  • ज्यांच्यात व्यवहार होतोय असे हे दोघे कोणीही असू शकतात. एक व्यक्ती, फर्म आणि कंपनी दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्ती, फर्म आणि कंपनीबरोबर एका बँकेच्या शाखेतून त्याच किंवा इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत पैशाचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हस्तांतरण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात करणारी प्रणाली म्हणजे NEFT. 

  • अशा व्यक्ती ज्याकडे बँक खाते नाही (वॉक-इन ग्राहक), ते देखील या सोयीचा लाभ घेऊ शकतात. परंतु, अशा रोख रकमेची जास्तीत जास्त मर्यादा रु. ५०,०००/ – प्रत्येक व्यवहारासाठी आहे. 

  • NEFT सेवा चेकद्वारे, डीडीद्वारे किंवा आपल्या बँक खात्यात नेट बँकिंग द्वारे म्हणजेच ऑनलाइन/ऑफलाइन दोन्ही प्रकारे वापरली जाऊ शकते. 

  • मूल्य मर्यादा – हा व्यवहार १ रुपये ते जास्तीत जास्त कितीही रुपयांपर्यंत केला जाऊ शकतो.

  • हस्तांतरण वेग – निधी हस्तांतरित होण्यासाठी कमीतकमी २ तासाचा अवधी लागतो.

  • सेवा उपलब्धता – सोम-शुक्र सकाळी ८.०० ते सायं. ६.३० आणि शनिवार: सकाळी ८.०० ते दुपारी १  च्या दरम्यान उपलब्ध आहे. रविवार आणि बँकेच्या सुट्यांच्या दिवशी ही सेवा अनुपलब्ध आहे.

  • व्यवहार शुल्क – 

    • रु. १०,००० पर्यंत – रु.२.५०

    • १०.००० ते रू.१ लाख – रु.५ 

    • १ लाख ते २ लाखपर्यंत – रु.१५ 

    • २ लाख ते रू. ५ लाख – रु.२५ 

    • ५ लाख ते रू.१० लाख पर्यंत – रु.५० 

    • (बँकेनुसार शुल्क बदलते)

RTGS(रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट) : 

  • निधीचे हस्तांतरण करण्याची मागणी केल्याकेल्या लगेचच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी जमा होतो, अशा कोणत्याही मध्यस्थाशिवाय (one to one) होणारी पैशाची देवाणघेवाण म्हणजेच रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट. 

  • NEFT प्रमाणे या व्यवहारात कोणतीही भूमिका नसते, त्यामुळेच हे व्यवहार तत्काळ(real time) होतात. ऑनलाइन/ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून  ही सेवा पुरवली जाते. होणारे सर्व व्यवहार थेट आरबीआय कडे नोंदले जात असल्याने हा व्यवहार अंतिम आणि अपरिवर्तनीय (इररिव्हर्सेबल) आहेत. 

  • मूल्य मर्यादा – वरील वैशिष्ट्यामुळेच ही सेवा रु. २ लाख ते  रु. १० लाख अशा मोठ्या रकमेच्या हस्तांतरासाठी वापली जाते. 

  • हस्तांतरण वेगतत्काळ हस्तांतरण हे या सेवेचे वैशिष्ट आहे.

  • सेवा उपलब्धता – सोम-शुक्र सकाळी ८.०० ते सायं. ४.०० आणि शनिवार: सकाळी ९.०० ते दुपारी ४.३०  च्या दरम्यान उपलब्ध आहे. रविवार आणि बँकेच्या सुट्यांच्या दिवशी ही सेवा अनुपलब्ध आहे.

  • व्यवहार शुल्क – 

    • २ लाख ते ५ लाख – २५ रु. 

    • ५ लाख ते १० लाख – ५० रु. 

    • (बँकेनुसार शुल्क बदलते)

IMPS (तत्काळ देयक सेवा) :

  • तत्काळ हस्तांतरणामधील सगळे अडथळे दूर करत २०१० साली IMPS या प्रणालीची ओळख भारतात करून  देण्यात आली. 

  • आपल्या मोबाईल द्वारे २४ x ७ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हस्तांतरण करण्याचा हा अद्यावत आणि सुरक्षित पर्याय आहे. 

  • ही सुविधा SBI,ICICI, AXIS इ. बरोबरच अनेक व्यावसायिक,ग्रामीण तथा सहकारी बँकांपर्यंत विस्तारली आहे. परंतु, ही सेवा केवळ ऑनलाईन हस्तांतरणापुरती मर्यादित आहे.

    • IMPS ची उद्दिष्ट्ये –

      • विविध व्यवहारांसाठी बँकेच्या ग्राहकांना मोबाइल उपकरणांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे.

      • केवळ मोबाइल क्रमांकाचा वापर करून लाभार्थ्यांसाठी व्यवहार व्यवस्था सोपी करणे.

      • भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  (आरबीआय)  रिटेल पेमेंट्स इलेक्ट्रीफिकेशन उद्देशासाठी उप-सेवा (sub-serve) पुरविणे.

      • भारतीय रिझर्व बँकेच्या मोबाईल पेमेंट मार्गदर्शक तत्त्व 2008 नुसार बँक आणि मोबाइल ऑपरेटरमध्ये सुरक्षित पद्धतीने इंटर-ऑपरेटेबल अशी भारतातील मोबाइल पेमेंट सिस्टीमची सुविधा उपलब्ध करणे.

      • संपूर्ण मोबाइल आधारित बँकिंग सेवांसाठी पाया तयार करणे.

  • मूल्य मर्यादा – जास्तीत जास्त २ लाखांपर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकतात.
  • हस्तांतरण वेग – तत्काळ
  • सेवा उपलब्धता – २४ x ७
  • व्यवहार शुल्क –
    • १०,००० पर्यंत – २.५ रु.  
    • १०,००० ते १ लाखापर्यंत – ५ रु.
    • १ लाख ते २ लाखापर्यंत – १५ रु.
    • (बँकेनुसार शुल्क बदलते)

 तर ही आहे ‘इंटरनेट बँकिंग’ च्या पर्यायांची प्राथमिक माहिती. ‘इंटरनेट बँकिंग’ मुळे बँकेचे व्यवहार अगदी घरात बसून करता येणे शक्य झाले आहे.  

(चित्रसौजन्यः https://bit.ly/2E34rHO)


Share this article on :
2 comments
  1. ई बँकिंग आजकालच्या युगात लोकांचे काम हलके करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, माहिती आवडली 👌 अप्रतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.